महाराष्ट्रात डोळ्यांच्या साथीचा उद्रेक, राज्यभर १ लाख ८७ हजारांहून अधिक रुग्ण; अशी घ्या काळजी!
पुणेः राज्यात डोळे येण्याच्या साथीचा उद्रेक झाला आहे. आतापर्यंत राज्यभरात १ लाख ८७ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. डोळे येण्याच्या साथीचे सर्वाधिक रुग्ण विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ जळगाव, अमरावती आणि पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे आरोग्य विभागाने ज्या भागात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत, अशा भागात सर्वेक्षण करून उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
आरोग्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डोळे येण्याच्या साथीचे सर्वाधिक ३० हजार ५९२ रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्या खालोखाल जळगाव जिल्ह्यात १२ हजार १३९, अमरावती जिल्ह्यात १० हजार ७१०, पुणे जिल्ह्यात १० हजार ५३१ आणि अकोला जिल्ह्यात १० हजार १३२ रुग्ण आढळून आले आहेत.
ग्रामीण भागाबरोबरच महानरातही डोळे येण्...










