शिंदेंच्या शिवसेनेच्या दुसऱ्या यादीत आयारामांना संधी, वरळीत आदित्य ठाकरेंविरुद्ध मिलिंद देवरा; भावना गवळींना उमेदवारी देऊन पुन्हा गेम?
मुंबईः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. २० उमेदवारांच्या या यादीत काही आयारामांना उमेदवारी दिली आहे. निलेश राणे, संतोष शेट्टी, मुरजी पटेल हे काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेत आले होते. त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेचे (उबाठा) विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने माजी खासदार, माजी मंत्री मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे माजी खासदार भावना गवळी यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या गटात आलेले निलेश राणे यांना कुडाळमधून, संतोष शेट्टी यांना भिंवडी पूर्वमधून तर मुरजी पटेल यांना अंधेरी पूर्वमधून उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीत या तिन्ही जागा शिंदेंना सुटल्यामुळे हे नेते शिवसेनेत आले होते.
लोकसभा निवडणुकीत तिकिट कापण्यात आल...