TET Paper Leak: दीड कोटी रुपयांत विकला जाणार होता टीईटीचा पेपर दिल्लीतून आलेल्या तीन आरोपींना अटक; मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू
ठाणे: देशभरात नीट पेपरफुटीचे प्रकरण गाजत असतानाच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचाही (TET) पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे. टीईटी परीक्षेचा फुटलेला पेपर तब्बल दीड कोटी रूपयांत विकला जाणार होता. या पेपरफुटी प्रकरणी दिल्लीहून आलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. तो हाती लागला की या संपूर्ण रॅकेटचा उलगडा होईल, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक दुधे यांनी भिवंडीत पत्रकार परिषदेत दिली.नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर टीईटी परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याचा दावा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने करण्यात आला होता. परंतु रविवारी (२८ जून) ही परीक्षा होण्याच्या काही तास आधीच या परीक्षेचा पेपरफुटल्याचे उघडकीस आल्यामुळे महाराष्ट्र परीक्षा परिषदेचा हा दावा फोल ठर...










