मोहन भागवत यांना मोदी-शहा यांच्या दर्जाची सुरक्षा, आता ‘एएसएल’ कव्हरमध्ये वावरतील आरएसएस प्रमुख!
नवी दिल्लीः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आता त्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दर्जाचीच सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे. मोहन भागवत यांना सध्या असलेली झेड प्लस सुरक्षा वाढवून ऍडव्हॉन्स सिक्योरिटी लाईजन (एएसएल) करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने नुकत्याच घेतलेल्या समीक्षा बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. भागवतांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्यामुळे त्यांना नेमका कोणापासून धोका आहे? त्यांना प्रधानमंत्री आणि गृह मंत्र्याइतकीच सुरक्षा का देण्यात आली? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाच्या समीक्षा बैठकीत असे आढळून आले आहे की, बिगर भाजप शासित राज्यात दौऱ्यावर गेल्यानंतर मोहन भागवत यांच्या सुरक्षेत ढिलाई आढळून आली. त्यामुळ...