राजकारण

औरंगाबाद जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतिपदांचे ४ नोव्हेंबर रोजी निश्चित होणार आरक्षण!
राजकारण

औरंगाबाद जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतिपदांचे ४ नोव्हेंबर रोजी निश्चित होणार आरक्षण!

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतिपदासाठी आरक्षित पदांचे वाटप करण्यासाठी ४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता ही बैठक होईल. महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकासाने अधिसूचनेतील अनुसूचीनुसार औरंगाबाद जिल्ह्यांच्या अधिकारी क्षेत्रातील पंचायत समित्याकरिता त्यांना सद्य:स्थितीत लागू असलेल्या आरक्षणाच्या समाप्तीनंतर येणाऱ्या दिवसापासून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) आणि महिला (अशा जाती, जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग यामधील महिलांसह) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या, पंचायत समित्या सभापतींची पदे नेमून दिलेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाचे पत्र व अधिसूचनेनुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी राखून ठेवावयाच...
नव्या नोटांवर कुणाचा फोटो?:  मनीष तिवारी म्हणाले- डॉ. बाबासाहेब आंबेडकर; नितेश राणे म्हणतात- छत्रपती शिवाजी महाराज!
देश, महाराष्ट्र, राजकारण

नव्या नोटांवर कुणाचा फोटो?:  मनीष तिवारी म्हणाले- डॉ. बाबासाहेब आंबेडकर; नितेश राणे म्हणतात- छत्रपती शिवाजी महाराज!

नवी दिल्ली/मुंबईः दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचे फोटो छापण्याची मागणी केल्यानंतर हे प्रकरण चांगलेच रंगू लागले आहे. भारतात ज्या नव्या नोटा छापल्या जातील, त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का छापला जाऊ शकत नाही?  एका बाजूला महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो छापला पाहिजे, असे पंजाबमधील काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्रातील भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापण्याचा आग्रह धरला आहे.  देशाच्या अर्थव्यवस्थेला देवी-देवतांचे आशीर्वाद मिळाले पाहिजे, यासाठी नव्या चलनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापा, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केल्यानंतर यावरून देशाचे राजकारण ...
महाराष्ट्राप्रमाणेच तेलंगणातही ऑपरेशन लोटस?, टीआरएसच्या आमदारांना ५० कोटींची ऑफर, तिघे पोलिसांच्या ताब्यात
देश, राजकारण

महाराष्ट्राप्रमाणेच तेलंगणातही ऑपरेशन लोटस?, टीआरएसच्या आमदारांना ५० कोटींची ऑफर, तिघे पोलिसांच्या ताब्यात

हैदराबादः महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडवून आणण्यासाठी आमदारांना ‘पन्नास खोके’  दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली असतानाच ही चर्चा थंडावत नाही तोच तेलंगणामध्येही महाराष्ट्राप्रमाणेच सत्तांतर घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप आहे. तेलंगणातील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) आमदारांनी पक्षांतर करावे यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर देण्यात आल्याचा आरोप टीआरएसने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका फार्म हाऊसवर धाड टाकून तिघांना ताब्यात घेतले आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार तेलंगणा राष्ट्र समितीच्या चार आमदारांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी महत्वाच्या व्यक्तीला १०० कोटी आणि प्रत्येक आमदाराला ५० कोटींची ऑफर देण्यात आली. ज्या आमदारांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाला, त्यांनीच ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस...
भारतीय नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचेही फोटो छापाः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मागणी
देश, राजकारण

भारतीय नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचेही फोटो छापाः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मागणी

