दुनिया

भविष्यातील डॉक्टर केवळ उपचार करणारे नव्हे, तर समाजाभिमुख आरोग्यदूत!
अभिव्यक्ती, दुनिया

भविष्यातील डॉक्टर केवळ उपचार करणारे नव्हे, तर समाजाभिमुख आरोग्यदूत!

वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला ओळख निर्माण करून देणाऱ्या ‘पल्स’ या वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे २७ व २८ मार्च २०२६ रोजी करण्यात येणार आहे. या परिषदेत देशातून आणि जगभरातून वैद्यक क्षेत्रातील २९०० पेक्षा जास्त तज्ज्ञ, अभ्यासक आणि मान्यवर सहभागी होणार आहेत.  या परिषदेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा हा विशेष लेख... -हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये मंत्री, महाराष्ट्र शासन पल्स वैद्यकीय परिषदेच्या माध्यमातून आरोग्य व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील नवोन्मेष, संशोधन पुढे येईल. या क्षेत्रात नवनवीन संकल्पना, कार्य करणाऱ्या स्टार्टअप्सलाही परिषदेत व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. जगभरातून उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक परिषदेत येणार आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्यवस्थेचा पाया अधिक बळकट करणे...
छत्रपती संभाजीनगरचे छायाचित्रकार बैजू पाटील यांना अमेरिकेतील प्रतिष्ठेचा ‘रिफोकस वर्ल्ड फोटोग्राफी अवॉर्ड’, जागतिक पुरस्कारावर प्रथमच भारतीयाचे नाव!
दुनिया, देश

छत्रपती संभाजीनगरचे छायाचित्रकार बैजू पाटील यांना अमेरिकेतील प्रतिष्ठेचा ‘रिफोकस वर्ल्ड फोटोग्राफी अवॉर्ड’, जागतिक पुरस्कारावर प्रथमच भारतीयाचे नाव!

न्यूयॉर्क: छत्रपती संभाजीनगरातील जागतिक किर्तीचे वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘रिफोकस वर्ल्ड फोटोग्राफी अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. जागतिकस्तरावरील या पुरस्कारावर आपली नाममुद्रा उमटवणारे बैजू पाटील हे पहिलेच वन्यजीव छायाचित्रकार ठरले आहेत. या पुरस्कारासाठी बैजू पाटील यांनी निसर्गाच्या अफाट विश्वातील एक 'दुर्मिळ क्षण' टिपण्यासाठी तब्बल १५ दिवस संयमी पाठलाग करून भरतपूरच्या अभयारण्यात टिपलेले छायाचित्र पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले. १०९ देशांतील हजारो दिग्गज छायाचित्रकारांना मागे टाकत बैजू पाटील यांनी मिळवलेले हे यश भारतीय छायाचित्रण क्षेत्रातील ऐतिहासिक सुवर्णक्षण ठरले आहे. राजस्थानातील भरतपूर अभयारण्यात बैजू पाटील यांनी एका अशा संघर्षाची गाथा कॅमेऱ्यात कैद केली, जी पाहून जागतिक स्तरावरील परीक्षकही थक्क झाले. पाण्याखाली शिकार करणारा ‘स्नेक बर्ड’ आणि त्य...
दरवर्षी वीजदरात ३ टक्के कपात करून ग्राहकांना स्वस्तात वीज देऊ, शेतकऱ्यांचे फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगा वॅट वीजनिर्मितीः फडणवीस
दुनिया, महाराष्ट्र

दरवर्षी वीजदरात ३ टक्के कपात करून ग्राहकांना स्वस्तात वीज देऊ, शेतकऱ्यांचे फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगा वॅट वीजनिर्मितीः फडणवीस

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): देशात महाराष्ट्र हे सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगा वॅट वीज निर्मिती करु. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी ३ टक्के कपात करुन ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो,असे आश्वसन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.  'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे. महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषीपंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठला. या विक्रमाची गिनीज बुकमध्ये यशस्वी नोंद झाली. गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा आज छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये ऑरिक सिटी मैदानावर पार पडला. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या विश्वविक्रमाची घोषणा करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड...
मोदी सरकारच्या सल्ल्यानुसार एलआयसीने अदानीला दिले ३२ हजार कोटी रुपये, कॉर्पोरेट मित्राला वाचवण्यासाठी वापरला गरिब-मध्यमवर्गीयांच्या विम्याचा पैसा!
दुनिया, देश

मोदी सरकारच्या सल्ल्यानुसार एलआयसीने अदानीला दिले ३२ हजार कोटी रुपये, कॉर्पोरेट मित्राला वाचवण्यासाठी वापरला गरिब-मध्यमवर्गीयांच्या विम्याचा पैसा!

