महाराष्ट्र

औरंगाबादः विद्यापीठ सिनेट निवडणुकीची मतमोजणी सुरू, आधी लागणार आरक्षित प्रवर्गातील निकाल
महाराष्ट्र, राजकारण

औरंगाबादः विद्यापीठ सिनेट निवडणुकीची मतमोजणी सुरू, आधी लागणार आरक्षित प्रवर्गातील निकाल

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गणातून निवडून द्यावयाच्या १० अधिसभा सदस्यांसाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणी सुरूवात झाली आहे. सध्या आरक्षित प्रवर्गातील मतमोजणी हाती घेण्यात आली. सुरूवातीला या गणातील वैध-अवैध मते ठरवली जातील आणि नंतर प्रत्यक्ष मतमोजणी केली जाईल. पदवीधर गणातून निवडून द्यावयाच्या १० अधिसभा सदस्यांच्या निवडीसाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात विविध मतदान केंद्रावर शनिवारी मतदान घेण्यात आले होते. एकूण ३६ हजार २५४ नोंदणीकृत पदवीधर मतदारांपैकी १८ हजार ४०० मतदारांनी शनिवारी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यात १५ हजार १७५ पुरूष तर ३ हजार २२५ महिला मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीत सरासरी ५०.७५ टक्के मतदान झाले आहे. आज सकाळी दहा वाजता कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीच्या प्...
कृषी सौरऊर्जा वाहिन्यांसाठी महावितरण घेणार शेतकऱ्यांकडून हेक्टरी ७५ हजार रुपये दराने भाडेतत्वावर जमीन
महाराष्ट्र

कृषी सौरऊर्जा वाहिन्यांसाठी महावितरण घेणार शेतकऱ्यांकडून हेक्टरी ७५ हजार रुपये दराने भाडेतत्वावर जमीन

औरंगाबाद: राज्यातील ज्या ग्रामीण भागांमध्ये गावठाण व कृषि वीजवाहिन्यांचे विलगीकरण झाले आहे अशा  कृषी वीजवाहिन्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवण्यात येत आहे. यासाठी लागणाऱ्या जमिनी प्रतिवर्ष ७५ हजार रुपये प्रति हेक्टर या दराने भाडेतत्वावर महावितरणद्वारे घेण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून ३ हजार कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येणार असून याकरिता १५ हजार एकर जमिनीवरून सुमारे ४ हजार मेगावॅट विजेची  निर्मिती होणार आहे. या योजनेद्वारे कृषी अतिभारीत उपकेंद्राच्या ५ किमीच्या परिघात २ ते १० (२X५) मे.वॅ. क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित करुन या कृषी वाहिन्यांवरील  कृषी ग्राहकांना दिवसा ८ तास वीज देण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे. सदर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महावितरणने ऑनलाईन ...
महाराष्ट्रात ‘भारत जोडो यात्रे’ला अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ, राहुल गांधी म्हणाले, ही पदयात्रा कोणीही रोखू शकणार नाही!
देश, महाराष्ट्र, राजकारण

महाराष्ट्रात ‘भारत जोडो यात्रे’ला अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ, राहुल गांधी म्हणाले, ही पदयात्रा कोणीही रोखू शकणार नाही!

देगलूरः काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेचे सोमवारी रात्री तेलंगणातून महाराष्ट्रात देगलूरमध्ये आगमन झाले. भारत जोडो यात्रा देगलुरात दाखल होताच कार्यकर्त्यांनी या यात्रेचे अभूतपूर्व स्वागत केले. देगलूर येथील ऐतिहासिक गुरूद्वारात दर्शन घेतल्यानंतर ही यात्रा आज पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. काश्मीर ते कन्याकुमारी अशी काँग्रेसची ही भारत जोडो यात्रा आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा प्रवास करून ही भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. ही भारत जोडो यात्रा एकूण ३ हजार ५७० किलोमीटर प्रवास करणार असून या यात्रेला ठिकठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.  सोमवारी रात्री देगलुरात या यात्रेचे आगमन झाल्यानंतर राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केले. महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेची सुरूवात छत्रपत...
नव्या नोटांवर कुणाचा फोटो?:  मनीष तिवारी म्हणाले- डॉ. बाबासाहेब आंबेडकर; नितेश राणे म्हणतात- छत्रपती शिवाजी महाराज!
देश, महाराष्ट्र, राजकारण

नव्या नोटांवर कुणाचा फोटो?:  मनीष तिवारी म्हणाले- डॉ. बाबासाहेब आंबेडकर; नितेश राणे म्हणतात- छत्रपती शिवाजी महाराज!

