साय-टेक

हेडफोन न लावता मोबाईलवर व्हिडीओ पाहिल्यास ५ हजार रुपये दंड, ३ महिने तुरूंगाची हवा!
जीवनशैली, साय-टेक

हेडफोन न लावता मोबाईलवर व्हिडीओ पाहिल्यास ५ हजार रुपये दंड, ३ महिने तुरूंगाची हवा!

मुंबईः  मोबाईल हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. परंतु काही जणांना मोबाईल कुठे आणि कसा वापरावा याचेही भान राहात नाही. काही जण तर रेल्वे, बस, मेट्रो किंवा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाज मोबाईलवर व्हिडीओ पाहताना आढळून येतात. आपल्यामुळे इतर लोकांना त्रास होतोय, याचेही भान न ठेवणाऱ्या मोबाईल वापरकर्त्यांना चाप लावण्यासाठी एक नवीन नियम आणण्यात आला आहे. या नियमानुसार तुम्ही जर हेडफोन न लावता मोबाईलवर व्हिडीओ पहात असाल तर तुम्हाला ५ हजार रुपये दंड आणि ३ महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. सार्वजनिक ठिकाणी होणारा गोंगाट हे हा नवीन नियम लागू करण्यामागचे कारण आहे. सहप्रवाश्याला त्रास किंवा असुविधा होऊ नये आणि गोंगाट थांबावा, हा या नियमामागचा हेतू आहे. रेल्वे, बस किंवा मेट्रोमधून प्रवास करताना अनेक जण मोठ्या आवाजात मोबाईलवर व्हिडीओ पहात असतात. त्याचा इतर प्रवाशांना नाहक त्रास ...
अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठी ऍल्युमिनियम फॉइल पेपर वापरताय? लगेच टाळा, अन्यथा होऊ शकतो हा गंभीर आजार!
जीवनशैली, साय-टेक

अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठी ऍल्युमिनियम फॉइल पेपर वापरताय? लगेच टाळा, अन्यथा होऊ शकतो हा गंभीर आजार!

मुंबईः तुम्ही चपात्या किंवा ब्रेड सॅण्डविच अथवा अन्न पदार्थ गुंडाळण्यासाठी ऍल्युमिनियम फॉइल पेपरचा वापर करताय का? करत असाल तर लगेच सावध व्हा. कारण हा पेपर तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतो. ऍल्युमिनियम फॉइल पेपरच्या वापरामुळे अल्झायमर हा गंभीर आजार होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. संशोधकांना अल्झायमरच्या रुग्णांमध्ये उच्च ऍल्युमिनियमचे प्रमाण आढळून आले आहे. ऍल्युमिनियम फॉइल पेर बहुतेक स्वयंपाक घरांमध्ये अगदी शंभर टक्के उपलब्ध असतो. विशेषतः ज्यांच्या घरात नोकरी-धंद्यानिमित्त बाहेर जाणारे लोक असतील तर अन्नपदार्थ गरम ठेवण्यापासून ते बेकिंगपर्यंत अनेक गोष्टींसाठी ऍल्युमिनियम फॉइल पेपरचा वापर केला जातो. पण या पेपरच्या वापरामुळे अल्झायमर हा गंभीर आजार होऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. काही संशोधनात असे आढळून आले आहे की, ऍल्युमिनयम फॉइल पेपर वापरल्यामुळे  अन्नातील ऍल्युम...
तुमचा मोबाईल फोन हॅक तर झाला नाही ना? जाणून घ्या फोन हॅक झाल्याची लक्षणे आणि उपाययोजना
साय-टेक

तुमचा मोबाईल फोन हॅक तर झाला नाही ना? जाणून घ्या फोन हॅक झाल्याची लक्षणे आणि उपाययोजना

मुंबईः  मोबाईल फोन आता सगळ्यांच्याच दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. काळाची गरज ओळखून मोबाईल फोन अधिकाधिक स्मार्ट होत चालले आहेत. त्यातच  आजकाल सर्वकाही डिजिटल होऊ लागले आहे. त्यामुळे मोठमोठे महत्वाचे व्यवहार आणि देवाणघेवाणही आजकाल स्मार्टफोनच्या माध्यमातूनच फोन बँकिंगद्वारे केली जाऊ लागली आहे. आपली महत्वाची सर्व कादगपत्रेही आपण मोबाईल फोनमध्येच ठेवू लागलो आहोत. अशात तर तुमचा मोबाईल फोन हॅक झाला तर?  किती मोठा तोटा होऊ शकतो याचा विचारच न केलेला बरा. या डिजिटल दुनियेत तुमचा स्मार्टफोन कोणत्याही खजिन्यापेक्षा कमी नाही. त्यामुळे हा खजिना लुटण्यासाठी हॅकर्स टपूनच बसलेले आहेत. मात्र काही खबरदारी घेऊन तुम्ही या लुटीपासून स्वतःला वाचवू शकता. पण तुमचा मोबाईल फोन हॅक झाला की नाही? हे कसे ओळखणार? ही आहेत मोबाईल फोन हॅक झाल्याची लक्षणे: बॅटरी झपाट्याने उतरत असेल तर... तु...
…अन्यथा तुमचा मोबाईल नंबर दोन वर्षांसाठी होऊ शकतो ब्लॉक, सीम कार्डचे नवीन नियम लागू!
देश, साय-टेक

…अन्यथा तुमचा मोबाईल नंबर दोन वर्षांसाठी होऊ शकतो ब्लॉक, सीम कार्डचे नवीन नियम लागू!

