रामदेव बाबांच्या दिव्य फार्मसीला एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दणकाः ७३ लाखांहून अधिक किंमतीचा ‘मिसब्रँडेड’ औषधसाठा जप्त
मुंबईः ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या (एफडीए) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच आक्षेपार्ह जाहिराती असलेल्या मिसब्रँडेड औषधीसाठ्याविरुद्ध एफडीएने राज्यभर धडक कारवाई सुरू केली असून या कारवाईचा सर्वात मोठा दणका योगगुरू बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसी या आयुर्वेदिक औषधे उत्पादन करणाऱ्या कंपनीला बसला आहे. एफडीने राज्यभरात ७ जिल्ह्यातील १२ आयुर्वेदिक औषधविक्री आस्थापनामध्ये धडक कारवाई करून दिव्य फार्मसीचा ७३ लाखांहून अधिक किमतीचा आक्षेपार्ह जाहिराती असलेला व मिसब्रँडेड औषध साठा जप्त केला आहे.
जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा आस्थापनेला प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. भ्रामक व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणे आणि अवैध औषध उत्पादन व विक्रीविरुद्धची कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल, असा स्पष्ट इशारा अ...










