शेतकरी तरूणाशी लग्न करायला मुली तयारच होईनात, सरपंचाने लढवली शक्कल; जाहीर केली अशी भन्नाट योजना!
अहमदनगरः शेतकरी हा जगाचा पोशिंदा, अन्नदाता अशा भारी भक्कम शब्दांत आपण सगळेच शेतकऱ्यांचे कौतुक करतो. परंतु त्याच शेतकऱ्याशी जेव्हा बेटी व्यवहार करण्याची वेळ आली तर मात्र काय करतो तुमचा मुलगा? शेती? असे म्हणून आपण ज्याची रोटी खातो, त्याच्याशी बेटी व्यवहार करायला मात्र सपशेल नकार देतो. ही समस्या महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच गावांत कमीअधिक प्रमाणात गंभीर स्वरुप धारण करू लागली आहे. यावर तोडगा म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील एका सरपंचाने शक्कल लढवली आणि एक भन्नाट योजना जाहीर केली आहे. सध्या ही योजना चांगलीच चर्चेत आहे.
गावातील शेतकऱ्यांच्या मुलांना मुली द्यायला कोणीच तयार होत नसल्यामुळे त्यांचे लग्न कसे व्हायचे? हा प्रश्न गंभीर बनत चालल्याचे पाहून एका सरपंचाने शक्कल लढवली आणि एक भन्नाट योजना जाहीर केली आहे. शेतकरी अर्धांगिनी योजना असे त्या योजनेचे नाव असून जी मुलगी शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न क...






