Author: न्यूजटाऊन टीम

विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला उच्च न्यायालयाची स्थगितीः मुलाखती घ्या, पण निवड यादी तयार करू नका; ११ फेब्रुवारीच्या जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवर खंडपीठाचे आदेश
महाराष्ट्र, विशेष

विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला उच्च न्यायालयाची स्थगितीः मुलाखती घ्या, पण निवड यादी तयार करू नका; ११ फेब्रुवारीच्या जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवर खंडपीठाचे आदेश

छत्रपती संभाजीनगरः  राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ११ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाआधारे होऊ घातलेल्या प्राध्यापक भरतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चाप लावला असून या शासन निर्णयाआधारे सुरू असलेली मुलाखतीची प्रक्रिया सुरू ठेवा, परंतु कोणत्याही संवर्गातील निवड यादी तयार करू नका, असे आदेश न्या. नितीन सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला दिले आहेत. याच शासन निर्णयाच्या आधारे राज्यातील सर्वच सार्वजनिक विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू असून उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे ती सर्वच भरती प्रक्रिया अनिश्चिततेचे सावटात सापडण्याची शक्यता आहे. यूजीसी कायद्याच्या कलम २६ अं...
नागरी सहकारी वित्त विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवणारः केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची घोषणा
देश, महाराष्ट्र

नागरी सहकारी वित्त विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवणारः केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची घोषणा

मुंबई: नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बनवण्यासाठी ‘अंब्रेला ऑर्गनायझेशन’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक तहसीलपर्यंत नागरी सहकारी बँकिंगचे जाळे विस्तारण्याला मोठी चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी आज व्यक्त केला. देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्यांनी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येईल अशी घोषणा केली. मुंबईच्या बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित ‘सहकार नव-क्रांती मेळावा' कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पणन मंत्री जयकुमार रावल, सहकार ...
सीएचबीवरील प्राध्यापक प्रकरणात उच्च शिक्षण संचालकांना खडबडून जाग: मान्यता, मानधनात हयगय केल्यास शिस्तभंगाची कारवाई; नियुक्त्यांतील विलंबावर मात्र मौनच!
महाराष्ट्र, विशेष

सीएचबीवरील प्राध्यापक प्रकरणात उच्च शिक्षण संचालकांना खडबडून जाग: मान्यता, मानधनात हयगय केल्यास शिस्तभंगाची कारवाई; नियुक्त्यांतील विलंबावर मात्र मौनच!

पुणेः राज्यातील तासिकातत्वारील प्राध्यापकांच्या नियुक्त्या, मान्यता आणि मानधन वितरणातील विलंबास जबाबदार धरून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा मिळताच उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर खडबडून जागे झाले असून त्यांनी १४ ऑगस्टपर्यंत तासिकातत्वावरील प्राध्यापकांच्या मान्यतेचे प्रस्ताव निकाली न काढणाऱ्या विद्यापीठातील जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची तर मानधन वितरणास विलंब करणाऱ्या प्राचार्यांचे वेतन रोखण्याची आणि विभागीय सहसंचालकांविरुद्धही शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली आहे. परंतु १७ ऑक्टोबर २०२२ च्या शासन निर्णयाचे उल्लंघन करून या प्राध्यापकांच्या नियुक्त्याच वेळेत न करणाऱ्यांविरुद्ध काय कारवाई करणार? याबाबत मात्र त्यांनी मौन धारण केले आहे. यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीडमहिना उलटला तरी अनेक महाविद्यालयांत तासिकातत्वारील प्राध्यापकांच्या नियुक्त्याच झालेल्या नाहीत. परिण...
कंत्राटी प्राध्यापक भरतीच्या टीईटी परीक्षेतही महाघोटाळा, अर्ध्या गुणाचे निगेटिव्ह मार्किंग असताना उमेदवारांना भलतेच गुण दिल्यामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह!
महाराष्ट्र, विशेष

कंत्राटी प्राध्यापक भरतीच्या टीईटी परीक्षेतही महाघोटाळा, अर्ध्या गुणाचे निगेटिव्ह मार्किंग असताना उमेदवारांना भलतेच गुण दिल्यामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह!

