Author: न्यूजटाऊन टीम

आर्णी बाजार समिती यार्डातील जय किसान धर्मकाट्यावर तोलाईत हेराफेरी, पाच किलो वजन कमी दाखवून शेतकऱ्यांची लूट!
महाराष्ट्र

आर्णी बाजार समिती यार्डातील जय किसान धर्मकाट्यावर तोलाईत हेराफेरी, पाच किलो वजन कमी दाखवून शेतकऱ्यांची लूट!

आर्णीः यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डातील जय किसान धर्मकाट्यावर तोलाईमध्ये ५ किलो वजन कमी दाखवून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याबाबत आर्णीच्या तहसीलदारांबरोबरच बाजार समितीकडेही लेखी तक्रार करण्यात आली आहे. आर्णी तालुक्यातील शेतकरी गजानन शेळके हे १६ डिसेंबर रोजी त्यांच्या शेतातील कापूस विक्री करण्यसाठी आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डातील जय किनार धर्मकाटा तोलाई केंद्रावर गेले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेळके यांनी टाटा कंपनीच्या गाडी क्रमांक एमएच-४२ एएफ ०१०७ मध्ये कापूस भरून जय किसान धर्मकाट्यावर तोलाई केली. या धर्मकाट्यावर कापूस भरलेल्या गाडीची मोजणी केली असता कापसासह त्या गाडीचे वजन १ हजार ८६५ किलो असे नेट वजन जय किसान धर्मकाट्याच्या दर्शनी मीटरवर दाखवण्यात आले होते. गाडीतील कापूस खाली करू...
अमरावतीच्या जिजाऊ बँकेकडून कोट्यवधींचे नियमबाह्य कर्जवाटप, दोषींवर होणार कारवाई
महाराष्ट्र

अमरावतीच्या जिजाऊ बँकेकडून कोट्यवधींचे नियमबाह्य कर्जवाटप, दोषींवर होणार कारवाई

नागपूर: अमरावती जिल्ह्यातील जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने नियमबाह्य पद्धतीने कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी सहकार आयुक्तांनी  अमरावतीच्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून चौकशीची कार्यवाही सुरू आहे. चौकशीमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधान परिषदेत सांगितले.  आमदार उमा खापरे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी वळसे पाटील बोलत होते. या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.  अमरावतीच्या जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बॅकेबाबतच्या विविध तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सहकार आयुक्तांनी १० नोव्हेंबर २०२२ रोजीच्या आदेशान्वये तपासणीसाठी अमरावतीच्या प्रादेशिक उपसंचालकांची (साखर) यांची नियुक्ती केली असून त्यांनी १८ ऑगस्ट २०२३ रोजी तपा...
मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांची १३८ रिक्त पदे भरणार, लवकरच निघणार जाहिरात
महाराष्ट्र

मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांची १३८ रिक्त पदे भरणार, लवकरच निघणार जाहिरात

नागपूर: मुंबई विद्यापीठात रिक्त पदांवर मनुष्यबळ भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. लवकरच विद्यापीठातील प्राध्यापकांची १३८ रिक्त  पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.  विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भातील  प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रा. वर्षा गायकवाड यांनी भाग घेतला.  मुंबई विद्यापीठातील दूरस्थ शिक्षण (डिस्टन्स एज्युकेशन) पद्धतीद्वारे शिक्षण पदव्युत्तर अभ्यासक्रमातील ४५६ विद्यार्थ्यांच्या निकालास विलंब झाला असून सद्य:स्थितीत हे निकाल लागले आहे. प्राध्यापकांची संख्या कमी असल्यामुळे निकाल उशिराने लागले, असे पाटील म्हणाले. मुंबई विद्यापीठात कुलगुरू प्रभारी नाहीत. ते पूर्णवेळ आहे. सन २०१७-१८ मध्ये विद्यापीठात नवीन परीक्षा निकाल पद्धतीची अ...
अमरावतीच्या अचलपुरात एनआयएची छापेमारी, शिक्षकाच्या मुलाला चौकशीसाठी घेतले ताब्यात; लॅपटॉप-मोबाईल जप्त
देश

