अभिव्यक्ती

किसका और काहे का डर लगता है साब?
अभिव्यक्ती, विशेष

किसका और काहे का डर लगता है साब?

सुरेश पाटील, संपादक न्यूजटाऊन विद्यापीठात शिकायला येणारे, परिवर्तनाचा हुंकार देणारे विद्यार्थी म्हणजे 'तुकडे-तुकडे गँग' आहे, असे नरेटिव्ह २०१४ नंतर केव्हाच सेट करून टाकण्यात आलेले आहे. दिल्लीच्या जेएनयूच्या निमित्ताने तर ते अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यात सरकारने कुठलीच कसर सोडलेली नाही. अभिव्यक्ती, लोकशाही, आंदोलने या आता तद्दन फालतू गोष्टी बनलेल्या आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने स्वतंत्र पोलिस ठाण्याची केलेली मागणी ही त्या धोरणाचाच भाग नसेल कशावरून? डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थी कालानुरूप दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि परवडेल अशा खर्चात विद्यापीठ परिसरात निवासाच्या व्यवस्थेची मागणी करत असताना विद्यापीठाचे प्रशासन मात्र विद्यार्थ्यांचे ‘भलतेच हित’ साधण्याच्या उद्योगात मग्न असल्याचे दिसते. नुकत्याच झालेल...
गुलजार….कवितेची बाग…!
अभिव्यक्ती

गुलजार….कवितेची बाग…!

- डॉ.संजय शिंदे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) उर्दू भाषेत 'गुलजार' या शब्दाचा अर्थ होतो बगीचा, तोही  फुलांनी बहरलेला! हिंदी चित्रपटसृष्टीतील गुलजार हे एक प्रकारे कवितेच्या बागेत बहरलेलं व्यक्तिमत्व. तरल मनाच्या आणि अत्यंत संवेदनशील अशा या कवीला भारतीय साहित्यातील सर्वोत्तम पुरस्कार 'ज्ञानपीठ' घोषित करण्यात आला आहे . या कवीने ऑगस्टमध्ये वयाची ८७ वर्षे पूर्ण केली आहेत. या वयात व्यक्ती येते तेव्हा त्याने एक हजाराहून अधिक पोर्णिमा पाहिलेल्या असतात, असे म्हटले जाते. गुलजार यांनी मात्र अमावस्याही पाहिलेल्या. म्हणूनच तर 'चौदहवी चांद को, फिर आग लगी है देखो..राख हो जायेगा जब, फिरसे अमावस होगी' असं ते बोलून जातात. गुलजार यांच्या कविता, गजल, उर्दू शायरी ही रसिंकासाठी एक गुलजार अर्थात कवितेची बागचं असते. गुलजार यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या दमदार लिखाणासाठी ओळखले जाते. तर, उर्दूतील उत्...
अयोध्येतील श्रीरामलल्लाच्या नव्या मूर्तीत बुद्धाला विष्णूचा नववा अवतार दाखवले, तथागताचे भगवीकरण करण्याचा प्रयत्न!
अभिव्यक्ती, देश

अयोध्येतील श्रीरामलल्लाच्या नव्या मूर्तीत बुद्धाला विष्णूचा नववा अवतार दाखवले, तथागताचे भगवीकरण करण्याचा प्रयत्न!

मुंबईः  उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मोदींनी अनुष्ठान केल्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी हटवण्यात आली. परंतु अयोध्येतील राम मंदिरात बसवण्यात आलेल्या श्रीरामाच्या मूर्तीच्या शिल्पात विष्णूचे दहा अवतार कोरण्यात आले असून भगवान बुद्धाला त्या दहा अवतारांपैकी विष्णूचा नववा अवतार दाखवण्यात आले आहे. हे बुद्धाचे भगवीकरण करण्याचा प्रयत्न असल्याची टीका होत असून त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.  म्हैसूरचे शिल्पकार अरूण योगीराज यांनी काळ्या दगडात रामलल्लाची ही मूर्ती घडवली आहे. मूर्तीची उंची ४.२४ फूट म्हणजेच ५१ इंच आणि रुंदी ३ फूट आहे. रामलल्लाच्या या मूर्तीचे वजन २०० किलो आहे. प्रभू श्रीरामाच्या या मूर्तीत पाच वर्षीय बालकाची कोमलता दाखवण्याचा प्रयत्न करण्य...
‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटकावर पवार म्हणाले, सध्याचे प्रेक्षक कुटुंब कलहातले महाराज का दाखवले असा प्रश्न विचारतील आणि…
अभिव्यक्ती, महाराष्ट्र

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटकावर पवार म्हणाले, सध्याचे प्रेक्षक कुटुंब कलहातले महाराज का दाखवले असा प्रश्न विचारतील आणि…