छत्रपती संभाजीनगरः  नीट पेपरफुटीसह देशातील विविध स्पर्धा परीक्षांतील घोटाळ्यांमुळे देशभरातील वातावरण तापले असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कंत्राटी प्राध्यापक भरतीसाठी घेतलेल्या ऑनलाइन पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेतही महाघोटाळा झाल्याचे सज्जड पुरावे न्यूजटाऊनच्या हाती आले असून या परीक्षेत अर्ध्या गुणाचे निगेटिव्ह मार्किंग असताना प्रत्यक्षात उमेदवारांना भलतेच गुण देण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्यामुळे या परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर आणि धाराशिव उपपरिसरातील विविध शैक्षणिक विभागांमध्ये ३२ हजार रुपये प्रतिमहिना एकत्रित वेतनावर ११ महिन्यांच्या कालावधीसाठी एकूण १४१ कंत्राटी सहायक प्राध्यापकांच्या नियुक्ती करिता अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज केलेल्या उमेदवारांची ३ व ४ ऑ...
जालन्याच्या म. फुले समाजकार्य महाविद्यालयात मोठी लाचखोरी, सेवानिवृत्तीच्या लाभासाठी निवृत्त प्रबंधकाकडून दीडलाखांची लाच स्वीकारताना प्राचार्यांसह पाच कर्मचाऱ्यांना बेड्या!
महाराष्ट्र, विशेष

जालन्याच्या म. फुले समाजकार्य महाविद्यालयात मोठी लाचखोरी, सेवानिवृत्तीच्या लाभासाठी निवृत्त प्रबंधकाकडून दीडलाखांची लाच स्वीकारताना प्राचार्यांसह पाच कर्मचाऱ्यांना बेड्या!

जालनाः राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयात कार्यरत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे संस्थाचालकांकडून पदोपदी कसे आर्थिक शोषण केले जाते याचीच साक्ष देणारी लाचखोरीची मोठी घटना आज जालना येथील महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयात घडली. तब्बल वर्षभरापूर्वी प्रबंधकपदावरून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला अर्जित रजांच्या रोखीकरणासह सेवानिवृत्तीचे अन्य लाभ देण्यासाठी १ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना या महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह पाच कर्मचाऱ्यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडून बेड्या ठोकल्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जालन्याच्या परिवर्तन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने १९९३ पासून जालन्यातच महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय हे अशासकीय अनुदानित महाविद्यालय चालवण्यात येते. रिपाइंचे राष...
चंद्रकांतदादांच्या उच्च शिक्षण विभागाच्या ‘बाताच मोठ्या अन् कृती शून्य’: आता राज्याचे संचालक डॉ. देवळाणकरांविरूद्ध दाखल होणार फौजदारी गुन्हा?
महाराष्ट्र, विशेष

चंद्रकांतदादांच्या उच्च शिक्षण विभागाच्या ‘बाताच मोठ्या अन् कृती शून्य’: आता राज्याचे संचालक डॉ. देवळाणकरांविरूद्ध दाखल होणार फौजदारी गुन्हा?

पुणेः राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत तासिकातत्वावर (सीएचबी) काम करणाऱ्या प्राध्यापकांसाठी स्वतंत्र डिजिटल पोर्टल सुरू करण्यात येईल आणि या प्राध्यापकांच्या प्रतितास मानधनातही करण्यात येईल, अशी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेली घोषणा हवेतच विरली असून यंदाचे शैक्षणिक सत्र सुरू होऊन दीडमहिना उलटूनही अद्याप हे पोर्टल कार्यान्वित झाले नाही किंवा मानधनवाढीचा शासन निर्णयही निघालेला नाही. त्यामुळे राज्यातील तासिकातत्वावरील प्राध्यापक उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील व राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्याविषयी संताप व्यक्त करू लागले आहेत. दरम्यान, तासिकातत्वावरील प्राध्यापक नियुक्तीच्या वेळापत्रकाचा ‘विस्कोट’ करणारे राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक, महाविद्यालयांचे प्राचार्य आणि कार्यालयीन अधीक्षकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई न केल्यास राज्...
तलाठी भरतीच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर, १०० गुणांचा पेपर आणि निगेटिव्ह मार्किंगसह ‘असा’ असेल परीक्षेचा अभ्यासक्रम!
महाराष्ट्र

तलाठी भरतीच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर, १०० गुणांचा पेपर आणि निगेटिव्ह मार्किंगसह ‘असा’ असेल परीक्षेचा अभ्यासक्रम!