नवी दिल्लीः  स्पॅम आणि फ्रॉड कॉलला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले असून सीमकार्डचे नवीन नियम लागू केले आहेत. या नवीन नियमानुसार कोणताही यूजर आपल्या पर्सनल मोबाईल नंबरचा वापर प्रमोशन किंवा स्पॅम कॉलसाठी करत असेल तर त्याचा मोबाईल नंबर दोन वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर त्या पत्त्यावर नवीन सीम कार्डही जारी केले जाणार नाही. स्पॅम कॉल आणि फ्रॉड कॉलपासून मोबाईल वापरकर्त्यांना दिलासा देण्यासाठी योजना तयार करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिल्यानंतर ट्रायने २३ फेब्रुवारी रोजी एक बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वसंमतीने एक योजना तयार करण्यात आली असून या योजनेचेच रूपांतर नवीन सीम कार्ड नियमांत करण्यात आले आहे. या नव्या योजनेअंतर्गत ट्रायने प्रमोशन कॉलसाठी वेगळे १० डिजिटचे मोबाईल नंबर जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. या मोबाईल नंबरवरून प्रमोशन आणि स्पॅम कॉल ओळख...
वाढत्या उष्णतेच्या लाटांमुळे चिंता वाढली, शून्य मृत्यूचे उद्दिष्ट गाठण्यासाठी १३,१४ फेब्रुवारीला आयआयटी-मुंबईत विचारमंथन
देश, साय-टेक

वाढत्या उष्णतेच्या लाटांमुळे चिंता वाढली, शून्य मृत्यूचे उद्दिष्ट गाठण्यासाठी १३,१४ फेब्रुवारीला आयआयटी-मुंबईत विचारमंथन

मुंबई: अचानक येणारी वादळे, पाऊस आणि उन्हाळ्यात उष्णतेची लाट वाढत आहेत. गेल्या काही वर्षांपासून भारतात उष्णतेच्या लाटा वाढत आहेत ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर खूप मोठे परिणाम होत आहेत. आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे तसेच उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता आहे. यावर विचारमंथन करण्यासाठी मुंबईच्या आयआयटीमध्ये १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेत या विषयावर विचारमंथन केले जाणार आहे. ‘उष्णतेच्या लाटा-आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन करणे’ या विषयावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी मुंबई), नागपूर येथील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ आणि १४ फेब्रुवारी २०२३ रोजी कार्यशाळेचे ...
राज्यात प्लास्टिक बंदी आदेशात सुधारणाः एकल वापर स्ट्रॉ, ताट, कप, प्लेट्स, काटे, चमच्याच्या उत्पादन व वापरास परवानगी
महाराष्ट्र, साय-टेक

राज्यात प्लास्टिक बंदी आदेशात सुधारणाः एकल वापर स्ट्रॉ, ताट, कप, प्लेट्स, काटे, चमच्याच्या उत्पादन व वापरास परवानगी

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून, नव्या निर्णयामुळे विघटनशील (कंपोस्टेबल) पदार्थापासून बनवण्यात आलेले आणि एकदाच वापर होणाऱ्या स्ट्रॉ, ताट, कप, प्लेटस, ग्लासेस, काटे, चमचे, भांडे, वाडगा, कन्टेनर आदी वस्तूंच्या उत्पादनास अनुमती देण्यात आली आहे. अशी माहिती, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग सचिव प्रविण दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये सुधारणेबाबत माहिती देण्यासाठी मंत्रालय वार्ताहर संघात पर्यावरण विभागाचे संचालक अभय पिंपरकर, उपसचिव, चंद्रकांत विभुते, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नंदकुमार गुरव यावेळी उपस्थित होते. प्लास्टिक आणि थर्माकोल उत्पादन बंदीबाबत पर्यावरण विभागाच्या शक्तीप्रदत्त समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बै...
क्रीडा प्रमाणपत्रांची आता होणार ऑनलाईन पडताळणी; बनावट प्रमाणपत्रांवर नोकरी व सवलती  मिळवणाऱ्यांवर बसणार चाप!
महाराष्ट्र, साय-टेक

क्रीडा प्रमाणपत्रांची आता होणार ऑनलाईन पडताळणी; बनावट प्रमाणपत्रांवर नोकरी व सवलती  मिळवणाऱ्यांवर बसणार चाप!

