‘भामटेगिरी’ फसली: ‘डॉ.बामु’च्या वादग्रस्त कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांचा राजीनामा
औरंगाबाद: राजपूत भामटा जातीचे बनावट प्रमाणपत्रामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वादग्रस्त कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी अखेर राजीनामा दिला. त्यांच्या ठिकाणी केमिकल टेक्नॉलॉजीचे प्रा. डॉ. भगवान साखळे यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे.डॉ. जयश्री सूर्यवंशी या जन्माने मराठा जातीच्या आहेत. आंतरजातीय विवाह केल्यानंतर त्यांनी राजपूत भामटा जातीचे बनावट प्रमाणपत्र काढले. याच बनावट जातप्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी डॉ. इं.भा. पाठक महिला महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळवली.
या अनुभवाच्या जोरावरच त्या पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव झाल्या. ही 'भामटेगिरी' उघडकीस आल्यानंतर डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी आपल्याकडे असलेले राजपूत भामटा जातीचे प्रमाणपत्र केवळ 'शोभेची वस्तू' असून त्याचा आपण कुठेही वापर केला नसल्याचा बचा...



