Blog

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात १०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह, मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय
महाराष्ट्र

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात १०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह, मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

मुंबई: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात १०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक समितीचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, सामान्य प्...
‘भामटेगिरी’ फसली: ‘डॉ.बामु’च्या वादग्रस्त कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांचा राजीनामा
महाराष्ट्र, विशेष

‘भामटेगिरी’ फसली: ‘डॉ.बामु’च्या वादग्रस्त कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांचा राजीनामा

औरंगाबाद: राजपूत भामटा जातीचे बनावट प्रमाणपत्रामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वादग्रस्त कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी अखेर राजीनामा दिला. त्यांच्या ठिकाणी केमिकल टेक्नॉलॉजीचे प्रा. डॉ. भगवान साखळे यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे.डॉ. जयश्री सूर्यवंशी या जन्माने मराठा जातीच्या आहेत. आंतरजातीय विवाह केल्यानंतर त्यांनी राजपूत भामटा जातीचे बनावट प्रमाणपत्र काढले. याच बनावट जातप्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी डॉ. इं.भा. पाठक महिला महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळवली. या अनुभवाच्या जोरावरच त्या पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव झाल्या. ही 'भामटेगिरी' उघडकीस आल्यानंतर डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी आपल्याकडे असलेले राजपूत भामटा जातीचे प्रमाणपत्र केवळ 'शोभेची वस्तू' असून त्याचा आपण कुठेही वापर केला नसल्याचा बचा...
पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांना धक्काः न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ
महाराष्ट्र, राजकारण

पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांना धक्काः न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ

मुंबईः पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना न्यायालयाकडून आणखी एक धक्का बसला आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालयनालयाने (ईडी) संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी अटक केली होती. संजय राऊत यांनी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर २७  सप्टेंबरला सुनावणी पार पडली होती. मात्र, न्यायालयाने संजय राऊत यांना दिलासा दिला नव्हता. न्यायालयाने ही सुनावणी १० ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे. गोरेगावच्या पत्राचाळीतील १ हजार ३९ कोटी रुपयांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊत यांचा सहभाग असल्याचा दावा ईडीने केला आहे. पत्राचाळ पुनर्विकासात खासदार संजय र...
हॅलो नव्हे – वंदे मातरम्!
अभिव्यक्ती

हॅलो नव्हे – वंदे मातरम्!

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यभरात ‘हॅलो नव्हे - वंदे मातरम्’ या अभियानाचा शुभारंभ झाला असून अभियानाविषयी... वर्षा फडके-आंधळे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात २ ऑक्टोबरपासून ‘हॅलो नव्हे - वंदे मातरम्’ या अभियानाचा शुभारंभ झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यभरात हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजेच गांधी जयंती दिनीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ वर्धा येथून झाला.  ‘जनगणमन’हे आपले राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गाणे हे सर्वमान्य झाले आहे. आजही अनेक शासकीय कार्यालयांत संपर्क साधल्यास अधिकारी व कर्मचारी यांच्या संवादास ‘हॅलो’ या शब्दाने सुरुवात होते. काही ठिकाणी ‘जय हिंद’ तर ...
अमेरिकेत भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या हत्येने खळबळ!
दुनिया

अमेरिकेत भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या हत्येने खळबळ!

कॅलिफोर्नियाः अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील एका फळबागेत भारतीय वंशाच्या कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  मृतांमध्ये आठ महिन्यांच्या मुलीचाही समावेश आहे. हे कुटुंब काही दिवसांपासून बेपत्ता होते. आठ महिन्यांच्या आरोही धेरीसह तिची आई २७ वर्षीय जसलीन कौर आणि वडिल जसदीपसिंग यांचे उत्तर कॉलिफोर्नियातील मर्सेड काऊंटीच्या एका ट्रॅकिंग कंपनीमधून अपहरण करण्यात आले होते, अशी माहिती मर्सेड काऊंटी पोलिसांनी दिली.  या चौघांचे मृतदेह इंडियाना आणि हुतचीन्सन रस्त्यावरील एका फळबागेत बुधवारी आढळून आले. फळबागेतील एका शेतमजुराला हे मृतदेह आढळून आले होते. या घटनेमुळे येत असलेला राग शब्दांत सांगू शकत नाही, असे शेरीफ वार्न्के या पोलिस अधिकाऱ्याने दिली. या कुटुंबाचे अपहरण करतानाचा व्हिडीओ पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओत जसदीप आणि अमनदीप हे हाताला बांधलेल्या अवस्थ...
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी अननसाचा रस फायदेशीर
जीवनशैली