अमरावतीच्या अचलपुरात एनआयएची छापेमारी, शिक्षकाच्या मुलाला चौकशीसाठी घेतले ताब्यात; लॅपटॉप-मोबाईल जप्त

अमरावतीः अमरावती जिल्ह्यातील संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अचलपुरात आज पहाटे राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएच्या दोन पथकांनी छापेमारी केली. या छापेमारीत एका शिक्षकाच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्याचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर हे अत्यंत संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. मागच्या दहा वर्षांत या शहरात अनेकदा जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. याच अचलपुरात सोमवारी पहाटे एनआयएची दोन पथके धडकली आणि त्यांनी छापेमारी केली. एनआयएची दोन पथके सोमवारी पहाटे दोन वाजता जुन्या अचलपूर शहरातील अकबरी चौक परिसरात धडकले. त्यांनी या परिसरातील एका शिक्षकाच्या घरात पोहोचून त्या शिक्षकाच्या मुलाची चौकशी केली. त्याच्याकडून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते. एन...
एम.फिल.धारक अध्यापकांना दिलासा, आता ‘असे’ मिळणार कॅस अंतर्गत पदोन्नतीचे लाभ; उच्च शिक्षण विभागाने दिले सुधारित निर्देश
महाराष्ट्र

एम.फिल.धारक अध्यापकांना दिलासा, आता ‘असे’ मिळणार कॅस अंतर्गत पदोन्नतीचे लाभ; उच्च शिक्षण विभागाने दिले सुधारित निर्देश

मुंबईः  एम.फिल. अर्हता धारण केलेल्या अध्यापकांना नेट परीक्षा उतीर्ण होण्यापासून सूट देण्यात आली असली तरी अनेक अध्यापकांना कॅस अंतर्गत पदोन्नतीचे लाभ नाकारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागाने सुधारित आदेश जारी करून कॅसचे लाभ नाकारलेल्या अध्यापकांना हे लाभ देण्याचे निर्देश जारी केले आहेत. एम. फिल. अर्हता धारण केलेल्या अध्यापकांना नेट परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत उच्च शिक्षण विभागाने १६ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या पत्रान्वये स्पष्टीकरण जारी केले होते. परंतु या पत्राचा चुकीचा अर्थ लावून १४ जून २००६ ते ११ जुलै २००९ या दरम्यान एम.फिल. अर्हता धारण करणाऱ्या अनेक अध्यापकांना कॅस अंतर्गत पदोन्नतीचे लाभ नाकारण्यात आले होते. एम.फिल. धारक अध्यापकांना कॅसचे लाभ नाकारल्याची बाब विधान परिषद सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी २ नोव्हेंबर २०२३ रोजी उच्च शिक्षण विभागाच्या निदर्...
परळीत अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाचा पेपर फुटला, हालगे महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द; गुन्हा नोंदवण्याचे आदेश
महाराष्ट्र

परळीत अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाचा पेपर फुटला, हालगे महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द; गुन्हा नोंदवण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरू असून परळी येथील नागनाथअप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर आज बी.ई. सिव्हिल अंतिम वर्षाचा डिझाईन ऑफ स्ट्रक्चर हा पेपर परीक्षा सुरू होण्याच्या आधीच फुटून समाज माध्यमावर व्हायरल झाला. या पेपरफुटी प्रकरणी नागनाथअप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले आहे. तसेच बी.ई.(सिव्हील) अभ्यासक्रमाचा हा पेपरही रद्द करण्यात आला असून प्राचार्य व परीक्षा समन्वयकांच्या विरोधात ’एफआयआर’ दाखल करण्याचे आदेश कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षा १२ डिसेंबरपासून सुरु झाल्या आहेत. या परीक्षेत आज पाचव्या दिवशी दुपारच्या सत्रात बी.ई सिव्हिल अंतिम वर्षाचा...
भाजपची बांधिलकी ओबीसींशीच, शरद पवार हेच मराठा आरक्षणाचे कट्टर विरोधक: फडणवींचा आरोप
महाराष्ट्र, राजकारण

भाजपची बांधिलकी ओबीसींशीच, शरद पवार हेच मराठा आरक्षणाचे कट्टर विरोधक: फडणवींचा आरोप

