विशेष

मदरशात शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देश, विशेष

मदरशात शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद, मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्लीः  मदरशामध्ये शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. उत्तर प्रदेशात मदरशात शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत दरमहा एक हजार रुपये आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार शिष्यवृत्ती देण्यात येत होती. मात्र आता या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्जच भरण्यापासून रोखण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील १६ हजार ५५८ मदरशांमधून शिकणाऱ्या सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांनी गेल्यावर्षी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतला होता. आता मात्र इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे फक्त इयत्ता नववी आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती देण्यात येणार असून त्यांचेच अर्ज मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहेत. काय दिले कार...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत स्थळे आणि बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्किटचे उद्या होणार उद्घाटन
महाराष्ट्र, विशेष

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत स्थळे आणि बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्किटचे उद्या होणार उद्घाटन

मुंबई:  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत मुंबईतील महत्त्वाची स्थळे व बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्कीट तयार करण्यात आले आहे. संविधान दिनानिमित्ताने २६ नोव्हेंबर रोजी पर्यटन संचालनालयाने नव्याने तयार केलेल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट’ चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चेंबूरच्या दि फाईन आर्टस् सोसायटी येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मुंबईतील महत्त्वाची स्थळे व बौध्द लेण्यांवर आधारित टूर सर्कीट दि. ३, ४, ७ व ८ डिसेंबर रोजी आयोजित केले असून या टूरमध्ये चैत्यभूमी, राजगृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, बीआयटी चाळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा या स्थळांचा समावेश आहे. हा उपक्रम ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने पर्यटकांसाठी भविष...
सांगलीतील तब्बल ४० गावे कर्नाटकात समाविष्ट करण्याचा घाट, महाराष्ट्राचा लचका तोडण्याचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इरादा
देश, विशेष

सांगलीतील तब्बल ४० गावे कर्नाटकात समाविष्ट करण्याचा घाट, महाराष्ट्राचा लचका तोडण्याचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इरादा

बेंगळुरूः गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वय ठेवून हा प्रश्न धसास लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने दोन मंत्र्यांची नियुक्ती करून काही तास उलटले नाही तोच कर्नाटक सरकारने महाराष्ट्राचा आणखी लचका तोडण्याचा मनसुबा जाहीर केला आहे.कर्नाटकातील सीमा भागातील मराठी भाषक गावे महाराष्ट्रात समाविष्ट होणे तर दूरच पण सांगली जिल्ह्यातील तब्बल ४० गावांचा कर्नाटकमध्ये समावेश करण्याचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्बई यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त ४० गावांनी कर्नाटक राज्यात सामील होण्याचा ठराव नुकताच मंजूर केला होता. त्या ठरावानंतर आता कर्नाटकने ही ४० गावे आपल्या राज्यात सामावून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे बेळगाव, निपाणी, कारवारसह कर्नाटकातील ...
सावरकरांनी महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसेला बंदूक पुरवलीः तुषार गांधी यांचा खळबळजनक आरोप
देश, विशेष

सावरकरांनी महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसेला बंदूक पुरवलीः तुषार गांधी यांचा खळबळजनक आरोप

मुंबईः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान विनायक दामोदर सावरकरांना माफीवीर संबोधल्यामुळे उठलेले राजकीय वादळ शांत होत नाही तोच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आज सावरकरांवर खळबळजनक आरोप केला आहे. महात्मा गांधींच्या हत्येसाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवली होती, असा आरोप करून तुषार गांधी यांनी खळबळ उडवून दिली आहे. हा आरोप नसून इतिहासात जे नोंदले गेले, तेच आपण सांगत असल्याचे तुषार गांधी म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकरांना माफीवीर संबोधत सावरकरांनी इंग्रजांना लिहून दिलेला माफीनामाच सादर केला होता. आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचेही राहुल गांधी यांनी दाखवून दिले होते. त्यावरून भाजपने त्यांना लक्ष्यही केले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जात असतानाच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांध...
राज्यपाल कोश्यारींनी विद्यापीठात दिले आरएसएसच्या तत्वज्ञानाचे धडे, म्हणालेः हमारे आरएसएस के गोलवलकर गुरूजी….
महाराष्ट्र, विशेष

राज्यपाल कोश्यारींनी विद्यापीठात दिले आरएसएसच्या तत्वज्ञानाचे धडे, म्हणालेः हमारे आरएसएस के गोलवलकर गुरूजी….

औरंगाबादः महाराष्ट्रातील विद्यापीठांचे कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भाषण वादग्रस्त ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत ‘शिवाजी तो पुराने जमाने के आदर्श थे’ म्हणणाऱ्या कोश्यारींनी गोळवलकरांचा सन्मानाने उल्लेख करत विद्यापीठातील विद्यार्थ्यांना 'हमारे आरएसएस के गोलवलकर गुरूजी...' म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) तत्वज्ञानाचे धडे दिले. व्हिजनरीसोबतच मिशनरी असण्याचे महत्व पटवून देताना राज्यपाल कोश्यारी यांनी आरएसएसचे लोक किती ध्येय्याने झपाटलेले असतात, हे विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालणाऱ्या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभातच कोश्यारींनी जाहीरपणे आरएसएसच्या तत्वज्ञानाचे धडे दिल्यामुळे समारंभाला उपस्थित अनेकांच्या भुवया उंचावल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शिवाजी जुन्या काळातील आदर्श, नितीन गडकरी तर…
महाराष्ट्र, विशेष

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शिवाजी जुन्या काळातील आदर्श, नितीन गडकरी तर…

औरंगाबादः महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत ते जुन्या काळातील आदर्श असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. शिवाजी तर जुन्या काळातील आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असे कोश्यारी म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात कुलपती म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते. शाळेत शिक्षण घेताना तुमचे आवडते नेते कोण असा प्रश्न आम्हाला शिक्षक विचारायचे. तेव्हा आमच्यापैकी काही जण सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी तर काही जण पंडित जवाहरलाल नेहरी यांचे नाव सांगायचे. शिवाजी तर जुन्या काळातील आदर्श होते. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून नितीन गडकरी यांच्यापर्यंत नव्या युगाचे आदर्श सापडतील, असे कोश्यार...