दररोज चार हजार पावले चाला आणि ह्रदयविकाराचा झटका, मृत्यूचा धोका टाळा!


नवी दिल्लीः दररोज किमान चार हजार पावले चालल्यामुळे ह्रदयविकाराचा झटका आणि मृत्यूचा धोकाही कमी होतो, असे नव्याने करण्यात आलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिंग कार्डिओलॉजीमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.

वजन नियंत्रणात राखण्यासाठी दररोज चालणे यापेक्षा अन्य चांगला पर्याय नाही. एवढेच नाही तर नियमित चालण्यामुळे अनेक आजारही आपल्यापासून दूर राहतात. प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान दहा हजार पावले चालायलाच हवे, असे आग्रहाने सांगितले जाते. यासंदर्भात नव्याने करण्यात आलेल्या संशोधनात दररोज किमान दीड ते दोन किलोमीटर पायी चालल्यामुळे आपल्यापासून अनेक आजार दूर राहतात, असा दावा करण्यात आला आहे.

दररोज पंधरा ते वीस मिनिटे आणि साधारणपणे किमान चार हजार पावले चालल्यामुळे ह्रदयविकार आणि मृत्यूचा धोका कमी होतो, असे नव्याने करण्यात आलेल्या संशोधनात म्हटले आहे. २ लाख २६ हजार ८८९ लोकांच्या दिनचर्येवर लक्ष ठेवून आणि विश्लेषण करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या संशोधनानुसार तुम्ही दररोज जेवढे चालता त्यामध्ये किमान एक हजार पावले अधिकचे चाललात तर तुमच्या मृत्यूचा धोका १५ टक्क्यांनी कमी होईल, असे म्हटले आहे.

एखाद्या औषधाप्रमाणे शरीराला पायी चालण्याचा फायदा मिळतो. तुम्ही दररोज ५०० पावले जास्त चालण्याचे ध्येय जरी ठेवले तरी तुमच्या मृत्यूचा धोका सात टक्क्यांनी कमी होतो, असे या संशोधनात म्हटले आहे.

तुम्ही जगाच्या कोणत्याही भागात म्हणजे समशीतोष्ण, उष्णकटीबंधीय किंवा उपध्रुवीय प्रदेश अथवा मिश्र हवामान असलेल्या प्रदेशात रहात असला तरी वयाची पर्वा न करता चालण्याचा व्यायाम स्त्री आणि पुरूषांना सारख्याच प्रमाणात लागू होतो, असे या संशोधनाचे प्रमुख प्रोफेसर मिसेज बनच यांनी म्हटले आहे.

कोणत्याही कारणांमुळे होणारे मृत्यू लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी दर दिवशी किमान चार हजार पावले चालणे आवश्यक आहे. ह्रदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित रोगांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी दररोज चार हजार पावले चालण्याचा मोठा फायदा होतो, असे प्रोफेसर बनच यांनी म्हटले आहे.

कसे चालावे?

कसे चालले म्हणजे त्याचा शरीराला अधिक फायदा होतो, हेही या संशोधनात सांगण्यात आले आहे. तुम्ही चालताना एकच गती कायम राखली तर त्याचा दुप्पट फायदा होतो, असेही या संशोधनात म्हटले आहे.

बीपी होतो कमी

दररोज चार हजार पावले चालण्यामुळे ब्लड प्रेशर५ एचजीने कमी होते. वरचे आणि खालचे असे दोन्ही ब्लड प्रेशर कमी होते. दररोज चार हजार पावले चालण्यामुळे  तीन महिन्याचे ब्लड प्रेशरचे प्रमाण अर्थात एचबीए-१ देखील खाली उतरते. शिवाय दररोज चार हजार पावले चालण्यामुळे तुम्ही अधिक तरूणही दिसता. कर्करोग, ह्रदयविकार यांचा धोकाही कमी होतो.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!