नाट्यशास्त्रात ‘कामसूत्र’चे प्रयोग भोवलेः डॉ. अशोक बंडगर विद्यापीठाच्या सेवेतून बडतर्फ


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  पात्रता नसतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात प्राध्यापकपदी नियुक्ती मिळवलेले प्रा. डॉ. अशोक बंडगर याने नाट्यशास्त्रात ‘कामसूत्र’चे हिणकस प्रयोग करत विद्यार्थींनींचे लैंगिक शोषण केल्याचे सिद्ध झाले असून डॉ. बंडगरला तत्काळ प्रभावाने विद्यापीठाच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. न्यूजटाऊनने सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता.

बंडगर याच्या बडतर्फीचा आदेश कुलगुरू प्रा. डॉ. विजय फुलारी यांच्या आदेशन्वये ८ नोव्हेंबर रोजीच जारी झाला आहे. आधी तक्रार निवारण समिती, नंतर विभागीय चौकशी अशा फेऱ्यात अडकलेल्या बंडगर याला आपण विद्यापीठाच्या सेवेतून बडतर्फ होणार याचा अंदाज आधीच आला होता. त्यामुळे त्याने ही कारवाई टाळण्यासाठी प्रा. डॉ. अशोक बंडगर याने सर्व प्रकारचे प्रयत्न केले. परंतु विद्यापीठ प्रशासनाने अखेर विभागीय चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे बंडगर याला सेवेतून बडतर्फ केले आहे.

 काय म्हटले बडतर्फी आदेशात?

विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील एम.पी. ए. व्दितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने (न्यूजटाऊनने विद्यार्थीनीचे नाव हेतुतः वगळले आहे. त्यामुळे आदेशाची प्रतही प्रसिद्ध करणे टाळत आहोत) आपल्याविरुद्ध लैंगिक शोषणाबाबत तक्रार विद्यापीठाच्या तत्कालीन कुलगुरूंकडे केली होती. त्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आपली विभागीय चौकशी करण्यात आली. चौकशी अधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालात आपणास बजावलेले दोषारोपपत्रातील सर्व आरोप सिद्ध होत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. त्या अर्थी आपण जबर शिक्षेस पात्र ठरता, असे या बडतर्फी आदेशात म्हटले आहे.

हेही वाचाः नाट्यशास्त्रात ‘कामसूत्र’चे हिणकस प्रयोग: प्रा. अशोक बंडगरच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल, पत्नीही सहआरोपी

 आपल्याविरुद्ध विभागीय चौकशीमध्ये दोषारोपपत्रातील आरोप सिद्ध झालेले असल्यामुळे नियुक्ती तथा शिस्तभंगविषयक प्राधिकारी म्हणून कुलगुरूंनी चौकशी अधिकाऱ्यांनी सादर केलेला चौकशी अहवाल स्वीकारून ८ नोव्हेंबर २०२४ रोजी आपल्याला सेवेतून काढून टाकण्याबाबत सविस्तर आरोप पारित केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ५ (१) (८) मधील तरतुदींनुसार आपणास विद्यापीठ सेवेतून तत्काळ प्रभावाने आजपासून (८ नोव्हेंबर) काढून टाकण्यात येत आहे, असे आस्थापना विभागाचे उपकुलसचिव गणेश मंझा यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

हेही वाचाः नाट्यशास्त्राचा ‘बलात्कारी’ प्रा. अशोक बंडगर पत्नी, मुली आणि कुत्र्यासह फरार; कुलगुरूंच्या आदेशानंतर तडकाफडकी निलंबित

 काय आहे प्रकरण?

बुलढाणा जिल्ह्यातील मुलगी मोठी स्वप्ने घेऊन विद्यापीठात नाट्यशास्त्राचे धडे घेण्यास आली. तिने विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात एमपीए म्हणजेच मास्टर ऑफ परफर्मिंग आर्टला प्रवेश घेतला. बंडगर याने फिर्यादीसोबत ओळख करून तिचा विश्वास संपादन करून तिला स्वतःच्या घरी ठेवून घेतले. मी तुझा वडिल आणि तू माझी मुलगी आहे, असे बंडगरने त्या मुलीस सांगितल्यामुळे त्या मुलीने बंडगरवर विश्वास ठेवला. त्यानंतर बंडगरने तिच्याशी जवळीक वाढवली आणि तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी शिविगाळ व धमकी देऊन तिची छेडछाड कर तिच्यावर बलात्कार केला  होता.

