राजकारण

‘डॉ. बामु’  अधिसभा निवडणूकः खुल्या प्रवर्गातील चार जागांवर उत्कर्ष पॅनलची दमछाक, नरेंद्र काळे विजयी घोषित!
महाराष्ट्र, राजकारण

‘डॉ. बामु’  अधिसभा निवडणूकः खुल्या प्रवर्गातील चार जागांवर उत्कर्ष पॅनलची दमछाक, नरेंद्र काळे विजयी घोषित!

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीतील पदवीधर निर्वाचक गणातील आरक्षित प्रवर्गातील पाचपैकी पाचही जागांवर दणदणीत विजय मिळवणाऱ्या विद्यापीठ उत्कर्ष पॅनलची खुल्या प्रवर्गातील जागांच्या लढतीत मात्र चांगलीच दमछाक होत आहे. खुल्या प्रवर्गातून उत्कर्ष पॅनलचे  नरेंद्र काळे यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. मात्र उर्वरित चार जागांवर उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांना निर्धारित कोटा पूर्ण करणेही अवघड जाऊ लागले आहे. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); खुल्या प्रवर्गातील विजयासाठी  २ हजार ७४६  कोटा निश्चित करण्यात  आला आहे. आरक्षित प्रवर्गात उत्कर्ष पॅनलचे उमेदवार निर्धारित कोट्यापेक्षा जास्त मते घेऊन विजयी झाले. मात्र खुल्या प्रवर्गातून उत्कर्ष पॅनलचा एकही उमेदवार पहिल्या पसंतीक्रमावर विजयी होऊ शकला नाही. दुसऱ्या पसंतीक्र...
‘डॉ. बामु’ची अधिसभा निवडणूकः पदवीधरच्या खुल्या प्रवर्गातील चार जागांवर उत्कर्ष पॅनलची आघाडी, पाचव्या जागेसाठी टस्सल!
महाराष्ट्र, राजकारण

‘डॉ. बामु’ची अधिसभा निवडणूकः पदवीधरच्या खुल्या प्रवर्गातील चार जागांवर उत्कर्ष पॅनलची आघाडी, पाचव्या जागेसाठी टस्सल!

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीतील पदवीधर निर्वाचक गणाच्या आरक्षित प्रवर्गातील पाचपैकी पाचही जागांवर दणदणीत विजय मिळवणाऱ्या महाविकास आघाडी प्रणीत विद्यापीठ उत्कर्ष पॅनलने खुल्या प्रवर्गातील पाचपैकी चार जागांवरही आघाडी घेतली आहे. पाचव्या जागेसाठी भाजपप्रणित विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार स्पर्धेत आहेत. या जागेसाठी खरी टस्सल होईल, असे चित्र आहे. सध्या दुसऱ्या पसंतीक्रमाची मतमोजणी सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पदवीधर निर्वाचक गणातील दहा जागांसाठी शनिवारी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी सकाळी १० वाजेपासून सुरू झाली. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात आरक्षित प्रवर्गातील पाच जागांची मतमोजणी झाली. या पाचपैकी पाचही जागा आ. सतीश चव्हण यांच्या नेतृत्वातील विद्यापीठ उत्कर्ष पॅनलने प्रच...
‘डॉ. बामु’ विद्यापीठ अधिसभा निवडणूकः आरक्षित प्रवर्गातील पाचही जागांवर उत्कर्ष पॅनलचे उमेदवार विजयी, आ. चव्हाणांचे वर्चस्व
महाराष्ट्र, राजकारण

‘डॉ. बामु’ विद्यापीठ अधिसभा निवडणूकः आरक्षित प्रवर्गातील पाचही जागांवर उत्कर्ष पॅनलचे उमेदवार विजयी, आ. चव्हाणांचे वर्चस्व

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या  अधिसभा निवडणुकीत पदवीधर निर्वाचक गणाच्या आरक्षित प्रवर्गातील पाच जागांवर महाविकास आघाडी प्रणीत विद्यापीठ उत्कर्ष पॅनेलचे उमेदवार मताधिक्याने विजयी झाले आहेत. या पाच प्रवर्गाच्या निवडणुकीत भाजप प्रणीत विद्यापीठ विकास मंचच्या उमेदवारांना सपाटून पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आता खुल्या प्रवर्गातील पाच जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गणातील अधिसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. पदवीधर गणातील दहा जागांपैकी आरक्षित प्रवर्गातील पाच जागांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्यात उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांनी पाचही आरक्षित प्रवर्गातून बाजी मारली आहे. सुनिल मगरे (अनुसूचित जाती), सुनिल निकम (अनुसूचित जमाती), सुभाष राऊत (ओबीसी), दत्तात्रय भांगे (एनटी) आणि पूनम पाटील (महिला राखीव) हे उत्कर्ष प...
‘डॉ. बामु’ अधिसभा निवडणूकः आरक्षित प्रवर्गातील पाचही जागांवर उत्कर्ष पॅनल आघाडीवर, वाचा कुणाला मिळाली किती मते?
महाराष्ट्र, राजकारण

