एसटीचे कर्मचारी चोर आणि स्वार्थीः ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप
यवतमाळः राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीचे कर्मचारी चोर आणि स्वार्थी आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ हवी आहे. मात्र ते एसटीच्या चोरीवर गप्प आहेत. ते बोलत नाहीत, म्हणजेच ते या लुटीत सहभागी आहेत. ते चोर आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर हे शुक्रवारी यवतमाळमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर हा गंभीर आरोप केला आहे. एसटीचे कर्मचारी स्वार्थी आहेत. ते केवळ स्वतःच्या पगाराचा विचार करतात. ते एसटीच्या लुटीवर बोलत नाहीत. ते या लुटीवर बोलत नसतील तर तेही या लुटीत सहभागी आहेत, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
सध्या राज्यात अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची चर्चा आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आ...










