महाराष्ट्र

आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा, राजकीय वर्तुळात खळबळ
महाराष्ट्र, राजकारण

आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा, राजकीय वर्तुळात खळबळ

नाशिकः प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांना नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २०१७ मध्ये केलेल्या आंदोलनादरम्यान आ. बच्चू कडू यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. आ. बच्चू कडू यांना शिक्षा ठोठावण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाशिक महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या फिर्यादीवरून हा एफआयआर नोंदवला गेला होता. नाशिक पोलिसांनी या प्रकरणी तपास करून नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यावर सुनावणी होऊन आज न्यायालयाने आ. बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. दमदाटी करणे, सरकारी कामात अडथळा आणणे या गुन्ह्यात आ. बच्चू कडू यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली असून त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. २०१७ मध्ये आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात दिव्यांग लो...
एनएसएफडीसी कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर, जिल्हा कार्यालयात तत्काळ जमा करा ‘ही’ कागदपत्रे
महाराष्ट्र

एनएसएफडीसी कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर, जिल्हा कार्यालयात तत्काळ जमा करा ‘ही’ कागदपत्रे

मुंबई: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत २०२३-२४ मध्ये विविध योजना राबवल्या जात आहेत. या महामंडळांतर्गत एनएसएफडीसीच्या कर्ज योजनेसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या एनएसएफडीसी योजना कर्ज प्रस्तावाबाबत ज्या लाभार्थीनी यापूर्वी एनएसएफडीसी कर्ज योजनेअंतर्गत लघु उद्योगासाठी १ लाख रुपये ते २ लाख रुपये, महिला समृध्दी योजना व लघु ऋण वित्त योजना यासाठीचे कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालयात दाखल केले असून ज्याची लाभार्थी निवड समिती झालेली आहे व जे परिपूर्ण कर्जप्रस्ताव जिल्हा कार्यालयामार्फत प्रधान कार्यालय मंजुरीसाठी शिफारस करण्यात आले आहेत, अशा लाभार्थ्यांची यादी महामंडळाच्या सूचना फलकावर लावलेली आहे. आता संबंधित अर्जदारांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क करुन पुढील...
पंकजा मुंडेंना खूप अहंकार, त्यांनी तो सोडावाः नामदेव शास्त्रींचा सल्ला; प्रत्युत्तरात पंकजा म्हणाल्याः मी जर जोरात…
महाराष्ट्र

पंकजा मुंडेंना खूप अहंकार, त्यांनी तो सोडावाः नामदेव शास्त्रींचा सल्ला; प्रत्युत्तरात पंकजा म्हणाल्याः मी जर जोरात…

बीडः अहमदनगर जिल्ह्यातील भारजवाडी येथे आयोजित नारळी सप्ताहात भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी बोलताना नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंवर टिकास्त्र सोडले. पंकजा मुंडे यांना खूप अहंकार आहे, त्यांनी तो सोडला पाहिजे, असे नामदेव शास्त्री म्हणाले. नामदेव शास्त्रींच्या या टिकेला पंकजांनीही जशास तसे प्रत्युत्तर दिले. नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात नव्याने रंगलेल्या या वादाची सध्या बीड जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू झाला आहे. गोपीनाथ मुंडे हे हयात असताना भगवान गडावरील दसरा मेळाव्यात सहभागी व्हायचे. त्यांच्या निधनानंतर पंकजा मुंडेंनी ही परंपरा कायम ठेवली होती. परंतु काही दिवसांनी पंकजा मुंडेंनी परळीत गोपीनाथ ...
अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकऱ्यांची दैना, १३ हजार ५०० हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान
महाराष्ट्र

अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकऱ्यांची दैना, १३ हजार ५०० हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान

मुंबईः राज्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचा मोठा फटका बसला आहे. राज्याच्या आठपेक्षा अधिक जिल्ह्यांतील सुमारे १३ हजार ५०० हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीतील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्य सरकारने तातडीने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून प्रत्यक्ष पंचनाम्यांनंतर नुकसानग्रस्त शेतजमिनीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ठाणे, पालघरसह राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला.  वाशिम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. अहमदनगर, नंदूरबार, धुळे, जळगाव, पुणे, जालना या जिल्ह्यातही अवकाळी पाऊस व गारपीटीने शेतकऱ्यांना फटका दिला आहे. रब्बी हंगामातील पिके काढणीला आलेली असतानाच राज्याच्या अन...
ऊर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या  ५ हजार १७७ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
महाराष्ट्र

ऊर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या  ५ हजार १७७ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी ५१७७.३८ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे ६८ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे. प्रवरा नदीवर निळवंडे गावाच्या वरील बाजूस हे दगडी धरण बांधण्यात येत असून धरणातून डावा कालवा सुरु होऊन तो ८५ किलोमीटर लांब आहे. नदीच्या उजव्या तीराने जाणारा कालवा ९७ किलोमीटर आहे.  या दोन्ही कालव्यातून ६८ हजार हेक्टर सिंचन होणे अपेक्षित आहे. २०२७ पर्यंत या प्रकल्पाचे कालव्यासह संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होताच अकोले, संगमनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अवर्षणप्रर्वण भागातील १८२ गावांना सिंचनाचा लाभ होईल....
मी काँग्रेसचे तळवे चाटले म्हणता, तुम्ही मिंधे-नितीशकुमारांचे काय चाटले?: उद्धव ठाकरेंचा भाजप, अमित शाहांवर हल्लाबोल
महाराष्ट्र, राजकारण

