Blog

कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर, सुट्टी न दिल्यास होणार कारवाई
महाराष्ट्र

कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर, सुट्टी न दिल्यास होणार कारवाई

मुंबई: राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे परिपत्रक राज्य शासनाने जारी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे व २० मे, अशा पाच टप्प्यात या निवडणुकीचे मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या आदेशानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाह...
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द, हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय
महाराष्ट्र, राजकारण

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द, हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय

नागपूर: अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची अधिसूचना रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज दिले. या पोटनिवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर हा निर्ण देण्यात आला. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला एक वर्षापेक्षा कमी कालावधी असताना पोटनिवडणूक घेताच येत नाही, अशी कायद्यात तरतूद असल्याचा दावा करत अनिल दुबे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. या याचिकेवर न्या. अनिल किलोर व एम.एस.जवळकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. विधानसभा निवडणूक पाच-सहा महिन्यांवर असताना अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याची काय गरज आहे? ही पोटनिवडणूक घेऊन मतदारांना वेठीस धरले जात आहे आणि यंत्रणांवर अनावश्यक भार दिला जात आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वतीने करण्यात आला. चंद्रपूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघात एक वर्षाहून अधिक ...
लोकसभेला ४०० जागा मिळाल्यास संविधान बदलण्याची भाषा करणारे दिग्गज खासदार हेगडेंचे भाजपने तिकिट कापले!
देश, राजकारण

लोकसभेला ४०० जागा मिळाल्यास संविधान बदलण्याची भाषा करणारे दिग्गज खासदार हेगडेंचे भाजपने तिकिट कापले!

नवी दिल्लीः  ‘लोकसभा निवडणुकीत जर एनडीएला ४०० जागा मिळाल्या तर संविधान बदलू’ असे वादग्रस्त विधान करणारे कर्नाटकचे दिग्गज नेते आणि तब्बल सहा वेळा खासदार राहिलेले अनंतकुमार हेगडे यांचे भाजपने तिकिट कापले आहे. १० मार्च रोजी हेगडे यांनी हे विधान केले होते. त्यामुळे विरोधकांनी भाजपवर टिकास्त्र सोडले होते. या वादग्रस्त विधानामुळेच भाजपने त्यांचे तिकिट कापल्याचे मानले जात आहे. संविधान बदलण्याबाबत अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या विधानामुळे मोठे वादंग उठले होते. विरोधी पक्षांनी हाच मोठा मुद्दा करत भाजपला घेरले होते. विरोधकांकडून टिकेची झोड उठवण्यात आल्यानंतर भाजपने हेगडे यांच्या या विधानाशी असहमती दर्शवत अंग झटकले होते. अनंतकुमार हेगडे हे कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष आणि केंद्रात कॅबिनेट मंत्रीही राहिलेले आहेत. पक्षामध्ये अनुशासन सर्वांसाठी सारखेच आहे आणि गैरवाजवी विधाने केल्यास पक्ष ते खप...
‘जेएनयू’ छात्र संघावर डाव्यांचेच वर्चस्व, आरएसएसप्रणित अभाविपचा धुव्वा; तीन दशकांनंतर निवडला पहिला दलित अध्यक्ष!
देश, राजकारण

‘जेएनयू’ छात्र संघावर डाव्यांचेच वर्चस्व, आरएसएसप्रणित अभाविपचा धुव्वा; तीन दशकांनंतर निवडला पहिला दलित अध्यक्ष!

नवी दिल्लीः जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) छात्र संघाच्या निवडणुकीत आरएसएस समर्थित अभाविपचा दणदणीत पराभव करून डाव्या विद्यार्थी संघटनांच्या युनायटेड लेफ्टने दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे १९९६ नंतर प्रथमच डाव्या विचारांची पार्श्वभूमीवर असलेल्या पहिलाच दलित अध्यक्षाची निवड जेएनयू छात्र संघाने केली आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर जेएनयूचा परिसर जयभीम, लाल सलामच्या घोषणांनी दणाणून गेला. जेएनयू छात्र संघाच्या निवडणुकीत युनायटेड लेफ्ट पॅनलने आरएसएसशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) दारूण पराभव केला. या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव आणि सह-महासचिव ही चारही पदे युनायटेड लेफ्ट पॅनलने जिंकली आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन म्हणजेच आयसाचे उमेदवार धनंजय यांनी २ हजार ५९८ मते घेऊन विजय मिळवला. धनंजय यांनी त्यांचे नजीकचे प...
हिंगोलीत हेमंत पाटलांचा पत्ता कट? जागा भाजपकडे घेण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीसच घालणार केंद्रीय नेतृत्वाला गळ, तिढा कायम!
महाराष्ट्र, राजकारण

हिंगोलीत हेमंत पाटलांचा पत्ता कट? जागा भाजपकडे घेण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीसच घालणार केंद्रीय नेतृत्वाला गळ, तिढा कायम!

