ज्येष्ठ पत्रकार रविशकुमार यांचाही एनडीटीव्हीचा राजीनामा
नवी दिल्लीः एनडीटीव्हीचे संस्थापक डॉ. प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे आज बुधवारी एनटीडीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रविश कुमार यांनीही एनडीटीव्हीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे देशातील दर्शकांना एनडीटीव्ही इंडियावरील रात्री ९ वाजताचा त्यांचा प्राईम टाईम दिसणार नाही. हम लोग, रविश की रिपोर्ट, देश की बात असे गाजलेले शोही त्यांनी एनडीटीव्ही इंडियावर केले आहेत. कंपनीने त्यांचा राजीनामा तत्काळ मंजूर केला आहे.
रविश कुमार यांच्या इतका काही पत्रकारांनीच लोकांवर प्रभाव पाडला आहे. हे त्यांच्याबाबतच्या अफाट प्रतिक्रियांमधून प्रतिबिंबित होते. गर्दीतही ते सर्वत्र उठून दिसतात. भारत आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर त्यांना मिळालेले प्रतिष्ठेचे पुरस्कार आणि ओळख हे त्यातून स्पष्ट होते. रविश कुमार हे अनेक दशकांपासून एनडीटीव्हीचा अविभाज्य भाग राहिले आह...