शरद पवार म्हणजे जादूटोणा करणारा भोंदूबाबाः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे वादग्रस्त वक्तव्य
साताराः उद्धव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जादूटोणा केला आहे. ते शरद पवारांकडे गेले होते. शरद पवारांच्या तावडीत सापडलेला सुटत नाही. जादूटोणा करणारा बाबा देशाला आणि महाराष्ट्राला माहीत आहे, असे वादग्रस्त आणि बेछूट वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. ते सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
चंद्रशेखर बावनकुळे हे सातारा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला आहे. त्यात ते अडकले. त्यामुळेच ते त्यांच्यासोबत आहेत. या जादूटोण्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्यासारखाच विचार करू लागले आहेत. या पक्षातील भोंदूबाबाच्या ताब्यात कोणी आले तर तो सुटत नाही. भोंदूबाबा कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे. ते पुन्हा सांगण्याची गरज नाही, असेही बावनकुळे म्ह...