बॉयफ्रेंडवर हक्क कुणाचा?: सभु महाविद्यालयात मुलींमध्ये राडा, एकमेकींच्या झिंज्या पकडून फ्रीस्टाइल हाणामारी… पहा व्हिडीओ

औरंगाबादः सरस्वती भुवन महाविद्यालयातील विद्यार्थीनींमध्ये तुफान हाणामारी झाली. तीन विद्यार्थिनींनी एकमेकींच्या झिंज्या पकडून लाथाबुक्क्यांनी आणि बेल्टने झालेल्या या तुफान हाणामारीचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. बॉयफ्रेंड पळवण्यावरून हा राडा झाल्याचे सांगण्यात येते.

स.भु. महाविद्यालयाच्या पार्किंगमध्येच तीन मुलींमध्ये हा राडा झाला. एका तरूणीला दोन तरूणी पकडून बेल्ट आणि लाथाबुक्क्यांनी तुफान मारझोड करत असल्याचे या व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. या तीन मुलींच्या भांडणात तेथे हजर असलेल्या सुरक्षा रक्षकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही या मुली काही ऐकायला तयार दिसत नव्हत्या. शनिवारी दुपारच्या सुमारास हा राडा झाल्याचे सांगण्यात येते. बॉयफ्रेंडवर हक्क सांगण्यावरून हा राडा झाल्याची चर्चा महाविद्यालय परिसरात होती. न्यूजटाऊन या व्हिडीओची पुष्टी करत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *