मनुस्मृतीचे पुनरूज्जीवन रोखणे ही एकट्या जितेंद्र आव्हाडांची जबाबदारी आहे काय?


शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती शिकवण्याच्या निर्णयाविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन करताना या पोस्टरवर असलेल्या बाबासाहेबांचा फोटो फाडल्या गेला. आव्हाडांनी अनवधानाने झालेल्या या कृतीची जाहीर माफी मागितली आहेच. ती आंबेडकरवादी म्हणून आपल्यासाठी पुरेशी आहे. मूळ विषय मनुस्मृतीच्या पुनरुज्जीवनाचा आहे. तो आपण सर्वांनी मिळून रोखला पाहिजे! ही एकट्या जितेंद्र आव्हाडांची जबाबदारी आहे काय? शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या समावेशाला विरोध करण्याची पहिली हिंम्मत आव्हाडांनी दाखवली आहे…

  • इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, सांगवी, नांदेड

जितेंद्र आव्हाड हे चुकले आहेत. जाणूनबुजून, मुद्दाम म्हणा की अजाणतेपणे म्हणा त्यांच्या हातून गंभीर चूक झाली आहे. त्यांना महाड येथे मनुस्मृतीचे दहन करायचे होते. दहनाचा हा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. त्यामुळे त्यांनी रितसर तयारी केलेलीच असेल. मग त्यांनी मनुस्मृती दहन न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेली पत्रके का फाडली? एवढ्या मोठ्या नेत्याला आपल्या हातात काय आहे? आपण काय फाडत आहोत? याचे साधे भान असू नये काय? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

आपल्या या दुष्कृतीबद्दल भरपूर टिकाटिप्पणी व निषेध झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी लगेच जाहीर माफी मागितली आहे. याबद्दल आंबेडकरी जनतेने त्यांना माफही केले आहे, पण असे प्रकार का घडतात? ते सहज असतात की जाणूनबुजून घडविले जातात?  मनुस्मृतीचा राग तर प्रत्येक सुजाण नागरिक व महिलांना असणे स्वाभाविक आहे. मनुस्मृतीच्या कालबाह्य तत्वज्ञानाप्रमाणे आजकाल कुणीही वागू शकत नाही.

मनुस्मृतीचे हे तत्वज्ञान शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणे एकदम चुकीचे आहे पण याचा विरोध भाजपा व सर्व राजकीय पक्षांनी करायला पाहिजे. सर्व सामाजिक संघटनांनी करायला पाहिजे. महिला संघटनांनी करायला पाहिजे पण ते सारे चिडीचूप आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी सर्वप्रथम ती हिंमत तरी केली, याबद्दल त्यांचे कौतुकच. पण त्यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पत्रक फाडून फार मोठी घोडचूक केली. त्यामुळे त्यांचाही निषेध होणे हे स्वाभाविक आहे. याचा गैरफायदा भाजपने घेणे हे देखील स्वाभाविक आहे. पण हा निषेध नोंदवत असताना भाजपा आणि आपली भाषा एक असता कामा नये. हे देखील तितकेच महत्वाचे आहे!

जितेंद्र आव्हाड यांचा एकूण प्रवास आणि वैचारिक स्पष्टता लक्षात घेता भाजपने कांगावा करुन आव्हाडांची जी सार्वजनिक लिंचिंग चालवलेली आहे, त्यात आंबेडकरवादी म्हणून आपण बिलकूल सामील होता कामा नये. एकटे जितेंद्र आव्हाड हे भाजपला पुरुन उरणारे आहेत. त्यात आपण पडता कामा नये!

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती शिकवण्याच्या निर्णयाविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन करताना या पोस्टरवर असलेल्या बाबासाहेबांचा फोटो फाडल्या गेला. आव्हाडांनी अनवधानाने झालेल्या या कृतीची जाहीर माफी मागितली आहेच. ती आंबेडकरवादी म्हणून आपल्यासाठी पुरेशी आहे. मूळ विषय मनुस्मृतीच्या पुनरुज्जीवनाचा आहे. तो आपण सर्वांनी मिळून रोखला पाहिजे! ही एकट्या जितेंद्र आव्हाडांची जबाबदारी आहे काय?

जितेंद्र आव्हाड यांचा एकूण प्रवास आणि वैचारिक स्पष्टता लक्षात घेता भाजपने कांगावा करुन आव्हाडांची जी सार्वजनिक लिंचिंग चालवलेली आहे त्यात आंबेडकरवादी म्हणून आपण बिलकूल सामील होता कामा नये. एकटे जितेंद्र आव्हाड हे भाजपला पुरुन उरणारे आहेत. त्यात आपण पडता कामा नये.

मनुस्मृती अभ्यासक्रमात येतेय याबद्दल चकार शब्दही न काढता आव्हाडांचा निषेध करायला मात्र भाजपचे सर्व नेते हौसेने पुढे येत आहेत. हे आंबेडकरवादी जनतेने समजून घ्यावे. कोणत्याही भाजपाईंची डॉ.. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटनेबाबत कसलीही प्रतिबद्धता किंवा आपुलकी नाही, हे आपण सर्वजण चांगलेच जाणतोच.

अजूनही भाजपाई अभ्यासक्रमात मनुस्मृती शिकवण्याविरोधात चक्कार शब्दही का बोलत नाहीत? ते फक्त उसने आंबेडकरप्रेम आणून आव्हाडांची नियोजनबद्ध बदनामी करु इच्छितात. तो त्यांच्या राजकारणाचा भाग असू शकतो. आपणाला धर्मांधता नको आहे. ती जर अभ्यासक्रमात आली तर येणारी पिढी धर्मांध होईल. या पिढीला आपणाला वाचवायचे आहे. संविधान वाचवायचे म्हणून ज्यांनी आपणाला निवडणुकीत मते मागितली त्यांना आपणाला जाब विचारावा लागेल की आता वाचवा संविधान, करा मनुस्मृतीला विरोध! जी मनुस्मृती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळली ती कोणत्याही परिस्थितीत अभ्यासक्रमात येता कामा नये, या भूमिकेवर आपण ठाम असले पाहिजे…!

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!