उद्धव ठाकरेंच्या मागेही ईडी, सीबीआयचा भुंगा लागणार का?, मुंबई उच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचेच लक्ष!
मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बेहिशेबी मालमत्तेची सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि सीबीआयमार्फत चौकशी करा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज बुधवारी सुनावणी होणार असून उच्च न्यायालय नेमका या निकाल देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दादरच्या रहिवासी गौरी भिडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. मुंबई पोलिसांत तक्रार देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही, त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आल्याचे भिडे यांनी म्हटले आहे. या याचिकेत केंद्र सरकार, राज्य सरकार, सीबीआय, ईडी, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. आर.एम. लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे. या दरम्यान हे खंडपीठ कोणते महत्वाचे निर्देश देत...




