सहकार प्रशिक्षणासाठी राज्यभर एकसमान अभ्यासक्रमाची आखणी, प्रशिक्षणात करणार कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि डिजिटल व्यवहारांचा समावेश
मुंबई: राज्यातील सहकारी संस्थांचे कामकाज अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि आधुनिक करण्यासाठी सहकार शिक्षण व प्रशिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. राज्यातील शासनमान्य १७ प्रशिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमात समानता आणण्यासाठी ‘एक राज्य, एक मूलभूत अभ्यासक्रम’ ही संकल्पना राबवणे, प्रशिक्षण निधीच्या संकलनासाठी एक खिडकी पद्धत विकसित करणे आणि प्रशिक्षणाच्या गुणवत्तेनुसार निधीचे वितरण करणे आदी महत्वपूर्ण शिफारशींवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
बैठकीस सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, महाराष्ट्राचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, पुणे येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंटचे उपसंचालक डॉ. देवदत्त दिवेकर, नागपूर येथील धनंजयराव गाडगीळ सहकारी व्यवस्थापन स...