नागपूर: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणारच आहोत. परंतु भाजपची कमिटमेंट ओबीसी समाजाशी आहे. शरद पवार हेच मराठा आरक्षणाचे सर्वात मोठे विरोधक आहेत. त्यांनी मनात आणले असते तर मंडल आयोग लागू झाला तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण देता आले असते,असा आरोप भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजप पदाधिकाऱ्यांचा ‘महाविजय-२०२४’ मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना फडणवीसांनी हे आरोप केले. सध्या मराठा आरक्षणासाठी राज्यात मोठी आंदोलने चालली आहेत. परंतु मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कुणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला होता. अगदी महाविकास आघाडीचे सरकार असताना सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणाशिवाय राज्यात दुसरे प्रश्न नाहीत का? असे म्हणत हा विष...
एसआरएच्या सदनिका विकण्याची कालमर्यादा पाच वर्षांवर आणणार, मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार प्रस्ताव
महाराष्ट्र

एसआरएच्या सदनिका विकण्याची कालमर्यादा पाच वर्षांवर आणणार, मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार प्रस्ताव

नागपूर: झोपडपट्टी प्राधिकरणाच्या (एसआरए) माध्यमातून झोपडीधारक लाभार्थ्यास प्राप्त झालेली विनामूल्य सदनिका विकण्याची कालमर्यादा पाच वर्षांपर्यंत कमी करण्याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडला जाईल, असे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.  झोपडपट्टी प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडीधारकास मिळालेली सदनिका कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करण्यास दहा वर्षे कालावधीपर्यंत मनाई आहे. ही मर्यादा कमी करून सात वर्षे करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मात्र ही मर्यादा पाच वर्षापर्यंत कमी करण्याच्या लोकप्रतिनिधींच्या मागणीसंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाईल, असे सावे म्हणाले. आमदार सुनील प्रभू यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत आमदार योगेश सागर, राम कदम, रवी...
माजलगाव आणि बीड जाळपोळ प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; आतापर्यंत ३० सराईत गुन्हेगारांसह २७८ आरोपींना अटक
महाराष्ट्र

माजलगाव आणि बीड जाळपोळ प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; आतापर्यंत ३० सराईत गुन्हेगारांसह २७८ आरोपींना अटक

नागपूर: मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान ३० ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्यातील बीड आणि माजलगाव या दोन्ही शहरातील संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन दिवसात विशेष तपास पथकाची (स्पेशल इन्वेस्टिगेटिंग टीम) स्थापना करण्यात येईल,  असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान ३० ऑक्टोबर रोजी माजलगाव व बीड शहरात काही ठिकाणी जमावाकडून तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या. यामध्ये लोकप्रतिनिधींची निवासस्थाने जाळण्यात आली. अन्य सार्वजनिक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. यासंदर्भात आमदार संदीप क्षीरसागर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. माजलगाव व बीड येथील घटनेप्रकरणी ज्यांच्याविरुद्ध सबळ पुरावा मिळालेला आहे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत २७८ आरोपींना अटक करण्यात आली आहे...
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची २४ हजार ४६२ पदे रिक्त, बिंदूनामावली तपासणी प्रक्रियेत उघड झाली माहिती
महाराष्ट्र

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची २४ हजार ४६२ पदे रिक्त, बिंदूनामावली तपासणी प्रक्रियेत उघड झाली माहिती

नागपूर: सन २०१७ नंतर शिक्षक भरती करताना जिल्हा परिषद शाळांच्या बिंदूनामावलीमध्ये त्रुटी असल्याबाबत या विभागास तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर दिलेल्या निर्देशानुसार सर्व जिल्हा परिषद शाळांची बिंदूनामावली प्रक्रिया तपासून पूर्ण झाली असून राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची २४ हजार ४६२ पदे रिक्त आहेत, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत सांगितले. आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत महादेव जानकर यांनी चर्चेत सहभाग घेतला होता. शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी बिंदूनामावली तपासणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्याची पूर्णपणे तपासणी झाली आहे. हा विषय जिल्हा परिषद, ग्रामविकास, मागासवर्ग कक्ष यांची एकत्रित बैठक घेऊन तांत्रिक विषय, सकारात्मक बिंदूनामावली तपासणे व कागदपत्रांची पडताळणी करून भरती प्रक्रिया तात...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!