वीज जाते आणि येते…मध्ये काय घडते?
पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. वीजपुरवठा खंडित झाला की, आपण वीज वितरण कंपनीला दोष देऊन मोकळे होतो. वीज का गेली, का जाते, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत नसते. तसेच वीज जाते आणि येते, या मधल्या काळात काय घडते, हे जाणून घेण्याची गरज आहे…
-ज्ञानेश्वर आर्दड, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, छत्रपती संभाजीनगर परिमंडल, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, छत्रपती संभाजीनगर परिमंडल.
पावसाळा आणि वीजपुरवठा यांचे नाते सर्वांनीच गृहित धरलेले असते. अर्थात, विजेशिवाय जगण्याची कल्पनाच करणे शक्य नाही, इतके तिचे महत्त्व वाढलेले आहे. त्यामुळे वीज गेली की, आपल्या संतापाचा पारा चढतो. परंतु वीज जाते, हे वास्तव आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. वीजपुरवठा खंडित झाला की, आपण वीज वितरण कंपनीला दोष देऊन मोकळे होतो. दुसऱ्या दिवशी त्याची बातमी...