मुंबई: राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडूंच्या क्रीडा प्रमाणपत्रांची वैधता पडताळणी आता ऑनलाईन होणार असून यासाठी क्रीडा विभागाने विकसित केलेल्या ऑनलाईन प्रणालीचे उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रणालीमुळे बनावट प्रमाणपत्रे मिळवून त्याआधारे सरकारी कोट्यातून नोकरी किंवा सवलती मिळवण्याच्या प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा आहे. महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी या प्रणालीचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव रणजीतसिंह देओल, क्रीडा व युवक सेवा आयुक्त डॉ.सुहास दिवसे, उपसचिव सुनिल हंजे, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल व कुस्ती खेळांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त राज्यातील खेळाडूंना क्रीडा विभागामार्फत शासकीय व निमशासकीय सेवेत ५ टक्के आरक्षण देण्यात आले...
व्हॉट्सअपची सेवा तब्बल दोन तासांनंतर पुन्हा सुरू, अस्वस्थ यूजर्सना मोठा दिलासा!
साय-टेक

व्हॉट्सअपची सेवा तब्बल दोन तासांनंतर पुन्हा सुरू, अस्वस्थ यूजर्सना मोठा दिलासा!

मुंबईः भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १२ वाजता डाऊन झालेल्या व्हॉट्सअपची सेवा तब्बल दोन तासांनंतर पुन्हा पूर्ववत झाली आहे. भारतात व्हॉट्सअपचे सर्व्हर क्रॅश झाल्यामुळे लोकांना एकमेकांना मेसेज पाठवता येत नव्हते. त्यामुळे लक्षावधी यूजर्स हैराण झाले होते. अखेर ही सेवा पुन्हा सुरू झाल्याने भारतातील यूजर्सनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.  आज मंगळवारी दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मेसेज पाठवण्यात काही यूजर्सना अडचणी यायला सुरूवात झाली होती. त्यानंतर काहीवेळाने पर्सनल मेसेजही पाठवता येत नव्हते. त्यामुळे व्हॉट्सअप बंद पडले की काय? अशी विचारणा अनेक यूजर्स फेसबुक आणि ट्विटरवर येऊन करू लागले होते. काही जणांनी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गंमतीशीर मीम्सही शेअर केले होते. हेही वाचाः भारतात व्हॉट्सअपचे सर्व्हर डाऊन, कोट्यवधी यूजर्स हैराण!  तांत्रिक बिघाड झाल्यामुळे व...
भारतात व्हॉट्सअपचे सर्व्हर डाऊन, कोट्यवधी यूजर्स हैराण!
साय-टेक

भारतात व्हॉट्सअपचे सर्व्हर डाऊन, कोट्यवधी यूजर्स हैराण!

मुंबईः जगभरात कोट्यवधी यूजर्स असलेले लोकप्रिय सोशल मेसेंजिग ऍप व्हॉट्सअप भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२ वाजेच्या सुमारास डाऊन झाले. तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअप डाऊन झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकानंतर एक मेसेज फॉर्वर्ड करण्याची सवय असलेले अनेक यूजर्स व्हॉट्सअप बंद पडलंय का? अशी विचारणा फेसबुक आणि ट्विटरवर करू लागले आहेत. दुपारी १२ वाजेपासून व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मेसेज पाठवता येत नव्हते. काही काळानंतर मात्र व्हॉट्सअपचे पर्सनल चॅटही बंद झाले आहे. भारतातील लक्षावधी यूजर्सना ही समस्या येत असल्याचे मेसेज फेसबुक आणि ट्विटरवर पडू लागले आहेत. गेल्या काही वेळापासून व्हॉट्सअपच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले जात आहे. या तांत्रिक बिघाडासंदर्भात व्हॉट्सअपकडून अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे हा बिघाड नेमका कधी दुरूस्त होईल? याबाबत का...
कर्नाटकात पुढील वर्षीपासून पदवीस्तरावर सायबर सुरक्षा अनिवार्य विषय
देश, विशेष, साय-टेक

कर्नाटकात पुढील वर्षीपासून पदवीस्तरावर सायबर सुरक्षा अनिवार्य विषय

बेंगळुरूः कर्नाटकमध्ये पुढील शैक्षणिक वर्षांपासून सर्व पदवी अभ्यासक्रमांत सायबर सुरक्षा हा अनिवार्य विषय असेल, अशी घोषणा शुक्रवारी कर्नाटकच्या उच्चशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. बी. थिमेगौडा यांनी केली. कर्नाटकचे उच्चशिक्षण आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांच्या प्रमुख उपस्थितीत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम-२०२२ला आरंभ झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. उच्चशिक्षण क्षेत्रातील सध्याच्या माहिती तंत्रज्ञान आणि संगणक विज्ञान या अभ्यासक्रमांच्या व्यतिरिक्त नवा सायबर सुरक्षा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. या वर्षी सरकारने नॅसकॉमच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल फ्लुएन्सी हे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहेत, असे थिमेगौडा यांनी सांगितले. सर्व प्रकारच्या पदवी अभ्यासक्रमांत हे विषय अनिवार्य आहेत. माहिती तंत्रज्ञानमंत्री नारायण म्...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!