नवी दिल्लीः या वर्षाच्या सुरूवातीलाच जेव्हा अदानी समूहाचे मालक गौतम अदानी प्रचंड कर्जात बुडाले होते, अमेरिकेमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करत होते आणि अनेक बड्या युरोपीयन व अमेरिकी बँका त्यांना मदत करण्यासाठी धजावत नव्हत्या, तेव्हा मोदी सरकार आणि सरकारी विमा कंपनी लाईफ इंन्श्योरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एलआयसी त्यांना सावरण्यासाठी पुढे आले होते. मोदी सरकारच्या योजनेनुसार एलआयसीने तेव्हा अदानी समूहाच्या उद्योगात तब्बल ३.९ अब्ज डॉलर्स म्हणजेच ३२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती, असा खळबळजनक दावा द वॉशिंग्टन पोस्टने केला आहे. एलआयसीमध्ये गरिब, मध्यमवर्गीय आणि ग्रामीण भागातील लोकांच्या विम्याचा पैसा गुंतवलेला असतो. त्यामुळे कॉर्पोरेट मित्राला वाचवण्यासाठी मोदी सरकारने गरिब व मध्यमवर्गीयांच्या घामाचा पैसा का वापरला?, असा सवाल केला जात आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्त...
श्रद्धेचा निकष लावून रामजन्मभूमी हिंदूंच्या हवाली, मग त्याच निकषांवर महाबोधी महाविहार बौद्धांच्या हवाली का करत नाही?: भीमराव आंबेडकर यांचा खडा सवाल
दुनिया, देश

श्रद्धेचा निकष लावून रामजन्मभूमी हिंदूंच्या हवाली, मग त्याच निकषांवर महाबोधी महाविहार बौद्धांच्या हवाली का करत नाही?: भीमराव आंबेडकर यांचा खडा सवाल

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  देशात कोणत्या जाती-धर्माचा पक्षकार आहे, हे पाहून न्याय दिला जात असून रामजन्मभूमी देशातील कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा विषय असल्याचे सांगत ती हिंदूंच्या हवाली करण्यात आली. परंतु बोधगयेतील महाबोधी महाविहार हा केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील कोट्यवधी बौद्धांच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय असतानाही रामजन्मभूमीचाच निकष लावून महाविहार बौद्धांच्या हवाली का केले जात नाही?  त्यासाठी पुराव्यांची मागणी केली का केली जाते? असा खडा सवाल अखिल भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी रविवारी केला. आपल्या प्रेरणादायी धम्मदेसनांद्वारे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्मितीसाठी धम्म प्रचार-प्रसाराच्या कार्याला वाहून घेतलेले भिक्खू करूणानंद थेरो यांचा महाथेरो विधान समारंभ आ...
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरातील ऑरिक सिटीत ‘ॲडव्हान्टेज महाएक्स्पो-२०२६’ औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन
दुनिया, देश

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरातील ऑरिक सिटीत ‘ॲडव्हान्टेज महाएक्स्पो-२०२६’ औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): येथील मसिआ व अन्य औद्योगिक संघटना, संस्थांच्या वतीने छत्रपती संभाजीनगरातील ऑरिक सिटीमध्ये ८ ते ११ जानेवारी २०२६  या कालावधीत ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो-२०२६ या औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे. या प्रदर्शनाची पूर्वतयारी सध्या सुरू असून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज या प्रदर्शनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. महाराष्ट्र शासनाचा सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभाग, ऑरिक सिटी तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्य सहयोगातून आयोजित करण्यात आलेल्या ॲडव्हान्टेज महाएक्स्पो-२०२६ या औद्योगिक प्रदर्शनात देशातील तसेच विदेशातील अनेक उद्योजक आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन लावणार आहेत. तसेच येथे सामंजस्य करार, चर्चासत्रे आदी होणार आहेत. हे प्रदर्शन ऑरिक सिटीच्या आवारात २७.५ एकर क्षेत्रात भव्य आयोजीत होणार आहे. त्यात १५०० स्टॉल्स लावण्यात येणार ...
नेपाळमधील उद्रेक फक्त डिजिटल स्वातंत्र्यासाठी की मदांध सत्तेला धडा शिकवण्यासाठी?
अभिव्यक्ती, दुनिया

नेपाळमधील उद्रेक फक्त डिजिटल स्वातंत्र्यासाठी की मदांध सत्तेला धडा शिकवण्यासाठी?

भारतात जवळजवळ संपूर्ण माध्यमे, मग ती प्रिंट असो वा इलेक्ट्रॉनिक-पूर्णपणे सरकारी झाली आहेत आणि सामान्य लोकांमध्ये ती 'गोदी मीडिया' म्हणून कुप्रसिद्ध आहेत. हाच प्रकार नेपाळमध्ये चालला होता. सोशल मीडियाद्वारेच लोकांना काही प्रमाणात योग्य माहिती मिळू शकत होती. त्यावर बंदी घालण्याची घोडचूक ओली सरकारने केली आणि या मुस्कटदाबीविरूध्द नेपाळी जनता पेटून उठली.  त्यापासून किमान नेपाळच्या शेजारी असलेल्या देशांनी तरी धडा घ्यायला हवा... प्रभाकर ढगे, आंतरराष्ट्रीय प्रश्नाचे अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार, पणजी गोदी मीडियाचा खोटा प्रचार नेहमीप्रमाणे जनतेच्या माथी मारण्यासाठी पंतप्रधान  के. पी. ओली सरकारने फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉटस्अप यासारख्या २६ सामाजिक माध्यमांवर बंदी घातली. त्याचा निषेध करत डिजीटल स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थी, तरुण तथा नागरिकांच्या ...
प्रधानमंत्री मोदींच्या अर्ध्या दिवसाच्या सौदी अरब दौऱ्यावर १५.५४ कोटी रुपये खर्च, हॉटेलचेच बिल तब्बल १० कोटी रुपये!
दुनिया, देश

