देश

चार हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांचा हिशेबच नाही, प्रशांत भूषण यांचा दावा; एसआयटीच्या मागणीसाठी करणार जनहित याचिका
देश, राजकारण

चार हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांचा हिशेबच नाही, प्रशांत भूषण यांचा दावा; एसआयटीच्या मागणीसाठी करणार जनहित याचिका

नवी दिल्लीः निवडणूक रोख्यांचा वापर लाचखोरी, खंडणीवसुली आणि आर्थिक अफरातफरीसाठी झाला असून अद्याप चार हजार कोटींचे निवडणूक रोखे कुणाकुणाला दिले याचा हिशेबच नसल्याचा दावा ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी केला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली असून पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी रविवारी जाहीर केले. राजकीय पक्षांना निधी देण्यासाठी मोदी सरकारने सुरू केलेली निवडणूक रोखे पद्धती घटनाबाह्य असल्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. या न्यायालयीन लढाईत असलेले प्रशांत भूषण आणि माहिती अधिकार कार्यकर्त्या व कॉमन कॉज संस्थेच्या सदस्य अंजली भारद्वाज यांनी रविवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये सविस्तर विवेचन केले. १६ हजार ५०० कोटी रुपयांच्या निवडणूक रोखे खरेदीपैकी...
निवडणूक जाहिरनाम्यात काँग्रेसची सर्वात मोठी खेळीः आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, पाच न्यायांसह दिल्या २५ गॅरंटी!
देश, राजकारण

निवडणूक जाहिरनाम्यात काँग्रेसची सर्वात मोठी खेळीः आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, पाच न्यायांसह दिल्या २५ गॅरंटी!

नवी दिल्लीः  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आज (५ एप्रिल) प्रसिद्ध केलेल्या निवडणूक जाहिरनाम्यात आरक्षणाच्या मुद्यावर सर्वात मोठी खेळी खेळली आहे. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रासह अनेक राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून वातावरण तापलेले असतानाच काँग्रेसने हाच मुद्दा अधोरेखित करत आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवण्यासाठी घटनादुरूस्ती करण्याची गॅरंटी दिली आहे. काँग्रेसचे हे आश्वासन मास्टरस्ट्रोक ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या या निवडणूक जाहिरनाम्यात सरकारी नोकऱ्यांत महिलांना ५० टक्के आरक्षण, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव यासह पाच न्याय आणि २५ गॅरंटी देण्यात आल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हा निवडणूक जाहिरनामा प्रसिद्ध केला. त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधीही हजर होत्या. महाराष्ट्र, राजस्थानसह अनेक रा...
भाजप उमेदवार नवनीत राणा यांना मोठा दिलासा, जात प्रमाणपत्र वैध असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
देश, राजकारण

भाजप उमेदवार नवनीत राणा यांना मोठा दिलासा, जात प्रमाणपत्र वैध असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्लीः अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि याच मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मोठा दिलासा मिळाला आहे. राणा यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बनावट ठरवून ते रद्द करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवण्यात आला असून राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचे म्हटले आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सर्व बाबी तपासून नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवण्याचा योग्य निर्णय दिला होता. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करून आपल्या विशेषाधिकारात ते जात प्रमाणपत्र रद्द ठरवण्याचा दिलेला निर्णय चुकीचा आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्या. संजय करोल यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालात म्हटले आहे. अमरावतीच्या खासदार नवीन राणा यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बनावट आ...
सामूहिक बलात्कार पीडित दलित महिलेला भर कोर्टात कपडे उतरवायला सांगितले, राजस्थानच्या न्यायमूर्ती विरोधात गुन्हा दाखल
देश

सामूहिक बलात्कार पीडित दलित महिलेला भर कोर्टात कपडे उतरवायला सांगितले, राजस्थानच्या न्यायमूर्ती विरोधात गुन्हा दाखल

