एफडीएच्या २१ अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश, राज्य सरकारच्या कारवाईमुळे अन्न व औषधी प्रशासन विभागात खळबळ
मुंबई: प्रतिबंधित तंबाखूजन्य प्रकरणात झालेल्या कारवाईची प्रक्रिया, अधिकाऱ्यांची भूमिका आणि प्रशासकीय कार्यपद्धतीतील अनियमितता यांची गंभीर दखल घेत या प्रकरणात राज्य शासनाने अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. आणखी २१ अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याची कारवाई केली आहे. एकूण २५ अधिकारी प्रशासकीय कारवाईच्या कक्षेत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. राज्य सरकारच्या या कारवाईमुळे अन्न व औषधी प्रशासन विभागात खळबळ उडाली आहे.
ठाणे येथील मेसर्स हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपी आणि मावळ तालुक्यातील मेसर्स सोएक्स इंडिया प्रा. लि. या कंपन्यांवर केलेल्या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत गंभीर अनियमितता केली. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे ...