पुणेः ऐतिहासिक नाटकांचे सादरीकरण अधिक संवेदनशील झाले आहे. वसंत कानेटकर यांनी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटक लिहिले. हे नाटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कौटुंबिक बाबींवर अधिक भाष्य करणारे आहे. सध्याचे प्रेक्षक कुटुंब कलहातले महाराज का दाखवले असा प्रश्न विचारतील आणि त्याचे पुरावेही मागतील, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडा संकुलात आयोजित १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उद्योगमंत्री तथा नाट्य संमेलनाचे निमंत्रक उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, ९९ व्या  नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच...
कुमार शिराळकरः स्वतःहून सामाजिक क्रांतीच्या प्रयोगाला वाहून टाकलेला शास्त्रज्ञ!
अभिव्यक्ती, महाराष्ट्र

कुमार शिराळकरः स्वतःहून सामाजिक क्रांतीच्या प्रयोगाला वाहून टाकलेला शास्त्रज्ञ!

लोकशाही मूल्ये केवळ भाषणातच न मांडता स्वतःच्या जगण्यात प्रतिबिंबित केलेल्या १९७० च्या शहादा चळवळीतील लढाऊ कार्यकर्ता म्हणजे कॉम्रेड कुमार शिराळकर!शिराळकरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडून दाखवणाऱ्या ‘कॉम्रेड कुमार शिराळकरः माणूसपणाच्या वाटेवरचा प्रवासी’या डॉ. उमाकांत राठोड यांनी संपादित केलेल्या स्मृतीग्रंथाचे प्रकाशन रविवार, दिनांक ७ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता छत्रपती संभाजीनगरातील (औरंगाबाद) मसापच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होत आहे. त्यानिमित्त ज्येष्ठ कामगार नेते कॉ. अजित अभ्यंकर यांनी या ग्रंथास लिहिलेली ही प्रस्तावना... अजित अभ्यंकर, ज्येष्ठ कामगार नेते, पुणे. आपल्या जवळच्या व्यक्तिच्या स्मृती जागवणे हा कोणत्याही माणसाचा अविभाज्य असा मानसिक अवकाश आहे. पण कुमार शिराळकर यांच्याबद्दल आज आपण त्यांच्या मृत्यूनंतर एक वर्षानी त्यांच्या स्मृती लिहतो आहोत, तो क...
आणखी किती अक्षय भालेरावचे बलिदान?
अभिव्यक्ती

आणखी किती अक्षय भालेरावचे बलिदान?

बोंढार येथे आंबेडकर जयंतीच्या विरोधात गावकऱ्यांनी ठराव  घेतला. तो राष्ट्रपतींचा कायदा समजून पोलिसांनी दलितांना ‘आंबेडकर जयंतीची मिरवणूक डीजे लाऊन वाजत गाजत काढायची नाही’ अशी तंबी दिली. यामुळे जातीयवाद्यांचे बळ वाढले. तरीही अक्षय श्रावण भालेराव याने पुढाकार घेऊन २९ एप्रिल २०२३ रोजी बोंढार गावात भव्य प्रमाणात आंबेडकर जयंती साजरी केली. यामुळे सनातनी जातीयवादी लोक हादरुन गेले. त्यांचा जळफळाट झाला. त्यामुळे ते आता आणखी एकवटले होते. अक्षयचा काटा कसा काढायचा याची खलबते चालू झाली होती.  अखेर ती काळी वेळ आली आणि जातीयवादी गावगुंडांनी अक्षय भालेरावचा निर्घृणपणे खून केला... असे आणखी किती अक्षय आपण शहीद होऊ देणार आहोत? इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर कट्टर आंबेडकरी विचारधारेचा अनुयायी असलेल्या अक्षय श्रावण भालेराव या युवकाचा बोंढार हवेली (तालुका, जिल्हा नांदेड) येथील ...
प्रा. संदेश ढोले यांचा ‘एवढेच फक्त सांगता येते’ कवितासंग्रह प्रकाशित; गज्वींची प्रस्तावना, ‘उपरा’कारांचा ब्लर्ब!
अभिव्यक्ती

प्रा. संदेश ढोले यांचा ‘एवढेच फक्त सांगता येते’ कवितासंग्रह प्रकाशित; गज्वींची प्रस्तावना, ‘उपरा’कारांचा ब्लर्ब!

