ज्येष्ठ महिला प्राध्यापिकेने भरवर्गातच केले विद्यार्थ्याशी लग्न, व्हिडीओ व्हायरल होताच विद्यापीठाने पाठवले सक्तीच्या रजेवर; पहा व्हिडीओ
कोलकाताः एका ज्येष्ठ महिला प्राध्यापिकेने प्रथम वर्षाला शिकणाऱ्या आपल्याच विद्यार्थ्यासोबत भरवर्गातच ‘विधीवत’ लग्न केले. बंगाली पद्धतीने झालेल्या या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आणि नव्या वादाला तोंड फुटले. अनेकांनी या प्राध्यापिकेवर टिकेची झोड उठवली. पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील हरिंगहाटा येथील मौलाना अबुल कलाम आझाद तंत्रज्ञान विद्यापीठात (एमएकेएयूटी) घडली. या घटनेनंतर विद्यापीठाने त्या महिला प्राध्यापिकेला सक्तीच्या रजेवर पाठवले असून चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे.
प्रा. पायल बॅनर्जी या एमएकेएयूटीच्या हरिंगहाटा येथील तंत्रज्ञान महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागात ज्येष्ठ प्राध्यापिका आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओत वर्गात प्रा. पायल बॅनर्जी या नव्या नवरीसारख्या सजून धजून दिसत आहेत. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याशी त्या वर्गातच हिंदू बंगाली विवाहाच्या...









