उपजाती पाहून विवाह जुळवणाऱ्या बौद्ध व्यक्तींवर सामाजिक बहिष्कार घालाः बुद्ध विहार समन्वय समितीच्या अधिवेशनात महत्वाचा ठराव
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद): बौद्धांनी विवाह जुळवताना उपजाती किंवा पोटजातींना मान्यता देऊ नये, असे करणाऱ्या व्यक्तीवर सामाजिक बहिष्कार घालण्यात यावा, असा महत्वाचा ठराव बुद्ध विहारांच्या तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात घेण्यात आला. हा ठरावा सामाजिक बदलाच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगरातील संत एकनाथ रंगमंदिरात दोन दिवसीय बुद्ध विहारांचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. रविवारी या अधिवेशनाच्या समारोपाच्या सत्रात पाच महत्वाचे ठराव घेण्यात आले. त्यात महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी बौद्धांनी सार्वजनिक, खासगी कार्यक्रम तसेच मिरवणुकीत डीजेचा वापर करू नये, पाली विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी आणि विदेशातून भारतात आणण्यात येणाऱ्या बु...










