दुनिया

टाटा-एअरबसचा प्रकल्पही महाराष्ट्रातून निसटला, देशातील पहिला लष्करी विमान निर्मितीचा प्रकल्प गुजरातमध्ये!
दुनिया, देश

टाटा-एअरबसचा प्रकल्पही महाराष्ट्रातून निसटला, देशातील पहिला लष्करी विमान निर्मितीचा प्रकल्प गुजरातमध्ये!

नवी दिल्लीः वेदान्ता- फॉक्सकॉन पाठोपाठच टाटा- एअरबसचा देशातील पहिल्या लष्करी मालवाहू विमानांची निर्मिती करणारा सुमारे २२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्पही महाराष्ट्राच्या हातून निसटून गुजरातमध्ये गेला आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये सुरू व्हावा, असा महाराष्ट्राचा प्रयत्न होता. शिंदे- फडणवीस सरकारचा हा प्रयत्न असफल ठरला आहे. आता हा प्रकल्प गुजरातच्या बडोद्यामध्ये होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रविवारी त्याचे भूमीपूजन करणार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर या प्रकल्पाचे उद्घाटन केले जाणार आहे. लवकरच गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र निवडणूक आयोगाने अद्याप तारखा जाहीर केलेल्या नाहीत. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांबरोबरच गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखाही जाहीर केल्या जातील, असे मानले जात होते. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे निवडणूक आयोगा...
टी-२० वर्ल्ड कपः भारताचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, विराट कोहलीने पाकच्या खिशातून खेचून आणली विजयश्री!
दुनिया, देश, विशेष

टी-२० वर्ल्ड कपः भारताचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, विराट कोहलीने पाकच्या खिशातून खेचून आणली विजयश्री!

मेलबर्नः टी-२० विश्वचषक क्रिकेटमध्ये आज भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या अटीतटीच्या आणि रोमांचक महामुकाबल्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या महामुकाबल्यात भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव करून वर्ल्ड कपची दमदार सुरूवात केली. विराट कोहली या सामन्याचा हिरो ठरला. विराटने सुरूवातीच्या धक्क्यांनंतर लडखडू लागलेल्या भारतीय संघाला सावरले आणि शेवटपर्यंत तो नाबाद राहिला. विराटने आपल्या संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आणि आवश्यक असलेला रनरेट कायम राखला. विराट कोहलीने ५३ चेंडूत नाबाद ८२ धावा ठोकल्या. विराटच्या या शानदार खेळीमुळे पाकिस्तानच्या खिशातून विजयश्री खेचून आणली. आयसीसीनेही विराटचे कौतुक केले आहे. ‘किंग परतला! सलाम विराट कोहली!’  असे ट्विट करून आसीसीने विराटला सलाम ठोकला आहे.  तत्पूर्वी नाणेफेक जिंकून भारताने पाकिस्तानला आधी फलंदाज...
शी जिनपिंग पुन्हा बनले चीनचे सर्वोच्च नेते, माओत्से तुंगनंतर देशाचे सर्वात शक्तिशाली नेते म्हणून उदय!
दुनिया

शी जिनपिंग पुन्हा बनले चीनचे सर्वोच्च नेते, माओत्से तुंगनंतर देशाचे सर्वात शक्तिशाली नेते म्हणून उदय!

बीजिंगः शी जिनपिंग यांनी रविवारी चीनचे सर्वोच्च नेते म्हणून रविवारी तिसरा कार्यकाळ मिळवला. याचबरोबर शी जिनपिंग हे माओत्से तुंग यांच्यानंतर देशातील सर्वात शक्तिशाली नेते म्हणून उदयास आले आहेत. तिसरा कार्यकाळ मिळाल्यानंतर जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पार्टीतील आपल्या काही नजीकच्या सहकाऱ्यांना पदोन्नतीही दिली. गेल्या काही दिवसांपासून जिनपिंग यांच्याबाबत जागतिक माध्यमात अनेक खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या होत्या. एकदा तर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याची खोटी बातमीही आली होती. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय समितीने रविवारी शी जिनपिंग यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी पक्षाच्या महासचिवपदी निवड केली. या निवडीनंतर जिनपिंग यांनी माध्यमांशी संवाद साधला. जगाला चीनची गरज आहे. जगाशिवाय चीन विकसित होऊ शकत नाही आणि जगालाही चीनची गरज आहे. सुधारणा आणि खुलेपणाच्या दि...
ब्रिटनमध्ये मोठी उलथापालथः वाढत्या महागाईमुळे प्रधानमंत्री लिझ ट्रस यांनी दिला अवघ्या ४५ दिवसांत राजीनामा
दुनिया

