शी जिनपिंग पुन्हा बनले चीनचे सर्वोच्च नेते, माओत्से तुंगनंतर देशाचे सर्वात शक्तिशाली नेते म्हणून उदय!
बीजिंगः शी जिनपिंग यांनी रविवारी चीनचे सर्वोच्च नेते म्हणून रविवारी तिसरा कार्यकाळ मिळवला. याचबरोबर शी जिनपिंग हे माओत्से तुंग यांच्यानंतर देशातील सर्वात शक्तिशाली नेते म्हणून उदयास आले आहेत. तिसरा कार्यकाळ मिळाल्यानंतर जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पार्टीतील आपल्या काही नजीकच्या सहकाऱ्यांना पदोन्नतीही दिली. गेल्या काही दिवसांपासून जिनपिंग यांच्याबाबत जागतिक माध्यमात अनेक खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या होत्या. एकदा तर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याची खोटी बातमीही आली होती.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय समितीने रविवारी शी जिनपिंग यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी पक्षाच्या महासचिवपदी निवड केली. या निवडीनंतर जिनपिंग यांनी माध्यमांशी संवाद साधला. जगाला चीनची गरज आहे. जगाशिवाय चीन विकसित होऊ शकत नाही आणि जगालाही चीनची गरज आहे. सुधारणा आणि खुलेपणाच्या दिश...