मी काँग्रेसचे तळवे चाटले म्हणता, तुम्ही मिंधे-नितीशकुमारांचे काय चाटले?: उद्धव ठाकरेंचा भाजप, अमित शाहांवर हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगरः जगातील सर्वात शक्तिमान नेता देशाचा प्रधानमंत्री झाल्यानंतरही देशातील हिंदूंना आक्रोश करायला लागतो, तर त्या नेत्याची शक्ती काय कामाची? अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला. महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा हिंदू-मुस्लीम अशा कोणत्याही धर्मीयांना आक्रोश करण्याची वेळ आम्ही येऊच दिली नव्हती, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. सत्तेसाठी मी काँग्रेस- राष्ट्रवादीचे तळवे चाटले म्हणता, तर तुम्ही मिंधे- नितीशकुमारांचे काय चाटले? असा खोचक सवालही त्यांनी केला. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. या सभेला अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते...
आ. संजय शिरसाटांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न होत आहेत का? त्यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही?: खा. सुप्रिया सुळेंचा सवाल
महाराष्ट्र, राजकारण

आ. संजय शिरसाटांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न होत आहेत का? त्यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही?: खा. सुप्रिया सुळेंचा सवाल

मुंबईः ‘हे माझे भाऊ आहेत, ते माझे भाऊ आहेत, असे म्हणणाऱ्या त्या बाईने काय लफडी केलीत ते तिलाच माहिती,’ अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे वादग्रस्त टीका करणारे शिंदे गटाचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला आहे. शिरसाट हे सरकार पक्षाचे आमदार आहेत म्हणून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे का? असा सवाल करत त्यांच्यावर अद्याप गुन्हाही दाखल झालेला नाही, हे अतिशय खेदजनक आहे, असे खा. सुळे यांनी म्हटले आहे.  छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सभेत बोलताना आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना अर्वाच्च भाषा वापरली.  ‘हे माझे भाऊ आहेत, ते माझे भाऊ आहेत, असे म्हणणाऱ्या त्या बाईने काय लफडी केलीत ते तिलाच ...
औरंगजेबाची कबर हैदराबादला हलवाः आ. शिरसाटांची मागणी, एवढाच द्वेष असेल तर मकबरा पहायला का गेले? एमआयएमचा सवाल
महाराष्ट्र, राजकारण

औरंगजेबाची कबर हैदराबादला हलवाः आ. शिरसाटांची मागणी, एवढाच द्वेष असेल तर मकबरा पहायला का गेले? एमआयएमचा सवाल

छत्रपती संभाजीनगरः औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर समर्थन-विरोधाचे राजकारण सुरू असतानाच शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मुघल सम्राट औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथून हैदराबादला हलवा, अशी मागणी केली आहे. शिरसाट यांच्या मागणीमुळे राज्यात नवा राजकीय गदारोळ निर्माण होण्याची शक्यता आहे. औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याच्या निषेधार्थ एमआयएमने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून आ. शिरसाट यांनी ही मागणी केली आहे. शिरसाट हे सत्ताधारी शिवसेनेचे आमदार असल्यामुळे त्यांच्या मागणीवर राज्य सरकार काय भूमिका घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जर त्यांचे औरंगजेबावर इतकेच प्रेम असेल तर औरंगजेबाची कबर हैदराबादला हलवा. त्यांना तेथे स्मारक बांधू द्या किंवा त्यांना हवे ते करू द्या. कोणीही त्रास देणार नाही, परंतु ह...
सत्यजित तांबेंना मतदान करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या पातळीवर: विखे; भाजपकडून शेवटपर्यंत पाठिंब्याचा अधिकृत निर्णय नाहीच!
महाराष्ट्र, राजकारण

सत्यजित तांबेंना मतदान करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या पातळीवर: विखे; भाजपकडून शेवटपर्यंत पाठिंब्याचा अधिकृत निर्णय नाहीच!

अहमदनगरः नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपचा पाठिंबा नेमका कोणाला? या प्रश्नाचे अधिकृत उत्तर मतदान एक दिवसावर येऊन ठेपले तरी मिळालेले नाही. काँग्रेसमधून बंडखोरी करून नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी दाखल केलेले सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा देईल, असे गृहित धरले जात होते. परंतु मतदान तोंडावर येऊन ठेपले तरी भाजपकडून पाठिंब्याचा अधिकृत निर्णय होऊ शकलेला नाही. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘कार्यकर्त्यांच्या पातळीवर सत्यजित तांबेंना मतदान करण्याचा निर्णय झाला आहे,’ असे जाहीर केले. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुरूवातीपासूनच रंगतदार होत गेली आहे. काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करून एबी फॉर्म देऊनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखलच केला नाही. उलट त्यांचे चिरंजीव  सत्यजित तांबे या...
परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास विलंब झाल्यास थेट कुलगुरूंना जबाबदार धरणार, कुलपतींनी खडसावले
महाराष्ट्र

परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास विलंब झाल्यास थेट कुलगुरूंना जबाबदार धरणार, कुलपतींनी खडसावले

मुंबई: विद्यापीठांच्या विविध परीक्षांचे निकाल तीस दिवसांत आणि उशिरात उशिरा ४५ दिवसांच्या आत जाहीर करण्याचे बंधन असताना देखील बहुसंख्य विद्यापीठे निकाल लावण्यास अक्षम्य विलंब करीत आहेत. विद्यापीठांच्या निकालासोबत विद्यार्थ्यांचे भवितव्य निगडित असल्याने सर्व विद्यापीठांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेणे आवश्यक असून यानंतर निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास थेट कुलगुरुंना जबाबदार धरले जाईल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील कुलगुरुंना सांगितले. राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील काही पारंपरिक, कृषि, आरोग्य विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरुंची  बैठक सोमवारी राजभवन येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते. आगामी २०२३-२४ शैक्षणिक सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात विद्यापीठांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच विद्यापीठांशी निगडित...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!