विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला उच्च न्यायालयाची स्थगितीः मुलाखती घ्या, पण निवड यादी तयार करू नका; ११ फेब्रुवारीच्या जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवर खंडपीठाचे आदेश
छत्रपती संभाजीनगरः राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ११ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाआधारे होऊ घातलेल्या प्राध्यापक भरतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चाप लावला असून या शासन निर्णयाआधारे सुरू असलेली मुलाखतीची प्रक्रिया सुरू ठेवा, परंतु कोणत्याही संवर्गातील निवड यादी तयार करू नका, असे आदेश न्या. नितीन सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला दिले आहेत. याच शासन निर्णयाच्या आधारे राज्यातील सर्वच सार्वजनिक विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू असून उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे ती सर्वच भरती प्रक्रिया अनिश्चिततेचे सावटात सापडण्याची शक्यता आहे.
यूजीसी कायद्याच्या कलम २६ अं...