प्रधानमंत्री मोदींच्या अर्ध्या दिवसाच्या सौदी अरब दौऱ्यावर १५.५४ कोटी रुपये खर्च, हॉटेलचेच बिल तब्बल १० कोटी रुपये!

नवी दिल्लीः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २२-२३ एप्रिल २०२५ रोजी केलेल्या १२ तासांच्या सौदी अरब दौऱ्यावर भारत सरकारचे तब्बल १५ कोटी ५४ लाख ३ हजार ७९२ रुपये खर्च झाले आहेत. विशेष म्हणजे या एकूण खर्चात हॉटेलचेच बिल १० कोटी २६ लाख ३९ हजार ६५८ रुपये आहे. आरटीआयमधून ही माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अजय बासुदेव बोस यांनी हा आरटीआय अर्ज दाखल केला होता. सौदी अरबच्या जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाकडून प्राप्त झालेल्या या माहितीमुळे प्रधानमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर होणाऱ्या सरकारी खर्चाबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. ‘द वायर’ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा सौदी अरबचा मूळ दौरा दोन दिवसांचा म्हणजे २२ व २३ एप्रिल २०२५ असा होता. परंतु जम्मू-काश्मिरातील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे त्यांना आपला हा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परत...
कोल्हापुरी चप्पल जीआय टॅगचे अधिकृत ‘स्वामित्व’ लिडकॉम व लिडकर महामंडळाकडेच, दोन्ही महामंडळाच्या एमडींचे स्पष्टीकरण!
दुनिया, देश

कोल्हापुरी चप्पल जीआय टॅगचे अधिकृत ‘स्वामित्व’ लिडकॉम व लिडकर महामंडळाकडेच, दोन्ही महामंडळाच्या एमडींचे स्पष्टीकरण!

मुंबई: कोल्हापुरी चप्पल या महाराष्ट्र व कर्नाटकातील पारंपरिक आणि ऐतिहासिक पादत्राणास जीआय  टॅग प्राप्त आहे. या जीआय टॅगचे अधिकृत नोंदणीकृत स्वामित्व संत रोहिदास लेदर इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड चर्मकार डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (लिडकॉम) आणि डॉ. बाबू जगजीवनराम लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (लिडकर) या दोन महामंडळाकडेच असल्याचे दोन्ही महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक यांनी स्पष्ट केले आहे. जून २०२५ मध्ये, इटलीच्या प्रसिद्ध 'प्राडा' ब्रँडने पुरुषांसाठी आपले 'स्प्रिंग/समर' कलेक्शन सादर केले. या फॅशन शोमध्ये मॉडेलने परिधान केलेल्या लेदर सँडल्सचे डिझाइन महाराष्ट्रातील पारंपरिक आणि जीआय नोंदणीकृत कोल्हापुरी चप्पलप्रमाणे अत्यंत साम्य दर्शवणारे असल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर सामाज माध्यमांवर व पारंपरिक कारागीर समूहांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर वकिलांच्या एका गटान...
जेएनयूच्या कुलगुरूंना केवळ गुजरातमधील परिषदेत गैरहजर राहिल्यामुळे केंद्राची नोटीस, माजी उपराष्ट्रपती धनखड यांच्या ‘उपस्थितीला प्राधान्य’ देणे भोवणार?
दुनिया, देश

जेएनयूच्या कुलगुरूंना केवळ गुजरातमधील परिषदेत गैरहजर राहिल्यामुळे केंद्राची नोटीस, माजी उपराष्ट्रपती धनखड यांच्या ‘उपस्थितीला प्राधान्य’ देणे भोवणार?

नवी दिल्लीः गुजरातमध्ये आयोजित केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या परिषदेला गैरहजर राहिल्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजेच जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतीश्री धुलीपुडी पंडित यांना नोटीस बजावली आहे. डॉ. पंडित यांची या परिषदेतील अनुपस्थिती गांभीर्याने घेत शिक्षण मंत्रालयाने त्यांना या अनुपस्थितीचे कारण विचारले आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी गुजरातमध्ये ही परिषद होती, त्याच दिवशी डॉ. पंडित या तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी उद्घाटन केलेल्या एका कार्यक्रमात सहभागी होत्या. जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतीश्री धुलीपुडी पंडित या १० व ११ जुलै रोजी गुजरातच्या केवडियामध्ये आयोजित केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या दोन दिवसीय परिषदेत सहभागी झाल्या नाहीत. या परिषदेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह विद्यापीठ अनुदान आयोगाचे अधिकारी, अन्...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!