महाराष्ट्राप्रमाणेच तेलंगणातही ऑपरेशन लोटस?, टीआरएसच्या आमदारांना ५० कोटींची ऑफर, तिघे पोलिसांच्या ताब्यात
हैदराबादः महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडवून आणण्यासाठी आमदारांना ‘पन्नास खोके’ दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली असतानाच ही चर्चा थंडावत नाही तोच तेलंगणामध्येही महाराष्ट्राप्रमाणेच सत्तांतर घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप आहे. तेलंगणातील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) आमदारांनी पक्षांतर करावे यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर देण्यात आल्याचा आरोप टीआरएसने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका फार्म हाऊसवर धाड टाकून तिघांना ताब्यात घेतले आहे.
एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार तेलंगणा राष्ट्र समितीच्या चार आमदारांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी महत्वाच्या व्यक्तीला १०० कोटी आणि प्रत्येक आमदाराला ५० कोटींची ऑफर देण्यात आली. ज्या आमदारांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाला, त्यांनीच ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस...