प्रधानमंत्री मोदी लाल किल्ल्यावरून कोणाला म्हणाले ‘दिमागी नक्षलवादी’?, विरोधी पक्ष की आंदोलक विद्यार्थ्यांना?; स्वातंत्र्यदिनीच फुटले नव्या वादाला तोंड!
नवी दिल्लीः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना ‘दिमानी नक्षलवादी’ या शब्दाचा वापर केला. ‘दिमागी नक्षलवाद्यां’पासून सतर्क राहण्याची आवश्यकता असून त्यांना वेगळे पाडले जाईल, असा इशारा प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या भाषणात दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘दिमागी नक्षलवादी’ ही संज्ञा नेमकी कोणासाठी वापरली? याबाबत काहीही स्पष्ट सांगितले नसले तरी मोदींनी वापरलेल्या या संज्ञेमुळे ऐन स्वातंत्र्यदिनीच नव्या वादाला तोंड फुटले आहे.
विशेष म्हणजे देशातील उजव्या विचारसरणीच्या कट्टरवाद्यांनी विरोधी पक्षनेते, देशातील सरकारविरोधी पत्रकार, रंगकर्मी, लेखक, कवि- शायर, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक इत्यादींना अर्बन ‘नक्षलवादी’ संबोधले होते. उजव्या विचारसणीच्या कट्टरतावाद्यांनीच देशात ‘अर्बन नक्षलवादी’ ही संज्ञा जन्मास घातली आणि त...










