जागतिक पर्यावरण दिन विशेषः फुलंब्री तालुक्यातील पोफळा ठरले मराठवाड्यातील पहिले सौरऊर्जा ग्राम!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): पर्यावरण संवर्धनाचा एक आयाम शून्य कार्बन उत्सर्जन हा ही आहे. त्यासाठी अपारंपारिक ऊर्जेचा वापर अधिकाधिक होणे आवश्यक आहे. शासन त्यास चालना देत आहेच. ह्या संकल्पनेचे महत्त्व जाणून आजच कृतिशील पावले उचलणाऱ्या संस्थाही आहेत. त्यापैकीच एक एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीस लि. या संस्थेने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा विनियोग करुन फुलंब्री तालुक्यातील पोफळा हे गाव संपूर्ण सौरग्राम केले आहे. संपूर्ण गाव सौर ऊर्जाद्वारे आपली विजेची गरज भागवीत आहे. असे हे मराठवाड्यातील पहिलेच गाव ठरले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातील पोफळा हे तसे लहानसे पण जरासे न्यारे गाव. अवघे ७७ उंबरठे असलेले हे गाव समुद्रसपाटीपासून ७२५ मीटर उंचीवर आहे. एन्ड्युरन्स टेक्नॉलीजी या कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे गाव संपूर्ण सौर ऊर्जेवर आणण्याचे ठरवले. त्य...









