औरंगाबाद जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतिपदांचे ४ नोव्हेंबर रोजी निश्चित होणार आरक्षण!

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतिपदासाठी आरक्षित पदांचे वाटप करण्यासाठी ४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता ही बैठक होईल.

महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकासाने अधिसूचनेतील अनुसूचीनुसार औरंगाबाद जिल्ह्यांच्या अधिकारी क्षेत्रातील पंचायत समित्याकरिता त्यांना सद्य:स्थितीत लागू असलेल्या आरक्षणाच्या समाप्तीनंतर येणाऱ्या दिवसापासून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) आणि महिला (अशा जाती, जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग यामधील महिलांसह) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या, पंचायत समित्या सभापतींची पदे नेमून दिलेली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाचे पत्र व अधिसूचनेनुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी राखून ठेवावयाच्या पंचायत समित्यांच्या सभापतिपदाच्या आरक्षित पदांचे पंचायत समिती निहाय वाटप करण्याकरिता ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १२ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.

या बैठकीस सर्व राष्ट्रीय व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे पदाधिकारी तथा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे पदाधिकारी यांना या आयोजित बैठकीत उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे, असे  उपजिल्हाधिकारी यांनी परिपत्रकाद्वारे कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!