मुंबईः महसूल आणि वन विभागातील ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी पदाची भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब व गट-क संयुक्त परीक्षेद्वारे होणार असून संयुक्त पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेद्वारे ही भरती होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तलाठी भरतीच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर केला असून १०० गुणांच्या पेपर आणि निगेटिव्ह मार्किंग असे प्रश्नपत्रिकेचे स्वरुप आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क’ परीक्षेत ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी पदाचा समावेश करण्यात येणार असून या परीक्षेमार्फत यंदा प्रथमच १ हजार ५३९ तलाठी पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेत १०० गुणांची संयुक्त पूर्वपरीक्षा आणि ४०० गुणांची स्वतंत्र मुख्यपरीक्षा याद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. ...
CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारकडून तिन्ही मागण्या मान्य, कॉक्रोच जनता पार्टीचे जंतर-मंतरवरील आंदोलन मागे!
दुनिया, देश

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारकडून तिन्ही मागण्या मान्य, कॉक्रोच जनता पार्टीचे जंतर-मंतरवरील आंदोलन मागे!

नवी दिल्लीः कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर-मंतरवर तब्बल ३६ दिवस निडरपणे केलेल्या आंदोलनापुढे मान तुकवत मोदी सरकारने अखेर नमते घेतले आणि आज दुपारी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर केंद्र सरकारने कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) तिन्ही मागण्या केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने जंरत-मंतरवरील आंदोलन मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. आंदोलंकानी शांततापूर्ण मार्गाने जंतर-मंतर रिकामे करावे आणि आपल्या घरी जावे असे आवाहन सीजेपीच्या वतीने आंदोलकांना करण्यात आले. नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशातील शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी कारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही कॉक्रोच जनता पार्टीची पहिली व मुख्य मागणी आज दुपारी २ वाजून १८ मिनिटांनी प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर मान्य झाली. धर्मेंद्र प्रधान य...
झुरळांच्या दणक्यापुढे मोदी सरकार झुकले! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा, अभिजीत दिपके म्हणालेः कॉक्रोचशी पंगा घेऊ नका!
दुनिया, देश

झुरळांच्या दणक्यापुढे मोदी सरकार झुकले! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा, अभिजीत दिपके म्हणालेः कॉक्रोचशी पंगा घेऊ नका!

नवी दिल्लीः नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशातील ढासळलेली शिक्षण व्यवस्था याला जबाबदार धरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये आर्थिक मदत द्यावी. मागणीसाठे गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाला आज मोठे यश मिळाले. मोदी सरकार सीजेपीच्या आंदोलनापुढे झुकले आणि अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. गेल्या महिनाभरापासून जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू होते. नीट फेपरफुटीप्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी कॉक्रोच जनता पार्टीने लावून धरली होती. या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला. २० जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टीने...
दिल्ली पोलिसांनी एका मुलीचे कपडे फाडले, छातीवर पाय दिला आणि काठ्या चालवल्याः अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप, आता चर्चा करायची असेल तर जंतर-मंतरवरच!
दुनिया, देश

दिल्ली पोलिसांनी एका मुलीचे कपडे फाडले, छातीवर पाय दिला आणि काठ्या चालवल्याः अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप, आता चर्चा करायची असेल तर जंतर-मंतरवरच!

नवी दिल्लीः  नीट पेपरफूट आणि शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीला जबाबदार धरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) आंदोलन सुरू असून सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी चर्चेसाठी केंद्र सरकारसमोर नवीन अट ठेवली आहे. आता आमचे शिष्टमंडळ केंद्र सरकारशी चर्चा करायला जाणार नाही, त्यांना चर्चा करायचीच असेल तर त्यांनी जंतर-मंतरवर यावे, असे अभिजीत दिपके म्हणाले. त्यामुळे नवीन पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे जंतर-मंतरवर ३२ दिवसांपासून म्हणजेच २० जूनपासून धरणे आंदोलन सुरू आहे. २८ जूनपासून जागतिक किर्तीचे पर्यावरणतज्ज्ञ आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक हे जंतर-मंतरवर आमरण उपोषणाला बसले. त्यांचे आमरण उपोषण अद्यापही सुरूच आहे. काल २० जून रोजी सीजेपीने संसद भवनावर मोर्चाचे आयोजन केले होते. या ...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!