जयपूरः  सामूहिक बलात्कार पीडित दलित महिलेला भर न्यायालयात कपडे उतरवायला सांगणाऱ्या न्यायमूर्तीविरोधात राजस्थान पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. जखमा दाखवण्यासाठी या न्यायमूर्तीने भर कोर्टात सामूहिक बलात्कार पीडितेला कपडे उतरवायला सांगितल्याचा आरोप आहे. राजस्थानच्या सामूहिक बलात्कार पीडित दलित महिला तिचा जबाब नोंदवण्यासाठी ३० मार्च रोजी हिंदौनचे शहर न्यायदंडाधिकारी रविंद्र कुमार यांच्या न्यायालयात गेली होती. तुला झालेल्या जखमा पाहू दे म्हणत न्या. रविंद्र कुमार यांनी भर कोर्टातच कपडे उतरवायला सांगितल्याचा आरोप या सामूहिक बलात्कार पीडित दलित महिलेने केला आहे. न्यायदंडाधिकाऱ्याने मला जबाब नोंदवण्यासाठी बोलावले. मी माझा पूर्ण जबाब नोंदवला. जबाब नोंदवून मी बाहेर येऊ लागले. तेव्हा न्या. रविंद्र कुमार यांनी मला परत बोलावले आणि त्यांनी मला माझे कपडे उतरवायला सांगितले. मी माझे कपडे का काढ...
सीएसआर फंडातही भाजपने हात मारला, हा आकडा १,१४,४७० कोटींच्या घरातः शिवसेना ठाकरे गटाचा गंभीर आरोप
देश

सीएसआर फंडातही भाजपने हात मारला, हा आकडा १,१४,४७० कोटींच्या घरातः शिवसेना ठाकरे गटाचा गंभीर आरोप

मुंबईः  लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेसला १ हजार ८२३ कोटी रुपयांची रिकव्हरी नोटीस बजावण्यात आल्यामुळे राष्ट्रीयस्तरावर मोदी सरकारसह भाजपवर टिकास्त्र सोडले जात आहे. प्राप्तिकर विभागाची ही कारवाई म्हणजे अर्थ-भामट्यांचा दहशतवाद असल्याचे शिवसेनेच्या ठाकरे गटाने म्हटले आहे. भाजपने सीएसआर फंडातही हात मारला आहे व हा आकडा १, १४,४७० कोटी इतका आहे, असा गंभीर आरोपही ठाकरे गटाने केला आहे. भाजपने देशात सर्वच स्तरांवर आर्थिक अफरातफर केली आहे. त्याच अफरातफरीच्या पैशांवर त्यांचे राजकारण सुरू आहे. सीएसआर फंडातही भाजपने हात मारला आहे व हा आकडा १,१४,४७० कोटी इतका आहे. मनमोहन सरकारने २०१३ मध् एक कायदा केला. प्रत्येक कंपनीला २ टक्के लाभाचा पैसा सीएसआर म्हणजेच जनकल्याणाच्या कार्यात द्यावा लागेल. हा पैसा लोकांसाठी वापरायचा होता, पण भाजपने हा पैसा त्यांच्या खासगी स...
आजपासून नियम बदललेः आधीच महागाईचा मार, त्यात खिशावर पडणार नवा भार; वाचा कुठे बसणार तुमच्या खिशाला कशी चाट?
देश

आजपासून नियम बदललेः आधीच महागाईचा मार, त्यात खिशावर पडणार नवा भार; वाचा कुठे बसणार तुमच्या खिशाला कशी चाट?

नवी दिल्लीः  आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरूवात झाली आहे. म्हणजेच आज १ एप्रिलपासून पैशांशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होत आहेत. या बदलाचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. १ एप्रिलपासून कोणते नियम बदलणार आणि त्याचा तुमच्या खिशावर कसा थेट परिणाम होणार? हे पाहू या... व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात देशात सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे तेल वितरण कंपन्यांनी आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. आजपासून व्यावसायिक वापराचा एलपीजी गॅस सिलिंडर ३२ रुपयांनी स्वस्त झाला आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. तुमचा फास्टॅग सुरू आहे का? आजपासून म्हणजेच १ एप्रिलपासून फास्टॅगच्या नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. फास्टॅगची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२४ ही अंतिम...
पत्नीला ‘सेकंड हॅण्ड’ म्हणून हिणवले, न्यालायलायने पतीला ठोठावला ३ कोटी रुपयांचा दंड; दीडलाखाची दरमहा पोटगी!
देश

पत्नीला ‘सेकंड हॅण्ड’ म्हणून हिणवले, न्यालायलायने पतीला ठोठावला ३ कोटी रुपयांचा दंड; दीडलाखाची दरमहा पोटगी!

