मराठवाड्याच्या हितरक्षणासाठी डॉ. विजय फुलारींना कुलगुरूपदावरून हटवा, २० गंभीर मुद्यांचे ‘आरोपपत्र’ ठेवून अधिसभा सदस्यच करणार १३ जुलैपासून आमरण उपोषण
छत्रपती संभाजीनगरः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय जनार्दन फुलारी यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच त्यांच्या कार्यपद्धतीबाबत वेगवेगळे आक्षेप घेतले जात असतानाच आता प्राचार्यांशी अपमानास्पद वागणूक, लोकप्रतिनिधींची हेटाळणी, अधिकार मंडळात घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीस हटकून टाळाटाळ, प्रश्न उपस्थित करणाऱ्या अधिसभा सदस्यांवर दडपशाही, विद्यापीठातील प्रश्न चर्चेद्वारे सोडवण्याऐवजी संघर्षाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न असे विविध गंभीर स्वरुपाच्या २० मुद्यांचे आरोपपत्र ठेवून त्यांच्या कार्यकाळातील एकूणच कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी अधिसभा सदस्य डॉ. संजय कांबळे हे १३ जुलैपासूनच आमरण उपोषण करणार आहेत.
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक राहिलेले डॉ. विजय जनार्दन फुलारी यांची २४ जानेवारी २०२४ रोजी ...