ब्रिटनमध्ये मोठी उलथापालथः वाढत्या महागाईमुळे प्रधानमंत्री लिझ ट्रस यांनी दिला अवघ्या ४५ दिवसांत राजीनामा

लंडनः ब्रिटनमध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडली असून ब्रिटनच्या प्रधानमंत्रा लिझ ट्रस यांनी अवघ्या ४५ दिवसांतच पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ६ सप्टेंबर २०२२ रोजी प्रधानमंत्रिपदाची शपथ घेतली होती. आता पुढील आठवड्यात नव्या प्रधानमंत्र्यांची निवड केली जाणार आहे.  मागील काही दिवसांमध्ये ब्रिटनमध्ये अन्नधान्यांच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे येथील महागाई गेल्या ४० वर्षांतील उच्चांकी स्तरावर पोहोचली आहे.  गेल्या महिन्यात झालेली दरवाढ ही १९८० नंतरची सर्वात मोठी दरवाढ ठरली होती. आर्थिक आणि राजकीय संकट असलेल्या लिझ ट्रस सरकारसमोर महागाई नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान होते. लिझ ट्रस यांनी प्रधानमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ब्रिटनमधील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी काही धोरणात्मक पावले उचलली होती. मात्र ब्रिटनचे नेतृत्त्व स्वीकारल्यानंतर त्यांनी केवळ सहा आठवड्यांतच ...
‘हॅरी पॉटर’मधील रूबेस हॅग्रीड काळाच्या पडद्या आड, अभिनेते रॉबी कोल्टरेन यांचे निधन
दुनिया

‘हॅरी पॉटर’मधील रूबेस हॅग्रीड काळाच्या पडद्या आड, अभिनेते रॉबी कोल्टरेन यांचे निधन

एडीनबर्गः हॅरी पॉटर या गाजलेल्या सिनेमात रुबियस हॅग्रीडची भूमिका करणारे अभिनेते रॉबी कोल्टरेन यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. कोल्टरेन यांची हॅरी पॉटरमधील हॅग्रीडची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. कोल्टरेन हे हॅरी पॉटरशिवाय ब्रिटीश टीव्ही मालिका क्रॅकरमधील भूमिकेसाठी ओळखले जायचे. रॉबी कोल्टरेन यांच्या प्रवक्त्या बेलिंडा राईट यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. स्कॉटलंडमधील रुग्णालयात कोल्टरेन यांचे निधन झाल्याचे त्यांनी सांगितले. परंतु कोणत्या कारणामुळे कोल्टरेन यांचे निधन झाले, हे त्यांनी सांगितले नाही. १९९० च्या दशकातील क्रॅकर या टीव्ही मालिकेतील डिटेक्टिव्हच्या भूमिकेमुळे रॉबी कोल्टरेन चर्चेत आले होते. त्यांना सलग तीन वर्षे ब्रिटीश अकादमी टेलिव्हिजनचा पुरस्कार मिळाला होता.  त्यानंतर २००१ ते २०११ दरम्यान आलेल्या हॅरी पॉटर फिल्मच्या मालिकेत त्यांनी हॅरी पॉटरच्य...
अमेरिकेत भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या हत्येने खळबळ!
दुनिया

अमेरिकेत भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या हत्येने खळबळ!

कॅलिफोर्नियाः अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील एका फळबागेत भारतीय वंशाच्या कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  मृतांमध्ये आठ महिन्यांच्या मुलीचाही समावेश आहे. हे कुटुंब काही दिवसांपासून बेपत्ता होते. आठ महिन्यांच्या आरोही धेरीसह तिची आई २७ वर्षीय जसलीन कौर आणि वडिल जसदीपसिंग यांचे उत्तर कॉलिफोर्नियातील मर्सेड काऊंटीच्या एका ट्रॅकिंग कंपनीमधून अपहरण करण्यात आले होते, अशी माहिती मर्सेड काऊंटी पोलिसांनी दिली.  या चौघांचे मृतदेह इंडियाना आणि हुतचीन्सन रस्त्यावरील एका फळबागेत बुधवारी आढळून आले. फळबागेतील एका शेतमजुराला हे मृतदेह आढळून आले होते. या घटनेमुळे येत असलेला राग शब्दांत सांगू शकत नाही, असे शेरीफ वार्न्के या पोलिस अधिकाऱ्याने दिली. या कुटुंबाचे अपहरण करतानाचा व्हिडीओ पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओत जसदीप आणि अमनदीप हे हाताला बांधलेल्या अवस्...