हेही वाचाः दहा दिवस उलटले तरी प्रा. अशोक बंडगर पोलिसांना सापडेना; अटकपूर्व जामिनाच्या खटाटोपावर आज सुनावणी

बंडगरची बायकोही त्याच्या या गुन्ह्यात सामील होती. फिर्यादी मुलीने बंडगरची बायको पल्लवीला सांगितल्यावर तिने हे सगळे मला मान्य आहे. आम्हाला तुझ्यापासून मुलगा हवा आहे, असे सांगत बंडगरला हे कृत्य करण्यास प्रोत्साहन दिले आणि दोघांनाही वेळोवेळी फिर्यादी मुलीवर बलात्कार केला होता.

हेही वाचाः नाट्यशास्त्राचा ‘बलात्कारी’ प्राध्यापक डॉ. अशोक बंडगर २२ दिवसांपासून मोकाटच, आता बडतर्फी टाळण्यासाठी फिल्डिंग!

अशोक बंडगरने हा सगळा प्रकार ११ फेब्रुवारी २०२२ च्या संध्याकाळी ६ वाजेपासून ते ११ फेब्रुवारी २०२३ च्या संध्याकाळी सायंकाळी ५ वाजेपर्यंत केला. बंडगर हा विद्युत कॉलनीत राहत होता. तेथे हा प्रकार घडला होता. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३७६(न), १०९,११४, ५०४, ५०६ नुसार  अशोक गुरप्पा बंडगर आणि त्याची बायको पल्लवी अशोक बंडगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा हा अट्टहास नडला

अशोक बंडगर आणि त्याची बायको पल्लवी यांना दोन मुली आहेत. (अशी त्यांची कागदोपत्री नोंद आहे.) आपल्याला मुलगा होत नाही, असे त्यांच्या लक्षात आले. आपल्या घरात वंशाचा दिवा येत नाही, या भयाने या नवरा-बायकोला पछाडले. त्यातच ‘ सेटिंग’मध्ये मास्टर असलेल्या बंडगरने बायकोच्या नावाने सुमारे चार कोटीचे कर्ज मिळवून एक प्लांट टाकला. लायकी नसताना मिळत असलेला पगार आणि त्यात कर्जाचा मिळालेला बुस्टर डोस यामुळे चतकोर भाकरीला मोहताज असलेला बंडगर बेबंद झाला.

हेही वाचाः २६ दिवसांनंतर ‘बलात्कारी’ प्रा. अशोक बंडगरची पत्नी घरी अवतरली, न्यायालयाने दिले अटकेपासून संरक्षण!

हेही वाचाः विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण करणारा निलंबित प्रा. अशोक बंडगरची नाट्यशास्त्र विभागात लुडबुड; प्राध्यापक-विद्यार्थी वैतागले!

 वंशाचा दिवा म्हणून ‘मुलगाच’ हवाच असे त्याला वाटू लागले. त्याच्या बायकोलाही तोच वंशाचा दिवा हवा होता. नाट्यशास्त्र विभागातील सहकाऱ्यांशीही बंडगरचे वर्तन बेबंद असेच राहिले. या मुलीवर त्याने अत्याचार करायला सुरूवात केल्यानंतर फिर्यादी मुलीने अशोकच्या पत्नीला सांगितले. त्यावर तिने हे मला मान्य आहे, आम्हाला तुझ्यापासून मुलगा हवाय, असे सांगत अशोक बंडगरला फिर्यादी मुलीवर वांरवार बलात्कार करण्यास प्रोत्साहन दिले होते.

हेही वाचाः विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात प्रा. अशोक बंडगर दोषी, आता होणार विभागीय चौकशी!

१९ महिने लागले कारवाईला

 एप्रिल २०२३ मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर विद्यापीठातील महिलांविषयीच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीने बंडगर याला दोषी ठरवले होते. त्यानंतर तत्कालीन कुलगुरू प्रा. प्रमोद येवले यांनी बंडगरची निवृत्त न्यायमूर्तीमार्फत विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. या चौकशी समितीसमोरही बंडगरने हजर राहण्यास टाळाटाळ केली होती.  या विभागीय चौकशी समितीच्या अहवालानुसार तब्बल १९ महिन्यांनी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी बंडगरला सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश काढले आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!