विद्यापीठातील नवीन गेटचे बांधकाम अखेर जमीनदोस्त!, आंबेडकरी चळवळीच्या एकजुटीचा दणका!!
औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच नव्याने बांधण्यात येत असलेल्या प्रतिविद्यापीठ गेटचे बांधकाम आज अखेर जमीनदोस्त करण्यात आले. नामांतर चळवळीचे प्रेरणास्त्रोत बनलेल्या मुख्य गेटचे महत्व कमी करण्यासाठीच विद्यापीठ प्रशासनाने नवीन गेटचे बांधण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप करत आंबेडकरी चळवळीने एकजुटीने या नवीन गेटच्या बांधकामाला विरोध केला होता. अखेर आंबेडकरी चळवळीच्या एकजुटीसमोर नमते घेत विद्यापीठ प्रशासनाने हे बांधकाम आज जमीनदोस्त करून टाकले. न्यूजटाऊनने या गेटच्या विरोधात आक्रमकपणे मोहीम राबवली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणाचे काम विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या सुशोभीकरणाचा एक भाग म्हणून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारीच अगदी दहा-पंधरा फुटांच्या अंतरावर ‘इ...