अमृता फडणवीसांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे भाजपचा ‘बाहुबली’ नेता जिल्ह्यातून हद्दपार!
चंद्रपूरः भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या भाजप नेत्याला पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी शहरातील भाजप नेते खेमचंद गरपल्लीवार असे हद्दपार केलेल्याचे नाव आहे. विशेष म्हणजे गरपल्लीवार हे गोंडपिपरीतील ‘बाहुबली’ नेते म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत नोव्हेंबर २०२२ मध्येच त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंडपिपरी येथील खेमचंद गरपल्लीवार यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गायिका पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्टमुळे भाजप कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यांनी पोलिसांत...