नवी दिल्लीः भारतीय चलनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचेही फोटो छापा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबत आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचेही केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांनी केलेली ही मागणी हिंदुत्वाच्या राजकारणातील एक मोठी खेळी मानली जात आहे. बऱ्याच काळापासून अरविंद केजरीवाल हे सॉफ्ट हिंदुत्ववादी नेता म्हणून आपली प्रतीमा विकसित करण्याच्या प्रयत्नाला लागले होते. आज त्यांनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचे फोटो छापण्याची मागणी करून हिंदुत्ववादी राजकारणाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.  केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. दिवाळीच्या रात्री पूजा करताना हा विचार आपल्या मनात आला. अनेक लोकांशी आपली याबाबत चर्चा झाली. कोणीही त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही...
आज काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार मल्लिकार्जुन खरगे, २०२४ ची निवडणूक हे मोठे आव्हान!
देश, राजकारण

आज काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार मल्लिकार्जुन खरगे, २०२४ ची निवडणूक हे मोठे आव्हान!

नवी दिल्लीः मल्लिकार्जुन खरगे हे बुधवारी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. खरगे यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरूर यांचा पराभव केला आहे. काँग्रेस पक्ष अनेक आव्हानांशी झुंज देत असतानाच्या परिस्थितीत खरगे यांच्याकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा आली आहे. खरगे यांच्या समोर २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि अन्य राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्याचे मोठे आव्हान आहे. ८० वर्षीय खरगे हे गांधी कुटुंबाचे अत्यंत विश्वासू आहेत. खरगे अध्यक्ष झाल्यामुळे पक्ष मजबूत होईल, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे सोनिया गांधी अध्यक्ष असताना काँग्रेसला २००४ व २००९ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला होता. खरगे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील तेव्हा काँग्रेसच्या मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष म...
कुणी सांगितलं मी म्हातारा झालोय? तुम्ही काय बघितलंय? शरद पवारांची शेतकरी मेळाव्यात दिलखुलास फटकेबाजी!
महाराष्ट्र, राजकारण

कुणी सांगितलं मी म्हातारा झालोय? तुम्ही काय बघितलंय? शरद पवारांची शेतकरी मेळाव्यात दिलखुलास फटकेबाजी!

पुणेः  वयाची ऐंशी पूर्ण केली आणि अनेक शारीरिक व्याधी असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यभर सातत्याने फिरत असतात. या वयातही शरद पवार यांच्यात इतका उत्साह येतो कुठून? हे राजकारण्यांसह राज्यातील जनतेला पडलेले कोडे आहे. तसाच उत्साह आणि जोश पवारांनी सोमवारी पुणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमात दाखवला. ‘तुम्हाला कुणी सांगितलंय मी म्हातारा झालोय? तुम्ही काय बघितलंय?  मी काही म्हातारा-बितारा झालेलो नाही’, अशी तुफान फटकेबाजी पवार यांनी केली.  शरद पवार हे सोमवारी पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. पुरंदरमधील परींचे गावात शेतकरी सन्मान मेळाव्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी साहेब आपले वय झाले आहे. एका जागेवर बसून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश द्या, गावोगावी फिरू नका, असे काळजीपोटी एका शेतकऱ्याने शरद पवारांना म्हटले. या शेतकरी सन्मान मेळाव्यात बोलत...
कर्नाटकच्या भाजप मंत्र्याने गाऱ्हाणे मांडणाऱ्या महिलेला भरसभेत लगावली थापड
देश, राजकारण

