देश

रामदेव बाबांना उपरती: राज्य महिला आयोगाच्या दणक्यानंतर मागितली महिलांची सपशेल माफी!
देश

रामदेव बाबांना उपरती: राज्य महिला आयोगाच्या दणक्यानंतर मागितली महिलांची सपशेल माफी!

मुंबईः ‘माझ्या नजरेने पाहिले तर महिला काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात,’ असे वादग्रस्त विधान करणारे रामदेव बाबा उर्फ रामकिसन यादव यांना राज्य महिला आयोगाच्या दणक्यानंतर उपरती झाली असून केलेल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करत त्यांनी महिलांची सपशेल माफी मागितली आहे. ठाण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबा ऊर्फ रामकिसन यादव यांनी महिला साडीत चांगल्या दिसतात. सलवार सूटमध्येही चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिले तर काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत हे विधान केले होते. रामदेव बाबांच्या या वक्तव्यावरून वादंग उठले आणि सर्वस्तरातून त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती. रामदेव बाबा उर्फ रामकिसन यादव यांच्या या वक्तव्याची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाक...
मदरशात शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देश, विशेष

मदरशात शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद, मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्लीः  मदरशामध्ये शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. उत्तर प्रदेशात मदरशात शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत दरमहा एक हजार रुपये आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार शिष्यवृत्ती देण्यात येत होती. मात्र आता या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्जच भरण्यापासून रोखण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील १६ हजार ५५८ मदरशांमधून शिकणाऱ्या सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांनी गेल्यावर्षी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतला होता. आता मात्र इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे फक्त इयत्ता नववी आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती देण्यात येणार असून त्यांचेच अर्ज मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहेत. काय दिले कार...
विद्युत कंपन्या भांडवलदारांना देण्याचा घाट, विद्युत विधेयकाच्या विरोधात जंतरमंतरवर विशाल धरणे
देश

विद्युत कंपन्या भांडवलदारांना देण्याचा घाट, विद्युत विधेयकाच्या विरोधात जंतरमंतरवर विशाल धरणे

औरंगाबाद: देशातील विविध राज्य सरकारच्या ताब्यात असलेल्या विद्युत कंपन्या भांडवलदारांना देण्याचा घाट केंद्र सरकारने नव्या विद्युत विधेयकद्वारे घातला असल्याचा आरोप स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील यांनी केला आहे. संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार नवे विद्युत विधेयक मांडण्यात येणार आहे. या विधेयकाचा विरोध करण्यासाठी ऑल इंडिया इंडिपेन्डंट विद्युत एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने नवी दिल्ली येथील जंतरमंतर येथे नुकतेच विशाल धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार राजकुमार सैनी, उपाध्यक्ष एफ.सी.जस्सल, एस.के, सचदेव, माजी खासदार सावित्री फुले, (उत्तर प्रदेश) एन.बी.जारोंडे, ए.व्ही. किरण यांचा समावेश होता. अनेक राज्यांमधील विद्युत कंपन्या फायद्यात असतांना खासगीकरण करण्याचे औचित्य नाही. खासगीकरणानंतर सर्वाधिक फटका तेथील कर्मचारी व कामगारांना बसणार आहे.जनतेलासुध्दा ...
…तर उठाव होणारच!, संभाजीराजेंच्या इशाऱ्यानंतर राज्यपाल कोश्यारी हटाव मोहिमेला वेग!
देश, महाराष्ट्र

…तर उठाव होणारच!, संभाजीराजेंच्या इशाऱ्यानंतर राज्यपाल कोश्यारी हटाव मोहिमेला वेग!

मुंबईः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अपमानास्पद विधानावरून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोश्यारींना हटवण्यासाठी अल्टिमेटम दिल्यानंतर आता छत्रपती संभाजी राजे यांनीही कोश्यारींना हटवले नाही तर उठाव होणारच असा इशारा केंद्र व राज्य सरकारला दिला आहे. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही कठोर पावले उचलली जातील, असे संकेत दिले आहेत. औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ‘शिवाजी तो पुराने जमाने की बात है...’ असे वादग्रस्त विधान केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीतच कोश्यारींनी शिवाजी महाराजांबद्दल हे आ...
सीमा भागातील ८६५ गावांमधील संस्था, संघटनांना महाराष्ट्र सरकार देणार बळ
देश, महाराष्ट्र

सीमा भागातील ८६५ गावांमधील संस्था, संघटनांना महाराष्ट्र सरकार देणार बळ

मुंबई: महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील विविध संस्था आणि संघटना यांना मोठं बळ मिळणार आहे. या भागातील ८६५ गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक तसेच निम सार्वजनिक संस्था व संघटनांना देखील मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीमा प्रश्नी अलीकडेच सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा भागातील मराठी बांधव आणि संस्था यांना महाराष्ट्राकडून अर्थसहाय देण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे २४ नोव्हेंबर रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीमधून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारातून राज्यातील विविध संस्था, संघटना यांना अर्थसहाय करण्याची तरतूद आहे. यात सुधारणा करुन नव्या शासन निर्णयात यात सुधारणा करून आता सीमा भागातील ८६५ गावांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. मुख्यम...
महिलांनी कपडे नाही घातले तरी त्या जास्त सुंदर दिसतात… बाबा रामदेव यांचे वादग्रस्त वक्तव्य
देश, महाराष्ट्र

महिलांनी कपडे नाही घातले तरी त्या जास्त सुंदर दिसतात… बाबा रामदेव यांचे वादग्रस्त वक्तव्य

ठाणेः महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिले तर, काही नाही घातले तरी त्या चांगल्या दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे. ठाण्यातील हायलँड भागात पतजंली योगपीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महिलांशी संवाद साधताना बाबा रामदेव यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही उपस्थित होत्या. महिलांनी साडी नेसली तरी चांगल्या दिसतात. सलवार सूट घातला तरी चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिले तर काही नाही घातले तरी त्या चांगल्या दिसतात, असे रामदेव म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....