‘राज्यात भाजप व्हेंटिलेटरवर, विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात गुजरातसह देशभरातून ९० हजार लोक आणले’!


मुंबईः महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी ९० हजार बुथवर भाजपने गुजरातसह देशभरातून ९० हजार लोक आणले, असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एका प्रचारसभेत बोलताना केले. त्यावरून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपवर टिकास्त्र सोडले असून महाराष्ट्रात भाजप कमकुवत असून व्हेंटिलेटरवर आहे, शिवसेना (उद्धव ठाकरे) यांनी म्हटले आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी १६ नोव्हेंबर रोजी पाथर्डी येथील प्रचारसभेत बोलताना भाजपचे निवडणुकीचे नियोजन कसे असते, हे सांगताना महाराष्ट्रातील ९० हजार बुथवर गुजरातसह देशभरातून ९० हजार लोक आले आहेत. महाराष्ट्रात ऑक्सिजनची कमतरता आहे, त्यामुळे त्यापेक्षाही जास्त लोक बाहेरून आले आहेत, असे वक्तव्य केले आहे.

पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. पंकजा मुंडे यांच्या त्या वक्तव्याचा व्हिडीओ एक्सवर शेअर करत ‘महाराष्ट्रात निवडणुकीचे काम करायला ९० हजार माणसं आणली आणि त्यात जास्त गुजरातवरून आली आहेत. याचा अर्थ गुजरातने आता महाराष्ट्राचे बुथही हडपले आहेत. भविष्यात भाजपच्या हाती सत्ता गेली तर भाजप गुजरातला आणंद म्हणून काय काय देईल, याची कल्पना करा… भाजपचे मनसुबे आता स्पष्ट झाले आहेत, असे टिकास्त्र सोडत आपण आपला महाराष्ट्र गुजरातच्या हाती द्यायचा का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने(शरदचंद्र पवार) केला आहे.

शिवसेनेनेही (उद्धव ठाकरे) पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ एक्सवर शेअर करत खोचक टिका केली आहे. महाराष्ट्रात भाजप कमकुवत, त्यामुळे ९० हजार माणसे आणावी लागली, असे म्हणत शिवसेनेने (उबाठा) पंकजांचा हा व्हिडीओ शेअर केला असून त्या व्हिडीओवर ‘महाराष्ट्रात भाजप कमकुवत, त्यामुळे गुजरावरून ९० हजार माणसे आणावी लागली आणि महाराष्ट्रात भाजप व्हेंटिलेटरवर ऑक्सिजन कमी’ अशा ओळी लिहिल्या आहेत.

नेमके काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

‘मला तर वाटते किती बुथ आहेत आपल्या राज्यात, ९० हजार का काय बुथ आहेत. त्या ९० हजार बुथवर ९० हजार लोक आले देशातून. बघितलं भाजपचं काम काय? गडबडच नाहीय. साधं नाही, ९० हजार ये जो हमारे भाई आए है ना गुजरात से. ये कासवाल जी जैसे ९० हजार लोग आए है ना महाराष्ट्र में.. थोडा ऑक्सिजन कम हो गया महाराष्ट्र में. उससे लोग जादा बाहर से आगए.’

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!