नवी दिल्ली/मुंबईः दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचे फोटो छापण्याची मागणी केल्यानंतर हे प्रकरण चांगलेच रंगू लागले आहे. भारतात ज्या नव्या नोटा छापल्या जातील, त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का छापला जाऊ शकत नाही?  एका बाजूला महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो छापला पाहिजे, असे पंजाबमधील काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्रातील भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापण्याचा आग्रह धरला आहे.  देशाच्या अर्थव्यवस्थेला देवी-देवतांचे आशीर्वाद मिळाले पाहिजे, यासाठी नव्या चलनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापा, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केल्यानंतर यावरून देशाचे राजकारण ...
प्रोत्साहनपर योजनाः राज्यातील ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे २ हजार ५०० कोटी रुपये जमा
महाराष्ट्र

प्रोत्साहनपर योजनाः राज्यातील ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे २ हजार ५०० कोटी रुपये जमा

मुंबई:  नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. एकाच वेळी राज्यातील ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे २५०० कोटी रुपये जमा करण्यात आले. अशा प्रकारे एकाचवेळी थेट खात्यात रक्कम जमा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे बळीराजाने खचून जाऊ नये, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. दरम्यान, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे उपग्रह आधारित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करतानाच त्याची भरपाई ऑटोपायलट मोडच्या माध्यमातून देण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां...
साखर झोपेतच हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, ४० ते ४५ गावांची झोपमोड!
महाराष्ट्र, विशेष

साखर झोपेतच हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, ४० ते ४५ गावांची झोपमोड!

हिंगोलीः अख्खा महाराष्ट्र साखर झोपेत असतानाच आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील तीन तालुक्यांना भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.६ एवढी होती. नॅशनल सेंट्र फॉर सिसमॉलॉजीकडेही या भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली असून तेथेही या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल नोंदली गेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढानागनाथ आणि कळमनुरी तालुक्यातील ४० ते ४५ गावांना आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. वसमत तालुक्यातील बोथी, दांडेगाव, सिंदगी, बोल्डा, आसोला आणि औंढानागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, आमदरी, कंजारा, पूर, वसई, जामगव्हाण, ललालदाभा, काकडदाभा आदी गावांत हे भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यातील गावकरी साखर झोपेत असताना आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास जमिनीतून आवाज येऊ लागले. त्यामुळे झोप...
चंद्रकांत पाटलांना रयत शिक्षण संस्थेनेही सुनावले खडे बोल, वादग्रस्त वक्तव्याचा केला निषेध!
महाराष्ट्र, विशेष

चंद्रकांत पाटलांना रयत शिक्षण संस्थेनेही सुनावले खडे बोल, वादग्रस्त वक्तव्याचा केला निषेध!

साताराः महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागून शाळा चालवल्या, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप नेते आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील  यांच्याविरोधात राज्यभर संतापाची लाट आली असून विविध स्तरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात असतानाच आता कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेनेही प्रसिद्धी पत्रक जारी करून चंद्रकांत पाटलांना खडे बोल सुनावत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला आहे. रयत शिक्षण संस्थेची ही प्रेसनोट जशीच्या तशी देत आहोत... “महाराष्ट्राच्या बहुजन समाजातील गोर-गरीब, डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १०३ वर्षापूर्वी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. हेही वाचाः फुले-आंबेडकरांनी भीक मागितली आणि शाळा चालवल्या: उच्च शिक्षणमंत्री...
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन
महाराष्ट्र

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

पुणेः औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाचे कुलगुरू आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. दीनानाथ रुग्णालयात दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. डॉ. कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च १९४८ रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण देलगूर येथे झाले. बी.ए. आणि एम. ए. या दोन्ही पदव्या त्यांनी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केल्या होत्या. त्यांनी कुलपतींचे सुवर्णपदकही पटकावले होते.  १९७१ ते १९७७ या काळात ते बीड येथील महाविद्यालयात मराठीचे अधिव्याख्याता म्हणून काम केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांनी १९७७ ते १९९६ या काळात प्रपा...
अंधारात ‘दिवे’: झाकोळल्या रात्री कृषिमंत्री सत्तारांनी केली गंगापूर, वैजापुरात पीक नुकसानीची पाहणी
महाराष्ट्र, राजकारण, विशेष

अंधारात ‘दिवे’: झाकोळल्या रात्री कृषिमंत्री सत्तारांनी केली गंगापूर, वैजापुरात पीक नुकसानीची पाहणी

औरंगाबाद: सिल्लोडचे एकेकाळी काँग्रेसचे, आता शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले आमदार आणि विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतातच. त्यांच्या कामाचा 'झपाटा' एवढा आहे की ते वेळकाळही पहात नाहीत. त्यामुळेच त्यांनी शनिवारी सायंकाळी अंधारून आलेले असतानाही 'दिवे' लावून परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे 'कृतीशील' लोकप्रतिनीधी म्हणूनच ओळखले जातत. तशी त्यांची प्रत्येकच 'कृती' आगळीवेगळी असते आणि म्हणूनच ती चर्चेचा विषयही ठरते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या मुंबईतील दसरा मेळाव्याला त्यांनी शंभर बसेस भरून लोक पाठवले होते. त्याची औरंगाबाद जिल्ह्यातच नव्हे तर सगळीकडेच भरपूर चर्चा झाली. ही चर्चा थांबते न थांबते...
नागपुरात १९ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन, १२ दिवस चालणार कामकाज
महाराष्ट्र

नागपुरात १९ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन, १२ दिवस चालणार कामकाज

मुंबई:  यंदाचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार, १९ डिसेंबरपासून नागपुरात होणार आहे. १९ ते ३० डिसेंबर या कालावधीत  म्हणजेच १२ दिवस अधिवेशनाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक  विधानभवनात  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या. या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, बंदरे व खनिकर्म विकास मंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, वि...