बैजू पाटील यांच्या ‘बेबी बॅग’ छायाचित्रास जागतिक मोनोक्रोम फोटोग्राफी स्पर्धेत तृतीय पुरस्कार


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): इटलीमध्ये झालेल्या वर्ल्ड मोनोक्रोम फोटोग्राफी अवॉर्ड स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांच्या बेबी बॅग या छायाचित्राने जागतिकस्तरावर तिसरा क्रमांक पटकावला आहे.

ही स्पर्धा ब्लॅक अँड व्हाईट श्रेणीत घेण्यात आली. व्यावसायिक वन्यजीव श्रेणीत बैजू पाटील यांच्या बेबी बॅग छायाचित्राने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

जागतिकस्तरावर अतिशय नवाजलेली ही स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये जगातील २१ देशांनी भाग घेतला होता. ६५ हजार छायाचित्र या स्पर्धेमध्ये आले होते. बैजू पाटील यांना पहिल्यांदाच हा पुरस्कार भेटलेला आहे.

बैजू पाटील यांनी हा फोटो कर्नाटकमध्ये दारोजी नॅशनल पार्क येथे काढलेला आहे. हे अस्वल आहे आणि अस्वलाच्या पाठीवर दोन पिल्लं घेऊन ती आई जंगलामध्ये भटकंती करत असतानाचे व तेथे काही कावळे अस्वलाला टोचा मारून तिथून त्याला पळवण्याच्या प्रयत्न करत होते.

 सहजा अस्वल एवढ्या सहजासहजी दिवसा दिसत नाही व अतिशय लाजाळू असल्यामुळे ते पटकन जंगलामध्ये निघून जातात. त्यांना माणसाची अजिबात सवय नसते. त्यातल्या त्यात दोन पिल्ले आईच्या पाठीवर असलेले छायाचित्र भेटणे खूपच दुर्मिळ व अवघड आहे.

 हा क्षण टिपण्यासाठी बैजू पाटील यांना अहोरात्र मेहनत घ्यावी लागली. बऱ्याच वेळेस अस्वलासोबत जेव्हा पिल्लं असतात, त्यावेळेस अस्वल माणसांवर एकदम अटॅक करतो आणि तो अटॅक खूप भयानक असतो. त्याच्यात माणूस वाचू शकत नाही. त्याच्यामुळे खूप जास्त काळजी घेऊन अस्वलाची फोटोग्राफी करायला लागते.

 या कारणामुळेच बैजू पाटील यांनी टिपलेल्या या अतिशय दुर्मिळ क्षणाच्या छायाचित्राची जगातील १२ परीक्षकांनी निवड केली. या छायाचित्रामुळे भारताचे नाव उंचावले आहे. 

बैजू पाटील यांनी वन्यजीव छायाचित्रांमध्ये आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. ते जागतिक नावाजलेल्या कॅमेरा कंपनीचे ब्रँड अँबेसिडर आहेत. सध्या ते एमजीएम विद्यापीठाचे एचडी आहेत. नवीन छायाचित्रकारांना ते प्रोत्साहन देत राहतात व शिकवतात. या पुरस्कारामुळे बैजू पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!