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी अननसाचा रस फायदेशीर

मुंबई: शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी ज्यूसचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. ज्यूसमधील पोषक तत्त्वे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. बहुतेक लोक मोसंबी आणि डाळिंबाचा रस पिणे पसंत करतात; परंतु हा रस जास्ती गोड असल्यामुळे मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी अननसाचा रस अधिक फायदेशीर ठरू शकते. अननसात (Pineapple) ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. अननस हे लिंबूवर्गीय फळ असून ते चरबीदेखील कमी करण्यास मदत करते. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मधुमेह आणि उच्च रक्तदाब होऊ शकतो. लिंबूवर्गीय फळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यामध्ये अननस हा सर्वांत उत्तम पर्याय मानला जातो. अननसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’...
कर्नाटकात पुढील वर्षीपासून पदवीस्तरावर सायबर सुरक्षा अनिवार्य विषय
देश, विशेष, साय-टेक

कर्नाटकात पुढील वर्षीपासून पदवीस्तरावर सायबर सुरक्षा अनिवार्य विषय

बेंगळुरूः कर्नाटकमध्ये पुढील शैक्षणिक वर्षांपासून सर्व पदवी अभ्यासक्रमांत सायबर सुरक्षा हा अनिवार्य विषय असेल, अशी घोषणा शुक्रवारी कर्नाटकच्या उच्चशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. बी. थिमेगौडा यांनी केली. कर्नाटकचे उच्चशिक्षण आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांच्या प्रमुख उपस्थितीत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम-२०२२ला आरंभ झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. उच्चशिक्षण क्षेत्रातील सध्याच्या माहिती तंत्रज्ञान आणि संगणक विज्ञान या अभ्यासक्रमांच्या व्यतिरिक्त नवा सायबर सुरक्षा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. या वर्षी सरकारने नॅसकॉमच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल फ्लुएन्सी हे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहेत, असे थिमेगौडा यांनी सांगितले. सर्व प्रकारच्या पदवी अभ्यासक्रमांत हे विषय अनिवार्य आहेत. माहिती तंत्रज्ञानमंत्री नारायण म्...
राजधानी दिल्लीत नाइट लाइफः ३०० पेक्षाजास्त आस्थापना २४ तास सुरू राहणार
जीवनशैली, देश, विशेष

राजधानी दिल्लीत नाइट लाइफः ३०० पेक्षाजास्त आस्थापना २४ तास सुरू राहणार

नवी दिल्लीः मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याचे युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांचे स्वप्न राजधानी दिल्लीतही साकार होणार आहे. दिल्लीतील ३०० पेक्षा जास्त आस्थापना २४ तास सुरू ठेवता येणार आहेत. यामध्ये रेस्टॉरंट्सपासून मेडिकलची दुकाने, परिवहन सेवा, बीपीओ आणि ऑनलाइन डिलिव्हरीचा समावेश आहे. या श्रेणीतील दुकानांनी २४ तास सुरू ठेवण्याच्या परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना पुढील आठवड्यापासून परवानगी दिली जाणार आहे.  दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी ३१४ आस्थापनांना २४ तास सुरू ठेवण्याची सूट देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामधील काही प्रस्ताव २०१६ पासून प्रलंबित होते. आता उपराज्यपालांनी दिलेल्या निर्देशांनुसार यासंबंधीची अधिसूचना सात दिवसांच्या आत जारी करावी. या निर्णयानंतर मोठ्या शहरांमध्ये प्रचलित असलेल्या ‘नाइट लाइफ’ संस्कृतीलाही चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे. यामध्...
सरकारचा निर्णय आहे, सरकारनेच ठरवावेः हल्लेखोर एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयावर शरद पवार
महाराष्ट्र, राजकारण

सरकारचा निर्णय आहे, सरकारनेच ठरवावेः हल्लेखोर एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयावर शरद पवार

नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ला करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळातील बडतर्फ ११८ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतला आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता सरकारचा निर्णय आहे, सरकारनेच ठरवावे, अशा मोजक्या शब्दांत शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. या हल्ल्याचा आरोप असलेल्या ११८ एसटी कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने घेतला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच शरद पवार यांनी मात्र अगदी मोज...
राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाहीः अजित पवारांचे मोठे वक्तव्य
राजकारण

राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाहीः अजित पवारांचे मोठे वक्तव्य

पिंपरीः राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नाही, आमदारांना निवडणुकांचा खर्च परवडणारा नाही, असे मोठे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते पिंपरीत पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नाही. दोन वर्षे कोरोनामुळे गेली. आता कुठे सुरळीतपणे काम सुरू झाले आहे. निवडणुकांमध्ये किती खर्च करावा लागतो, याची जाणीव आमदारांना आहे. त्यामुळे कोणालाही मध्यावधी निवडणुका परवडणाऱ्या नाहीत. विद्यमान आमदार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करतील, असे वाटते, असे अजित पवार म्हणाले. मुदत संपलेल्या जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत. मात्र राज्य सरकार जाणीवपूर्वक निवडणुका लांबणीवर टाकत आहे. या निवडणुका घेण्यासाठी वेळ लावण्याचे काहीच कारण नाही. मुंबईतील अंधेरी विधानसभेची...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!