मुंबईः  हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यात चांगलीच ओढाताण सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातील भाजपचे अर्ध्या डझनाहून अधिक इच्छुक उमेदवार आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हिंगोलीत पुन्हा ही जागा हेमंत पाटलांना सोडण्यास विरोध दर्शवला. हिंगोलीची जागा भाजपसाठी सोडवून घ्या, आम्ही ती जिंकून दाखवू, असा विश्वासही भाजप पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांना दिला. हिंगोलीची जागा आपण कशी जिंकू शकतो, हे मी केंद्रीय नेतृत्वाला पटवून देतो. त्यानंतर वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे आश्वासन फडणवीसांनी दिल्याचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे हेमंत पाटलांच्या जागेवर टांगती तलवार आहे. महायुतीचे घटकपक्ष असलेल्या भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागावाटपाचा तिढा...
 प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही? शिवसेनेसोबतची युती तोडून ४ जागांची ऑफर परत करत म्हणाले…
महाराष्ट्र, राजकारण

 प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही? शिवसेनेसोबतची युती तोडून ४ जागांची ऑफर परत करत म्हणाले…

मुंबईः लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. काही मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. तरीही महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत युती करणार की नाही? हे अद्याप अस्पष्ट असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडली आणि २६ मार्चपर्यंत काय तो निर्णय घ्या, अन्यथा आम्ही आमची भूमिका जाहीर करू, अशी डेडलाईनही त्यांनी मविआला दिली. शिवसेनेसोबत वंचितची युती संपुष्टात आल्याची घोषणाही त्यांनी केली. महाविकास आघाडीला त्यांच्यातील जागावाटपाचा तिढा सोडवता येत नाही. त्यांनी आम्हाला चार जागा देऊ केल्या. त्या जागा मी त्यांना परत करतो. महाविकास आघाडीने २६ मार्चपर्यंत काय तो निर्णय घ्यावा. आम्हाला कळवावे. अन्यथा २६ मार्चला आम्ही आमची भूमिका जाहीर करू. २७ मार...
होळीनंतर राज्यात कडक उन्हाळा, पुढचे चार दिवस काळजीचे!
महाराष्ट्र

होळीनंतर राज्यात कडक उन्हाळा, पुढचे चार दिवस काळजीचे!

मुंबईः  होळीनंतर महाराष्ट्रात तापमानात वाढ होऊन कडक उन्हाळा जाणवेल. पुढचे चार दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता असून काळजी घेण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. २७ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि विदर्भासह राज्याच्या अनेक भागात उन्हाची काहिली जाणवण्याची शक्यता आहे. राज्यात उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसला असला तरी राज्याच्या उर्वरित भागात तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने उकाडा वाढला आहे. या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. देशभरात एकीकडे होळी साजरी करण्याची लगबग सुरू असताना महाराष्ट्रासह अन्य काही राज्यात उष्णतेत वाढ होत आहे. यंदाच्या होळीवर उष्णतेचा दाह जाणवेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोरड्या हवामानामुळे कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. तामिळनाडू ते विदर्भापर्यंत द्रोणीय स्थिती कायम आहे. त्य...
डॉ. शंकर अंभोरे यांचे अधिसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयाला हाय कोर्टाची स्थगिती; कुलगुरू, कुलसचिवांच्या मनमानीला चपराक!
महाराष्ट्र

डॉ. शंकर अंभोरे यांचे अधिसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयाला हाय कोर्टाची स्थगिती; कुलगुरू, कुलसचिवांच्या मनमानीला चपराक!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): प्रवर्ग बदलल्याचे कारण देऊन खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या विद्यापीठ प्रशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाचा हा निर्णय कुलगुरू डॉ. विजय फुलारी आणि कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी केलेल्या मनमानीला जबर चपराक मानला जात आहे. डॉ. शंकर अंभोरे हे जालन्याच्या दानकुंवर महिला महाविद्यालयात प्राध्यापक असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर अध्यापक गणातून निवडून आले होते.  पुढे अंभोरे हे ३ मे २०२३ रोजी खुलताबाद येथील येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी रूजू झाले. अध्यापक गणातून अधिसभेवर निवडून आलेले डॉ. अंभोरे हे प्राचार्य झाल्यामुळे...
आचारसंहितेचे उल्लंघन होतेय? मग तुम्हीही करा सी-व्हिजिल ऍपद्वारे बिनधास्त तक्रार, वाचा सविस्तर तपशील!
देश, राजकारण

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय? मग तुम्हीही करा सी-व्हिजिल ऍपद्वारे बिनधास्त तक्रार, वाचा सविस्तर तपशील!

मुंबई: भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या असून सात टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकांसाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे. आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काहीवेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी निवडणूक आयोगाने सी...
लोकसभेसाठी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्राच्या सात उमेदवारांचा समावेश, वाचा कोणत्या मतदारसंघात कोणाला संधी?
देश, राजकारण

लोकसभेसाठी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्राच्या सात उमेदवारांचा समावेश, वाचा कोणत्या मतदारसंघात कोणाला संधी?

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आज तिसरी उमेदवार यादी जाहीर केली. काँग्रेसच्या या यादीत महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा जागावाटप फॉर्म्युला अद्याप जाहीर झालेला नसताना काँग्रेसने सात उमेदवार जाहीर करून टाकले आहेत. काँग्रेसने जाहीर केलेल्या सात मतदारसंघांपैकी चार मतदारसंघ हे राखीव आहेत. काँग्रेसने गुरूवारी जाहीर केलेल्या ५७ जणांच्या तिसऱ्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील सात, गुजरातमधील ११, कर्नाटकमधील १७, राजस्थानमधील ६, तेलंगणमधील ५, पश्चिम बंगालमधील ८, आंध्र प्रदेशातील २ आणि पाँडेचरीतील एका उमेदवाराचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सात उमेदवार असे  कोल्हापूरः शाहू महाराज पुणेः रविंद्र धंगेकर नंदूरबारः गोवाल पाडवी सोलापूरः प्रणिती शिंदे लातूरः शिवाजी काळगे नांदेडः वसंत चव्हाण अमरावतीः बळवंत वानखेडे मविआच्या जा...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!