छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): गणेश विसर्जनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. गणेश विसर्जनानिमित्त निघणाऱ्या मिरवणुका, मिरवणूक मार्गावर होणारी भाविक व वाहनांची वर्दळ यामुळे नागरिकांची सुरक्षितता, जिवीतास धोका, अडथळा किंवा गैरसोय होऊ नये म्हणून शहरातील विविध मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगरचे(औरंगाबाद) वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त धनंजय पाटील यांनी जारी केलेल्या आदेशानुसार शहरातील विविध मार्गांवरील वाहतुकीतील बदल असेः
सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद मार्ग
- संस्थान गणपती ते गांधी पुतळा, सिटी चौक, गुलमंडी, बाराभाई ताजिया, बळवंत वाचनालय, स.भु. महाविद्यालयमार्गे जिल्हा परिषद मैदान हा मुख्य मिरवणुकीचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद आहे.
- संस्थान गणपती ते शहागंज चमन, गांधी पुतळा, सिटी चौक, जुना बाजार मार्गे भडकल गेट.
- जिन्सी चौक ते संस्थान गणपती, जाफर गेट, मोंढा ते राजा बाजार.
- निजामोद्दीन दर्गा रोड ते निजामोद्दीन दर्गा चौक व डावीकडे शहागंज चमन.
- भूर पहेलवान यांचे घर ते निजामोद्दीन चौक व उजवीकडे शहागंज चमन.
- चेलीपुरा चौक ते गांधी पुतळा, मंजूरपुरा चौक ते गांधी पुतळा.
- लोटा कारंजा ते सराफा रोड, रोहिल्ला गल्ली ते सराफा रोड.
- कामाक्षी लॉज ते सिटी चौक व पुढे गुलमंडी, बाराभाई ताजिया, गोमटेश मार्केट मार्गे पैठण गेट या रस्त्यावरील सर्व पूर्व व पश्चिम गल्ल्या बंद राहतील.
- सिटी चौक पोलिस ठाणे पश्चिमेकडील बुऱ्हाणी हायस्कूलकडे जाणारी गल्ली.
- बुढीलाईन, जुने तहसील कार्यालय, जुना बाजार, बारूदगरनाला.
- सिल्लेखाना चौक, पैठण गेट, बाराभाई ताजिया, रंगारगल्ली, सिटी चौक.
- सावरकर चौक, एम.पी. लॉ कॉलेज, महात्मा फुले पुतळा/ बळवंत वाचनालय चौक.
- अंजली टॉकीज, महात्मा फुले पुतळा चौक ते बाबुराव काळे चौक.
- रॉक्सी कॉर्नर, जिजामाता कॉलनी ते बाबुराव काळे चौक.
- सेव्हान हिल ते शिवाजीनगर, त्रिमूर्ती चौक ते गजानन मंदिर, पटिलाया बँक ते गजानन मंदिर.
पर्यायी मार्ग कोणते?
- रोशनगेटकडून शहागंजकडे जाणाऱ्या सर्व वाहनांसाठी चेलीपुरा चौक, लोटा कारंजा, सिटी चौकच्या पाठीमागील रोडने वाहतूक सुरु राहील.
- मिल कॉर्नर-औरंगपुऱ्याकडे येणारी सर्व वाहने अंजली टॉकीजजवळून उजवीकडे नागेश्वरवाडी डॉ. खनाळे हॉस्पीटल, निराला बाजार, समर्थनगर मार्गे अंजली टॉकीजपासून डावीकडे खडकेश्वरमार्गे महापालिकेकडे जातील.
- क्रांती चौकाकडून येणारी वाहने सिल्लेखाना चौक, समर्थनगर चौक मार्गे बसस्थानकाकडे जातील.
- पटियाला बँक ते गजानन मंदिराकडे येणारी वाहने हिंदूराष्ट्र चौक, विजयनगर, गजानन कॉलनी रिलायन्स मॉलमार्गे येतील व जातील.
- जवाहरनगर पोलिस ठाणे ते गजानन महाराज मंदिराकडे येणारी वाहने माणिक हॉस्पीटल, डॉ. हेडगेवार हॉस्पीटल पाठीमागील रोडने त्रिमूर्ती चौकाकडे जातील व येतील.
- त्रिमूर्ती चौक ते गजानन महाराज मंदिराकडे येणारी वाहने डॉ. हेडगेवार हॉस्पीटलच्या पाठीमागील रोडने जवाहरनगर पोलिस ठाण्याकडे जातील व येतील.
- सेव्हन हिल उड्डाणपुलाकडून गजानन महाराज मंदिराकडे येणारी वाहने जालना रोडने आकाशवाणी मार्गे जातील.