कर्नाटकच्या भाजप मंत्र्याने गाऱ्हाणे मांडणाऱ्या महिलेला भरसभेत लगावली थापड

बेंगळुरूः कर्नाटकच्या भाजप सरकारमधील एका मंत्र्याने त्यांच्याकडे गाऱ्हाणे घेऊन आलेल्या महिलेला थापड लगावल्यामुळे वादंग निर्माण झाले आहे. मंत्र्याने थापड लगावताच ही महिला त्या मंत्र्याच्या पायावर झुकताना व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी काँग्रेसने मोदींना महिलांचा सन्मान आणि महिला सशक्तीकरणाची आठवण देत त्या मंत्र्याच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. कर्नाटकच्या भाजप सरकारमधील मंत्री व्ही. सोमन्ना हे चामराजनगर जिल्ह्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी गेले होते. या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्यासाठी आलेल्या महिलेला थापड लागवली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर शेअर केला जात आहे. ही घटना शनिवारची आहे. कर्नाटकच्या भाजप सरकारमधील घरकुल मंत्री व्ही. सोमन्ना हे चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट तालुक्यातील हंगला गावातील ...
श्रीकृष्णाने अर्जुनाला दिले ‘जिहाद’चे धडेः काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकरांनी जोडला श्रीकृष्णाचा जिहादशी संबंध!
देश, राजकारण, विशेष

श्रीकृष्णाने अर्जुनाला दिले ‘जिहाद’चे धडेः काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकरांनी जोडला श्रीकृष्णाचा जिहादशी संबंध!

नवी दिल्लीः ‘जिहाद’च्या मुद्यावरून देशभरात अधूनमधून बरीच चर्चा आणि वादविवाद होत असतानाच ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी श्रीकृष्णाचाच संबंध थेट जिहादशी जोडला आहे.  जिहादच्या विषयावर बरीच चर्चा होत असताना कुराण आणि भगवदगीतेतही या विषयाचा उल्लेख आढळतो. महाभारतातील गीतेच्या एका भागात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहादचे धडे दिले आहेत, असे चाकूरकर म्हणाले. चाकूरकर यांच्या या वक्तव्यावरून आता वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री मोहसीना किडवई यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन गुरूवारी नवी दिल्लीत झाले. त्यावेळी चाकूरकर बोलत होते. यावेळी काँग्रेस नेते शशी थरूर, फारूक अब्दुल्ला, दिग्विजय सिंह, सुशीलकुमार शिंदे आणि मणिशंकर अय्यरही उपस्थित होते.  असे म्हटले जाते की इस्लाम धर्मात जिहादची खूपच चर्चा आहे.जिहादचा विषय तेव्हाच येतो की ...
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे, शरद पवार हे महाराष्ट्राचे राजकारण कूस बदलण्याचे संकेत; भाजप अस्वस्थ!
देश, महाराष्ट्र, राजकारण, विशेष

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे, शरद पवार हे महाराष्ट्राचे राजकारण कूस बदलण्याचे संकेत; भाजप अस्वस्थ!

मुंबईः राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही सहभागी होणार आहेत. या घडामोडीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. सुमारे तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणे बदलण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते आणि अडीच वर्षांपर्यंत सत्तेतही राहिले. महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवीन प्रयोग झाला तेव्हा बहुतांश राजकीय विश्लेषकांनी सत्ता हेच महाविकास आघाडीचे एकमेव उद्दिष्ट असल्याचे सांगत या नवीन प्रयोगाची संभावना केली होती. परंतु आता सत्ता जाऊनही काँग्रेसच्या नेतृत्त्वातील भारत जोडो यात्रेत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षाचे नेते सहभागी होत असल्याने त्याचे राजकीय अन्वयार्थ लावले जाऊ लागले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शि...
काँग्रेसला मिळाला नवा चेहराः मल्लिकार्जुन खारगे यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड, २४ वर्षानंतर गांधी कुटुंबाहेरचा अध्यक्ष
देश, राजकारण

काँग्रेसला मिळाला नवा चेहराः मल्लिकार्जुन खारगे यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड, २४ वर्षानंतर गांधी कुटुंबाहेरचा अध्यक्ष

नवी दिल्लीः  काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खारगे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. तब्बल २४ वर्षांनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंबाहेरील व्यक्तीची अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.  गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक देशभर चर्चेचा विषय बनली होती. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात मल्लिकार्जुन खारगे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली आहे.  या निवडणुकीत मल्लिकार्जुन खारगे यांना ७ हजार ८९७ मते मिळाली आहेत. त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उभे असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर यांना १ हजार ७२ मते मिळाली आहेत. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!