‘डॉ. बामु’ अधिसभा निवडणूकः आरक्षित प्रवर्गातील पाचही जागांवर उत्कर्ष पॅनल आघाडीवर, वाचा कुणाला मिळाली किती मते?

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून या मतमोजणीत महाविकास आघाडी प्रणीत विद्यापीठ उत्कर्ष पॅनल आरक्षित प्रवर्गातील पाचही जागांवर आघाडीवर आहे. आरक्षित प्रवर्गातील या पाचही जागांवर भाजप प्रणीत विद्यापीठ विकास मंचच्या उमेदवारांची चांगलीच पिछेहाट झालेली आहे. ताज्या माहितीनुसार उत्कर्ष पॅनलचे अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार सुनिल मगरे यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत या प्रवर्गातील ७ हजार मतांची गणती झाली असून त्यापैकी मगरे यांनी ४ हजार ५०० मते घेतली आहेत. दुसऱ्या फेरीत मोजण्यात आलेल्या ८ हजार मतांपैकी मगरे यांनी ५ हजार ५०० मते मिळवली आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गात उत्कर्ष पॅनलचे उमेदवार सुनिल निकम यांनीही आघाडी घेतली असून पहिल्या फेरीत या प्रवर्गातील ५ हजार मतांची गणती पूर्ण झाली असून त्यापैकी निकम यांना  ३ हजा...
‘डॉ. बामु’ अधिसभा निवडणूक निकालः अवैध मतांची गणती सुरू
महाराष्ट्र, राजकारण

‘डॉ. बामु’ अधिसभा निवडणूक निकालः अवैध मतांची गणती सुरू

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभा गणातील निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू असून आता काही सेकंदांपूर्वी अवैध मतांची गणती सुरू करण्यात आली आहे. अवैध मतांची गणती झाल्यानंतर त्यावरील आक्षेप घेतले जातील आणि नंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईल. आज सकाळी दहा वाजता या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. रात्री साडेआकराच्या सुमारास मतपत्रिकांच्या विलगीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर अवैध मतांची गणती सुरू करण्यात आली आहे. अवैध ठरवण्यात आलेली ही मते उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना दाखवली जातील. त्यावर घेण्यात आलेल्या आक्षेपांवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात केली जाईल. अवैध मतांची गणती आणि त्यावरील आक्षेपांच्या निरस्सणाची प्रक्रिया यात किती वेळ जाईल त्यावरच मतमोजणीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू व्हायला किती वेळ ल...
‘डॉ. बामु’ अधिसभा निवडणूक निकालः कोऱ्या मतपत्रिकांच्या ‘जहूर’मुळे काही जणांचा ‘उत्कर्ष’ अडचणीत!
महाराष्ट्र, राजकारण

‘डॉ. बामु’ अधिसभा निवडणूक निकालः कोऱ्या मतपत्रिकांच्या ‘जहूर’मुळे काही जणांचा ‘उत्कर्ष’ अडचणीत!

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेच्या पदवीधर गणातील दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. तब्बल दहा तास उलटले तरी अजूनही मतपत्रिकांच्या विलगीकरणाचीच प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतमोजणी सुरू व्हायला किमान दहा वाजण्याची शक्यता आहे. संथगतीने सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे उमेदवारांचा रक्तदाब मात्र वर-खाली होत आहे. विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर गणातील १० जागांसाठी शनिवारी मतदान घेण्यात आले होते. त्याच्या मतमोजणीची प्रक्रिया आज सकाळी १० वाजता सुरू झाली. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात या गणातील मतपत्रिकांचे प्रवर्ग निहाय विलगीकरण आणि वैध-अवैध मतांचे वर्गीकरण हाती घेण्यात आले. ते काम अद्यापही सुरू आहे.  गेल्या दहा तासांपासून सुरू असलेलो विलगीकरण आणि वर्गीकरणाचे हे काम संपल्यानंतर बाजूला काढलेले  प्रत्येक ...