बैजू पाटील यांच्या ‘बेबी बॅग’ छायाचित्रास जागतिक मोनोक्रोम फोटोग्राफी स्पर्धेत तृतीय पुरस्कार
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): इटलीमध्ये झालेल्या वर्ल्ड मोनोक्रोम फोटोग्राफी अवॉर्ड स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांच्या बेबी बॅग या छायाचित्राने जागतिकस्तरावर तिसरा क्रमांक पटकावला आहे.
ही स्पर्धा ब्लॅक अँड व्हाईट श्रेणीत घेण्यात आली. व्यावसायिक वन्यजीव श्रेणीत बैजू पाटील यांच्या बेबी बॅग छायाचित्राने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
जागतिकस्तरावर अतिशय नवाजलेली ही स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये जगातील २१ देशांनी भाग घेतला होता. ६५ हजार छायाचित्र या स्पर्धेमध्ये आले होते. बैजू पाटील यांना पहिल्यांदाच हा पुरस्कार भेटलेला आहे.
बैजू पाटील यांनी हा फोटो कर्नाटकमध्ये दारोजी नॅशनल पार्क येथे काढलेला आहे. हे अस्वल आहे आणि अस्वलाच्या पाठीवर दोन पिल्लं घेऊन ती आई जंगलामध्ये भटकंती करत असतानाचे व तेथे काही कावळे अस्वलाला टोचा मारून तिथून त्याला पळवण्याच्य...