सरकार पाडण्याचे काही नियोजन केले का, हे संजय राऊतांनाच विचारतोः शरद पवारांची मिश्कील टिप्पणी
कोल्हापूरः फेब्रुवारीत शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार आहे, याबाबत मला काहीही माहिती नाही.आता मुंबईला गेल्यावर मी संजय राऊतांशीच बोलेन आणि जाणून घेईन. सरकार पाडण्यासाठी संजय राऊत यांनी काही नियोजन केले आहे का, याबाबत मला माहिती नाही, अशी मिश्कील टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार फेब्रुवारीमध्ये कोसळणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी नुकतच केला आहे. त्यांच्या या दाव्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी ही टिप्पणी केली. आज कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सत्ता हातात असताना जमिनीवर पाय ठेवून वागायचे असते. परंतु सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून ते होताना दिसत नाही. सध्याचे सत्ताधारी इतरांना तुरुंगात डांबण्याची आणि जामीन रद्द करण्याची भाषा करतात. हे राजकी...