मुंबईः  शाब्दिक बाचाबाची, नावाने बोलावणे,एखाद्या मुद्यावरून एकमेकांचे न पटल्यामुळे मतभेद होणे हे कोणत्याही पती-पत्नीतील भांडणाचे सामान्य लक्षण. ज्या पती-पत्नीत अशी भांडणे होत नाहीत, ते पती-पत्नीच नाहीत, असेही काही जण म्हणतात. परंतु एका पतीने ‘सेकंड हॅण्ड’ म्हणून हिणवल्यामुळे त्याच्या पत्नीने थेट मुंबईतील महानगर दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात धाव घेतली आणि कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत नुकसान भरपाई मागितली. न्यायालयाने पतीला तब्बल तीन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आणि दरमहा  ७५ हजार रुपये घरभाडे तसेच १.५ लाख रुपये पोटगी देण्याचाही आदेश दिला. या जोडप्याचे जानेवारी १९९४ मध्ये मुंबईत लग्न जमले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत जाऊन विवाह सोहळा पार पाडला. २००५ मध्ये हे जोडपे मुंबईत परत आले आणि दोघांच्या मालकीच्या माटुंगा येथील घरात राहू लागले. परंतु दोघांचे वारंवार खटके उडू लागल्यामुळे २००८ म...
काँग्रेसला इन्कम टॅक्सची आणखी १,७०० कोटी रुपये रिकव्हरीची नोटीस, लोकसभा निवडणुकीत सर्वात जुन्या पक्षाची आर्थिक कोंडी
देश, राजकारण

काँग्रेसला इन्कम टॅक्सची आणखी १,७०० कोटी रुपये रिकव्हरीची नोटीस, लोकसभा निवडणुकीत सर्वात जुन्या पक्षाची आर्थिक कोंडी

नवी दिल्लीः इन्मक टॅक्स म्हणजेच प्राप्तिकर विभागाने काँग्रेस पक्षाला आणखी एक जबर झटका दिला आहे. प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला जवळपास १ हजार ७०० कोटी रुपये रिकव्हरीची नोटीस बजावली आहे. २०१७-१८ पासून ते २०२०-२१ या कालावधीसाठी प्राप्तिकर विभागाने ही नोटीस बजावली असून त्यात प्राप्तिकर, व्याज आणि दंडाचाही समावेश आहे. प्राप्तिकर विभागाच्या या कारवाईमुळे ऐन लोकसभा निवडणुकीतच देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाची आर्थिक कोंडी केली गेली आहे.  प्राप्तिकर विभागाच्या कारवाईविरुद्ध काँग्रेसने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु उच्च न्यायालयाने गुरूवारी काँग्रेसला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला होता. दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर अवघ्या काही तासांतच प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला ही नोटीस बजावली आहे. काँग्रेसने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून २०१७-१८ पासून २०२०-२१...
लोकसभा निवडणूकः पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात ७१ उमेदवारी अर्ज अवैध, ११० उमेदवारांचे अर्ज वैध
देश

लोकसभा निवडणूकः पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात ७१ उमेदवारी अर्ज अवैध, ११० उमेदवारांचे अर्ज वैध

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरूवारी झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील पाच मतदारसंघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. त्यात रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वेंचाही समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ३०  मार्च असून या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान होईल. विशेष म्हणजे गडचिरोली-चिमूर मतदारसंघात एकाही उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला नाही. मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या अशी: नागपूर- ५३ पैकी २६, भंडारा-गोंदिया- ४० पैकी २२, गडचिरोली-चिमूर- १२ पैकी १२, चंद्रपूर- ३५ पैकी १५ आणि रामटेक लोकसभा मतदार संघात ४१ पैकी ३५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. ...
पीएच.डी. प्रवेशासाठी आता ‘नेट’ परीक्षा अनिवार्य, देशातील विविध विद्यापीठांच्या पेट परीक्षा रद्दः यूजीसीचा महत्वाचा निर्णय
देश

पीएच.डी. प्रवेशासाठी आता ‘नेट’ परीक्षा अनिवार्य, देशातील विविध विद्यापीठांच्या पेट परीक्षा रद्दः यूजीसीचा महत्वाचा निर्णय

नवी दिल्लीः देशातील विविध विद्यापीठांकडून पीएच.डी. ला प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ‘पेट’ परीक्षा रद्द करण्यात आल्या असून आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच ‘नेट’ परीक्षेमार्फतच पीएच.डी.ला प्रवेश देणे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सहाय्यक प्राध्यापकपदावरील नियुक्तीबरोबरच पीएच.डी. प्रवेशासाठीही नेट अनिवार्य झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून वर्षातून दोनवेळा जून आणि डिसेंबर महिन्यात नेट परीक्षा घेण्यात येते. सध्या नेट परीक्षेचा स्कोअर ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) आणि सहाय्यक प्राध्यापकपदावर नियुक्तीसाठी पात्रतेसाठी वापरण्यात येतो. दुसरीकडे देशातील विविध विद्यापीठे पीएच.डी.च्या प्रवेशासाठी प्रवेश चाचणी परीक्षा म्हणजेच पेट परीक्षा घेत...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!