यवतमाळः आंबेडकरी कवि प्रा. संदेश ढोले यांचा ‘एवढेच फक्त सांगता येते’ हा पहिला कवितासंग्रह नोशनप्रेस या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला आहे. प्रसिद्ध विचारवंत, नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहिली आहे. कवि प्रा. संदेश ढोले यांच्या ‘एवढेच फक्त सांगता येते’ या कवितासंग्रहातील कवितांवर प्रसिद्ध समीक्षक जयंत साठे यांनी वैचारिक भाष्य केले आहे. तर पद्मश्री ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी कवितासंग्रहाचे ब्लर्ब लिहिले आहेत. हा कवितासंग्रह लवकरच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. प्रा. संदेश ढोले यांच्या कवितेवर ‘उपरा’कार लक्ष्मण माने लिहितात... धम्मक्रांतीच्या प्रेरणेने अस्तित्वात आलेल्या आंबेडकरी साहित्याने वैश्विक साहित्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली. नव्या जाणिवा, नवा आशय आणि नवे मूल्यभान असणाऱ्या या साहित्याने काळावर अमीट असा ठसा उमटविला. ड...
नितीन वैद्यः समतेच्या मार्गावरील कार्यकर्ता सिनेनिर्माता
अभिव्यक्ती

नितीन वैद्यः समतेच्या मार्गावरील कार्यकर्ता सिनेनिर्माता

डॉ. ना. य. डोळे फाउंडेशनकडून दिला जाणारा यंदाचा डॉ. ना. य. डोळे स्मृती पुरस्कार राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, पूर्वाश्रमीचे पत्रकार नितीन वैद्य यांना उदगीर येथे आज होणार्‍या समारंभात जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय सचिव व मुंबईचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात येत आहे. त्या निमित्त वैद्य यांच्या कार्याची ओळख करून देणारा हा लेख... अंकुश गायकवाड, माजी प्रदेश कार्यवाह, छात्रभारती. उच्च दर्जाची व्यावसायिकता, त्यातही टीव्ही, चित्रपटासारखे झगमगाटी जग. त्यात राहूनही लाखांत एखादाच व्यक्ती सामाजिक कार्यात राहतो. तेही हौशी समाजकार्य नव्हे, तर अत्यंत कर्मठ व आजघडीला पिछेहाट होत असलेली समाजवादी चळवळ! हा तोल प्रसिद्ध टीव्ही मालिका व चित्रपट निर्माते नितीन वैद्य यांना चांगलाच साधता आला आहे. संघटनांपासून चार हात दूर राहणाऱ्...
सिल्लोड तालुक्यात शाहीर पठाडेंच्या नेतृत्वात लोकरंजनातून शासकीय योजनांबाबत लोकप्रबोधन!
अभिव्यक्ती, महाराष्ट्र

सिल्लोड तालुक्यात शाहीर पठाडेंच्या नेतृत्वात लोकरंजनातून शासकीय योजनांबाबत लोकप्रबोधन!

छत्रपती संभाजीनगर:  लोकरंजन लोककला प्रतिष्ठानच्या वतीने सिल्लोड तालुक्यात शेतकऱ्यांसह समाजातील विविध घटकांसाठीच्या कल्याणकारी योजनांचा प्रभावी प्रचार आणि प्रसार करण्यात आला. जिल्हा माहिती कार्यालय व सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मार्च महिन्यातील अखेरच्या आठवड्यात या जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाहीर डॉ. शेषराव पठाडे आणि सहकाऱ्यांनी वरखेडी, बनकिन्होळा, निल्लोड, कायगाव, पिंपळगाव (पेठ), वरूड-पिंपरी, टाकळी जिवरग या सात गावांत गण, गौळण, रंगबाजी आणि लोकगीतांतून योजनांचा जागर केला. सातही गावांत कलारसिकांकडून चांगले सहकार्य मिळाले. मागेल त्याला शेततळे, एक रुपयात पीकविमा, नमो किसान सन्मान निधी, रमाई आवास, सुशिक्षित बेरोजगारांसाठी कौशल्य विकास, राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्...
रोजगाराच्या अमाप संधी, व्यापक बाजारपेठेची ‘समृद्धी’ देणारा महामार्ग!
अभिव्यक्ती

रोजगाराच्या अमाप संधी, व्यापक बाजारपेठेची ‘समृद्धी’ देणारा महामार्ग!

नागपूर ते मुंबई या ७०१ किलोमीटर लांबीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गापैकी नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त संपूर्ण राज्यासाठी ‘समृद्धी’चा महामार्ग ठरणा-या मार्गाविषयी हा लेख… अतुल पांडे कुठल्याही देशाचा दर्जेदार विकास साधण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणा-या गोष्टी म्हणजे रस्ते आणि शिक्षण आहेत हे जाणून राज्य शासनाने रस्ते आणि शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. ‘गतिमान रस्ते, गतिमान विकास’ हे विकाससूत्र ठरवून समृद्धी महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प होय. संपूर्ण राज्...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!