मनोज जरांगे पाटील यांच्या मृत्यूची बातमी खोटी, यूट्यूब चॅनेलचालकावर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मृत्यू झाल्याची खोटी बातमी एका यूट्यूब चॅनेलवर प्रसारित करण्यात आली. ही बातमी प्रसारित होताच ती वाऱ्यासारखी पसरली आणि राज्यभर खळबळ उडाली. दरम्यान ही बातमी खोटी असल्याचे मनोज जरांगे यांच्या जवळच्या व्यक्तीच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून छत्रपती संभाजीनगरच्या जवाहरनगर पोलिस ठाण्यात अफवा पसरवल्याप्रकरणी यूट्यूब चॅनेलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज जरांगे पाटील हे गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी करत असलेल्या आंदोलनांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, या मागणीसाठी त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. गोरगरिब मराठ्यांना आरक्षण द्या, या मागणीसाठी त्यांनी आंदोलनाचा रेटा दिल्यामुळे मनोज जरांगे हे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. आंतरवली सराटीपासून सुरू झालेल्या त्यांच्या आंदोलनाची प्रचंड चर्चा झाली आणि त्यांना राज्यभरातून मोठे समर्थनही मिळत आहे.

मराठा आरक्षणासाठीचा मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे. अशातच जरांगे पाटील यांचा मृत्यू झाल्याची खोटी बातमी न्यूज विथ कोमल या यूट्यूब चॅनेलवर प्रसारित करण्यात आली. ही बातमी वाऱ्यासारखी व्हायरल होऊ लागली. जरांगे यांच्या मृत्यूबाबतची खोटी बातमी व्हायरल होत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांच्या जवळच्या एका व्यक्तीच्या लक्षात आले. ही बातमी खोटी असल्याचा तातडीने खुलासा त्यांनी केला. त्यानंतर या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

मनोज जरांगे पाटील यांच्या मृत्यूबाबतची खोटी माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनेलचे नाव न्यूज विथ कोमल असे आहे. या यूट्यूब चॅनेलवर जरांगे पाटील यांच्या मृत्यूबाबतची खोटी माहिती प्रसारित झाल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली.

जरांगे पाटील यांच्या मृत्यूबाबतची खोटी बातमी व्हायरल होत असल्याची बाब त्यांच्या जवळच्या एका व्यक्तीच्या लक्षात आली. ही बातमी खोटी असल्याचा खुलासा त्यांनी तातडीने केला. त्यानंतर जवाहरनगर पोलिस ठाणे गाठून जरांगे पाटील यांच्या मृत्यूबाबतची खोटी बातमी दिल्याबद्दल त्या यूट्यूब चॅनेलविरुद्ध फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जरांगे पाटील यांच्या मृत्यूबाबतची खोटी बातमी प्रसारित करणाऱ्या यूट्यूब चॅनेल चालकाला तातडीने अटक करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!